पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचं मन जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर

संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता 'महिलांना आरक्षण देईन', असं तत्काळ उत्तर दिलं.

पंतप्रधान झालात तर पहिला निर्णय कोणता घ्याल? करोडो महिलांचं मन जिंकणारं राहुल गांधींचं उत्तर
देशाला मजबूत आर्थिक धोरणांची गरज, जुमलेबाजी नको; बजेटपूर्वीच काँग्रेसची टीका
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 9:12 AM

चेन्नई : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी कन्याकुमारी येथील सेंट जोसेफ मॅट्रिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विझिटर्ससोबत दिवाळी साजरी केली. यादरम्यानच्या एका संभाषणाचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत ही दिवाळी छान साजरी झाल्याचं त्यांनी म्हटलं. याचवेळी संभाषणादरम्यान, पंतप्रधान झालात तर पहिला कोणता निर्णय घ्याल, असा प्रश्न राहुल गांधींना विचारण्यात आला. यावेळी त्यांनी क्षणाचीही विलंब न लावता ‘महिलांना आरक्षण देईन’, असं तत्काळ उत्तर दिलं.

“जर मला कोणी विचारले की तुम्ही तुमच्या मुलांना काय शिकवाल, तर मी विनम्रता शिकवेन. कारण विनम्रता ही अशी गोष्ट आहे की त्यामुळे तुम्हाला समज यायला मदत होते”, असंही राहुल गांधी म्हणाले. राहुल यांना भेटण्यासाठी आलेल्या शिष्टमंडळातील एका सदस्याने राहुल आणि प्रियांकाच्या शेतकरी संघर्षातील सहभागाचे कौतुक केले. यातून तुमची लोकांशी असलेली एकजूट दिसून येते, अशा शब्दात त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांकांचं कौतुक केलं.

राहुल गांधींकडून मित्रांसाठी छोले भटुरे आणि कुल्फीची ऑर्डर

रात्रीच्या जेवणाची वेळ असल्याने, राहुल गांधींना त्यांच्या तामिळनाडूतील मित्रांसाठी काही खास दिल्लीच्या जेवणाची व्यवस्था करायची होती आणि त्यांनी छोले भटुरे आणि कुल्फी मागवली. सेंट जोसेफ मॅट्रिक हायर सेकंडरी स्कूल, मुलुगुमुडू, कन्याकुमारी (तामिळनाडू) येथील मित्रांसोबतचे संभाषण आणि रात्रीच्या जेवणाप्रसंगीचे काही क्षण राहुल गांधींनी ट्विट केले. “मित्रांच्या भेटीने दिवाळी आणखी खास बनली. संस्कृतींचा हा संगम आपल्या देशाची सर्वात मोठी ताकद आहे आणि ती आपण जपली पाहिजे”, असं राहुल गांधी म्हणाले. ही तीच शाळा आहे ज्या शाळेला राहुल गांधींनी मार्च महिन्यात भेट दिली होती.

शनिवारी काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी भाऊबीजेच्यानिमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचे एक जुने छायाचित्र ट्विटरवर शेअर केले होते. माझा भाऊ करुणा, प्रेम आणि धैर्याने सत्यासाठी लढत आहे याचा मला अभिमान आणि आनंद आहे. तुम्हा सर्वांना भाऊबीजेच्या खूप खूप शुभेच्छा. प्रियंका गांधींनी खास फोटो शेअर करताना बालपणीच्या आठवणी जागवल्या. “हा फोटो त्यावेळचा आहे ज्यावेळी माझ्या भावाने नेमबाजी स्पर्धेत बरीच पदके जिंकली होती”, असं प्रियांकांनीही ट्विटरच्या माध्यमातून सांगितलं.

हे ही वाचा :

नगर आगीच्या दुर्घटनेत 11 जणांचा मृत्यू, राऊत सरकारवर भडकले, म्हणतात, अश्रू ढाळू नका, ‘काय पावलं उचलणार ते सांगा’

जागेचं अधिग्रहणच नाही, तर कारवाई कसली करताय? औरंगाबादच्या सर्वात मोठ्या वादाचा Ground Report

Special Story | सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा आहे? मग ‘या’ खास ठिकाणांना नक्की भेट द्या!

... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?
'लाडक्या बहिणीं'नो तुमच्यासाठी मोठी बातमी, डिसेंबरचा हफ्ता कधी मिळणार?.
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?
अध्यक्ष महोदय बोट दुर्घटना तुमच्याच मतदारसंघातील, दादा असं का म्हणाले?.
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका
'बहुमत मिळाल्यानं गांगरून गेलेत', मनसे नेत्याची महायुतीवर सडकून टीका.
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर
...म्हणून भूजबळांना महायुतीच्या मंत्रिमंडळातून डावललं, कारणं आली समोर.