AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय? संजय राऊतांनी ‘रोखठोक’ सांगितलं!

महाराष्ट्रातील तीनही राजकीय पक्ष जे आता सत्तेत आहे, त्यांना सत्ता टिकवणं का गरजेचं आहे किंबहुना महाराष्ट्रातलं सरकार कोणत्या कारणांमुळे ढासळणार नाही, याची वेध संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमधून घेतला आहे. | Sanjay Raut Rokhthok

शिवसेना-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय? संजय राऊतांनी 'रोखठोक' सांगितलं!
संजय राऊत, शिवसेना खासदार
| Edited By: | Updated on: Jun 13, 2021 | 7:22 AM
Share

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राजधानी दिल्लीत जाऊन नरेंद्र मोदी (Marendra Modi) यांची भेट घेतली. महाराष्ट्राचे विविध प्रश्न घेऊन अजित पवार (Ajit Pawar) आणि अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांच्या साथीने त्यांनी मोदींशी चर्चा केली. त्यानंतर वैयक्तिक अर्धा तास त्यांनी मोदींशी हितगूज केलं. याच हितगुजाने महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलेल, महाविकास आघाडीत आता फूट पडेल, ठाकरे-मोदींचं काय ठरलंय? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत. त्यात राष्ट्रवादी अडीज वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावर दावा सांगणार आहे, अशी चर्चा सर्वाधिक आहे. याच अतिमहत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामना रोखठोकमधून दिलं आहे. (What is the formula of Shiv Sena-NCP for the Chief Minister of maharashtra Sanjay Raut Saamana Rokhthok)

शिवसेना-राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला काय?

महाराष्ट्रात पुन्हा उलथापालथ होईल व राजकीय समीकरणे बदलतील अशा पुड्या अधूनमधून सोडल्या जात आहेत. मुख्यमंत्र्यांच्या धावत्या दिल्ली भेटीने त्या पुड्या जरा जास्त गरम झाल्या. अडीच वर्षांनंतर मुख्यमंत्रीपदावर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे दावा सांगितला जाईल व तेथे आघाडीत वादाची ठिणगी पडेल. त्या वादातून राज्यात नव्या राजकीय घडामोडींना वेग येईल, असे जे पसरवले जात आहे त्यात काहीच तथ्य नाही. शिवसेनेला मुख्यमंत्रीपद हा ‘पाच’ वर्षांसाठी दिलेला शब्द आहे, असं म्हणत पाच वर्ष मुख्यमंत्रिपदाच्या गादीवर उद्धव ठाकरेच बसतील असं एकप्रकारे संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्रातील तीनही राजकीय पक्ष जे आता सत्तेत आहे, त्यांना सत्ता टिकवणं का गरजेचं आहे किंबहुना महाराष्ट्रातलं सरकार कोणत्या कारणांमुळे ढासळणार नाही, याची वेध संजय राऊत यांनी आजच्या रोखठोकमधून घेतला आहे.

महाराष्ट्रातील सत्ता टिकवणं तिनही पक्षांसाठी का गरजेचं?

राऊत म्हणतात, “महाराष्ट्रातील आघाडी सरकारात समन्वय उत्तम आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचा हस्तक्षेप नाही व मुख्यमंत्री स्वतंत्रपणे काम करीत आहेत. या व्यवस्थेस नख लागेल असे काहीच घडणार नाही. महाराष्ट्रातील सरकार चालविणे व टिकवणे ही आघाडीतील तिन्ही पक्षांची गरज आहे.”

“मजबुरी हा शब्द मी मुद्दाम वापरत नाही. केंद्रासह अनेक राज्यांत भाजपचे शासन आहे, पण महाराष्ट्रासारखे राज्य हाती नसेल तर इतर मोठी राज्ये हाती असूनही जीव रमत नाही. काँग्रेसकडे एखाद्-दुसरे राज्य आहे, पण महाराष्ट्राच्या सत्तेतील सहभाग सगळ्यात महत्त्वाचा. राष्ट्रवादी काँग्रेसदेखील महाराष्ट्राबाहेर विस्तारली नाही व हिंदुत्ववादाचा सगळ्यात मोठा ‘ब्रॅण्ड’ ठरूनही शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मोठी झेप घेता आली नाही. अशा वेळी महाराष्ट्राची सत्ता टिकवणे हे तीनही पक्षांना आवश्यक आहे.”

ठाकरे आणि मोदींमधला संवाद वाढलाय

राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यापैकी एक पक्ष बाहेर पडल्याशिवाय सरकार पडणार नाही हे अमित शहा यांनी एकदा स्पष्ट केले. परिस्थिती अद्यापि तीच आहे. ईडी, सीबीआयसारख्या तपास यंत्रणांचा वापर करून एखाद् दुसरा आमदार गळास लागेल, पण त्यातून बहुमताचा आकडा जमणार नाही हे सत्य स्वीकारण्याची मानसिकता विरोधकांनी ठेवायला हवी. सरकार बदलाचा एकही पर्याय यशस्वी होण्याची शक्यता आज तरी दिसत नाही. त्यात मुख्यमंत्री ठाकरे व दिल्लीतील संवाद वाढला आहे व तो थेट पंतप्रधान मोदी यांच्याशी आहे.

ठाकरेंच्या नेतृत्वाखाली सरकार बनताना मोदी-शहांनी अडथळा आणला नाही, याचा अर्थ…..

शिवसेना-भारतीय जनता पक्षाचे सरकार आलेच असते व त्यात पुन्हा एकदा शिवसेना दुय्यम भूमिकेत सहभागी झाली असती तर नवे काय घडले असते? पण शिवसेनेचा मुख्यमंत्री असलेल्या सरकारमध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी सहभागी झाली हे चित्र कलाटणी देणारे ठरले. इथे एक लक्षात घेतले पाहिजे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनत असताना पंतप्रधान मोदी व गृहमंत्री अमित शहा यांनी त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला नाही. याचा अर्थ महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी कधीच समजून घेतला नाही.

मोदी-ठाकरे भेट वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारी ठरो…

कोविड काळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून उत्तम नेतृत्व केले. त्याचे कौतुक जगात झाले. ठाकरे यांची प्रतिमा मुख्यमंत्री म्हणून नक्कीच उत्तम आहे. सगळे बरे चालले असताना बसलेली घडी विस्कटण्याचा विचार कोण करेल? दिल्लीच्या धावत्या भेटीचे कवित्व हे फक्त बुडबुडेच आहेत. मोदी-ठाकरे भेटीचे फलित हे वर्तमानापेक्षा भविष्याचा वेध घेणारेच ठरो.

(What is the formula of Shiv Sena-NCP for the Chief Minister of maharashtra Sanjay Raut Saamana Rokhthok)

हे ही वाचा :

उद्धव ठाकरेंचा फोन, ‘मिलना हैं, अब मेरे साथ दो साथी है’, मोदींचा लगोलग रिप्लाय; राऊतांच्या ‘रोखठोक’मधून इनसाईड स्टोरी

Udhav Thackeray PM Modi Meet Live | पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात स्वतंत्र बैठक, अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली?, वाचा महत्त्वाचे आणि मोठे 10 मुद्दे

मोदी-ठाकरेंची व्यक्तिगत भेट झाली असेल तर स्वागतच, या भेटीचा राज्याला फायदाच होईल: फडणवीस

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.