विरोधी पक्षनेत्याचे हक्क आणि अधिकार कोणते?, सरकारला ‘गपगार’ करण्यासाठी ‘आयुधं’ कोणती?, वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग व सुदृढ बनते.

विरोधी पक्षनेत्याचे हक्क आणि अधिकार कोणते?, सरकारला 'गपगार' करण्यासाठी 'आयुधं' कोणती?, वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरं
देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर
Follow us
| Updated on: Aug 07, 2021 | 7:36 AM

मुंबई : सभागृहात मुख्यमंत्र्यांनंतर दुसरे प्रमुख अधिकार विरोधी पक्ष नेत्याकडे असतात. सरकारच्या कार्यावर व धोरणावर टीका करण्याची प्रमुख जबाबदारी विरोधी पक्षावर असते. सरकारी धोरणाचे व कार्यक्रमाचे वाभाडे काढून ते धोरण जनतेच्या हिताच्या दृष्टीने कसे बरोबर नाही ते विरोधी पक्ष नेता निदर्शनास आणत असतो. त्यासाठी विरोधी पक्षनेता वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करीत असतो. येणाऱ्या निवडणुकीत जनमत जागृत करून आपल्या पक्षाकडे वळविण्यासाठी तो प्रयत्नशील असतो.

विरोधक कोण-कोणत्या मार्गाने सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकतो?

राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा अर्थसंकल्प व मागण्यांवरील चर्चा प्रश्न तहकुबीचा ठराव मंत्रिमंडळावर अविश्वासाचा ठराव इतर ठराव अर्धा तास चर्चा लक्षवेधी

विरोधी पक्ष नेता कोणत्या भूमिका आणि कार्य पार पाडत असतो?

सरकारच्या चुकीच्या धोरणावर टीका करणे समाजात निर्माण होणाऱ्या अराजकतेविरुद्ध भूमिका घेतो दंगली, खून सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असेल तर त्याविषयीची चौकशी करण्याचा आग्रह धरतो समाजतल्या अनेक समूहांच्या प्रश्नाला वाचा फोडतो, उदाहरणार्थ- शेतकरी, कष्टकरी आदींच्या प्रश्नांवर विधिमंडळात आवाज उठवतो आरक्षण प्रश्नावर भूमिका मांडणं

सक्षम विरोधी पक्ष नेता असणे हे सक्षम लोकशाहीचे वैशिष्ट्य आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर सडकून टीका करून शासनाला अचूक कामे करण्यास विरोधी पक्ष नेता भाग पाडतो. सभागृहात बोलण्याची पहिली संधी मुख्यमंत्र्यांना असते तर नंतर विरोधी पक्ष नेत्याला बोलण्याची संधी असते. मुख्यमंत्री हा सरकारचा प्रतिनिधी असतो तर विरोधी पक्षनेता हा जनतेचा प्रतिनिधी असतो. विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. त्याला सर्व सोयी सुविधा दिल्या जातात.

विरोधी पक्ष नेत्यावर कोणती जबाबदारी असते?

सरकारवर अंकुश ठेवणे राज्यातील-समाजातील ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवणे सरकारचे अपयश जनतेसमोर आणणे. प्रशासकीय अधिकारी चुकीचे वागत असतील तर त्यांना योग्य काम करण्यास भाग पाडणे विविध प्रश्नांवर आंदोलन करणं

विरोधी पक्ष नेत्याकडे कोणती संसदीय आयुधे असतात?

हक्कभंग प्रस्ताव स्थगन प्रस्ताव अंतिम आठवडा प्रस्ताव राज्यपालांच्या अभिभाषणानंतर विरोधी पक्षनेता चर्चेला सुरुवात करतो. अर्थसंकल्पावर पहिलं भाषण विरोधी पक्ष नेता करत असतो.

विरोधी पक्ष नेत्याकडे कोणते अधिकार आणि हक्क असतात?

सरकार मधील कोणत्याही खात्यात संदर्भात माहिती मागण्याचा अधिकार विरोधी पक्ष नेत्याला असतो. सर्व माहिती देणे सरकारवर बंधनकारक असते. कामकाज सल्लागार समिती संदर्भात अधिकार असतात यात अधिवेशन ठरविताना विषय मांडताना विरोधी पक्षाने त्याला सोबत घ्यावे लागते. सभागृहातील सर्वात आक्रमक नेतृत्व म्हणून विरोधी पक्ष नेता अधिकार पार पाडत असतो. विधिमंडळातील सर्व महत्त्वाच्या खात्यांचा विरोधी पक्षाच्या वतीने तोच प्रमुख असतो.

आतापर्यंतचे प्रभावी विरोधी पक्ष नेते कोण कोण आहेत?

अलीकडच्या काळात प्रभावी विरोधी पक्ष नेते म्हणून ज्यांनी भूमिका पार पाडली त्यामध्ये छगन भुजबळ, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, रामदास कदम, नितीन गडकरी, विनोद तावडे, धनंजय मुंडे आणि सध्या देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या आदी नेत्यांचा समावेश होतो.

विरोधी पक्षनेत्याची भूमिका खऱ्या अर्थाने पहारेकरी

लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष नेता व विरोधी पक्ष खऱ्या अर्थाने पहारेकरी म्हणून भूमिका पार पाडत असतो. हा पहारेकरी ज्या प्रमाणात सजग असेल त्या प्रमाणात लोकशाही सजग व सुदृढ बनते.

(माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या ‘विधानगाथा’ या पुस्तकातून सदर माहिती घेतलेली आहे…)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.