जळगावच्या राजकारणात भूकंपाचे संकेत? गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार? वाचा A टू Z माहिती

भाजपचे जेष्ठ नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांच्या मतदारसंघातले भाजपचे पदाधिकारी दिलीप खोपडे यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेशाने जामनेरमधील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दिलीप खोपडे भाजपचा राजीनामा देत 21 सप्टेंबरला पक्षप्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहेत. जळगावच्या जामनेर मतदारसंघात शरद पवारांचा दिलीप खोपडे यांना पक्षात घेऊन मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात मोठा डाव आहे. दिलीप खोपडे मंत्री गिरीश महाजन यांच्याविरुद्ध जामनेर मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे.

जळगावच्या राजकारणात भूकंपाचे संकेत? गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार? वाचा A टू Z माहिती
गिरीश महाजन यांच्या मतदारसंघात राजकीय समीकरण बदलणार?
Follow us
| Updated on: Sep 18, 2024 | 5:34 PM

किशोर पाटील, Tv9 प्रतिनिधी, जळगाव : जळगावच्या जामनेरमधील भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप खोपडे यांनी दोन दिवसांपूर्वी भाजपचा राजीनामा दिला. ते शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याने जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात चर्चा रंगली आहे. दिलीप खोपडे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशामुळे त्यांना जामनेर मतदारसंघातून उमेदवारी देऊन शरद पवार हे गिरीश महाजन यांच्याविरुद्ध मोठा डाव खेळणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान मराठा चेहरा असलेले दिलीप खोपडे यांच्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत जामनेर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार आहेत. दरम्यान, 16 सप्टेंबरला व्हायरल झालेल्या ट्विटरच्या ट्वीटच्या माध्यमातून दिलीप खोपडे हे शरद पवार गटाच्या वाटेवर असून त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे समोर आलं. या चर्चेवर दिलीप खोपडे यांनी भाजप पक्ष सोडून शरद पवार गटात जात असल्याचे सांगितलं.

दिलीप खोपडे यांनी भाजप पक्ष सोडण्याची कारणे सांगितली. यात निर्णय प्रक्रियेत विचारात घेतलं जात नाही, भाजप पक्ष हा ज्या ध्येय धोरणांवर चालत होता तो तसा आता चालत नाही, गिरीश महाजन यांच्याकडे कार्यकर्त्यांची कामे घेऊन जातो मात्र कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात, माझा कुठल्याही नेत्याविरुद्ध राग नाही, असं सांगत त्यांनी अप्रत्यक्षरीत्या मंत्री गिरीश महाजन यांच्यावर नाराजी व्यक्त केली. तसेच आपण 21 सप्टेंबरला शरद पवार यांच्या उपस्थितीत शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याचं खोपडे यांनी जाहीर केलं. शरद पवार गटातून जामनेर मतदारसंघातून उमेदवारी मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या विरुद्ध निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

गिरीश महाजन यांची प्रतिक्रिया काय?

  • दिलीप खोपडे यांच्याबाबत विचारले असता मंत्री गिरीश महाजन यांनी नाराजी व्यक्त करत बोलण्यास नकार दिला. मात्र गेल्या सहा-सात टर्म पासून आपल्या विरोधात अनेक जण लढा देऊन थकले, आता कोणालाही येऊ द्या, आणि गंमत बघा. घोडा-मैदान समोर आहे. निवडणूक संपल्यावर माझ्याशी बोला, अशा प्रकारची प्रतिक्रिया मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. दरम्यान, मराठा नेते मनोज जरांगे यांनी जामनेरमध्ये 1 लाख 36 हजार मराठा समाजाची आणि कुणबी समाजाची मतं आहेत, असं सांगितलं. त्याचा विधानसभा निवडणुकीत कसा परिणाम होवू शकतो ते पाहूया.
  • जामनेर मतदारसंघात नुकत्याच लोकसभेच्या झालेल्या निवडणुकीनुसार ३ लाख १८ हजार ३६६ एवढे मतदार आहेत
  • मराठा कुणबी समाजाचे एकूण १ लाख ४० हजार ते १ लाख ५० हजार एवढे मतदार आहेत ( एकूण मतदानाच्या ४५ ते ५० टक्के)धनगर समाजाचे २० हजार मतदार आहेत (एकूण मतदानाच्या ७ टक्के)
  • बंजारा समाज २५ हजार (७ टक्के)
  • मंत्री गिरीश महाजन ज्या समाजातून आहेत त्या गुजर समाजाचे १८ ते २० हजार मतदार आहेत (७ टक्के)
  • मुस्लिम समाजाचे ५० हजार (१६ टक्के)
  • इतर समाजाचे ४० ते ४५ हजार (३ टक्के)अशा पद्धतीने जामनेर विधानसभा निवडणुकीत मराठा आणि कुणबी समाजाची ४५ ते ५० टक्के मतदार असून ते निर्णायक मतदार आहेत.

२०१९ चा विधानसभा निवडणुकीच्या निकाल काय सांगतो?

  • २०१९ च्या निवडणुकीत जामनेर विधानसभा निवडणुकीत मतदारांची आकडेवारी ही ३ लाख ८ हजार ९९५ एवढे मतदार होते. यात एकूण वैध मतांची संख्या २ लाख ८ हजार ७६५ एवढी होती.
  • जामनेर विधानसभा मतदारसंघात २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे संजय गरुड यांच्यात मुख्य लढत झाली होती.
  • संजय गरुड हे मराठा चेहरा म्हणून गिरीश महाजन यांच्या विरोधात मैदानात उतरले.
  • या निवडणुकीत गिरीश महाजन यांना १ लाख १४ हजार ७१४ एवढे मतं पडली होती. तर राष्ट्रवादीचे संजय गरुड यांना ७९ हजार ७०० एवढी मते पडली होती. यात एकूण मतदानाच्या ५४.९५ टक्के मते गिरीश महाजन यांना मिळाली होती.
  • या निवडणुकीत ३५ हजार १४ एवढ्या मतांनी गिरीश महाजन यांनी संजय गरुड यांचा पराभव केला होता.
  • या निवडणुकीत मंत्री गिरीश महाजन यांना मिळालेल्या मतांपैकी समाजनिहाय मतदानाचा विचार केल्यास, मराठा आणि कुणबी समाजाचे ४० ते ५० मतदान झाले होते. तर मुस्लिम आणि इतर समाजाचे ७० ते ८० टक्के मतदान होते.
  • गिरीश महाजन यांचे विरोधक असलेले संजय गरुड हे आता भाजपमध्ये आले आहेत. त्यामुळे सध्या तरी गिरीश महाजन यांच्यासमोर प्रबळ आणि सक्षम उमेदवार नाहीत. मात्र सामाजिक समीकरणं आणि जरांगे पाटील फॅक्टर या आधारावर शरद पवार गिरीश महाजनांच्या विरोधात उमेदवार देवून तगडं आव्हान उभं करण्याची शक्यता आहे.

जरांगे पाटील यांच्या इशाऱ्याचा फटका बसणार?

मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना दिलेल्या धमकी वजा इशाऱ्याचा येणाऱ्या निवडणुकीत काय परिणाम होईल? याबाबत राजकीय विश्लेषकांची सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेतली. यात जरांगे पाटील यांनी केलेल्या आवाहनाला मराठा समाजाने पाठींबा दर्शविला तर यंदाची विधानसभा निवडणूक ही निश्चित गिरीश महाजन यांना अवघड जावू शकते, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. गिरीश महाजन यांच्या विरोधात असलेले त्यांचे विरोधक यंदाच्या निवडणुकीत जरांगे पाटील यांच्या फॅक्टरचा उपयोग हत्यार म्हणून निवडणुकीत करतील.

लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात ज्याप्रमाणे जरांगे पाटील यांचा फॅक्टर चालला, स्वत: जरांगे पाटील यांनी या जामनेरमध्ये तळ ठोकून लक्ष घातलं, तर गिरीश महाजन यांच्यासमोरच्या अडचणी वाढू शकतात, असं राजकीय विश्लेषक सांगतात. मात्र दुसरीकडे जरांगे पाटील फॅक्टर असला तरी गिरीश महाजन यांनी गेल्या ३० ते ३५ वर्षात केलेली विकास कामे, आरोग्याच्या माध्यमातून केलेली कामे, त्यांचा मतदारसंघातील प्रभाव पाहता, गिरीश महाजन यांचा पराभव होईल हे सांगण आज धाडसाचं असेल असेही राजकीय विश्लेषक म्हणतात.

मात्र हवा कोणत्याही बाजूने पलटू शकते, लाट कोणत्याही क्षणाला तयार होवू शकते आणि परिवर्तीत देखील होवू शकते, त्यामुळे जरांगे पाटील यांचा इशारा हा गिरीश महाजन यांना सावधगिरीचा इशारा मानावा लागेल. आणि गिरीश महाजन यांना गांभीर्याने घ्यावा लागेल असं सुद्धा राजकीय विश्लेषक सांगतात.

गिरीश महाजन यांच्यापुढे मोठं आव्हान

जामनेरमधून यंदाच्या विधानसभेत मंत्री गिरीश महाजन यांना कुठलाही विरोध शिल्लक नसल्याचे चित्र असतानाच दिलीप दिलीप खोपडे यांच्या राजीनाम्यामुळे तसेच ते शरद पवार गटात जाणार असल्यने जामनेरमध्ये भाजपला हा मोठा धक्का मानला जात आहे. काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन जामनेरमधून कसे निवडून येतात, सव्वा लाख मतं मराठ्यांची आहेत, असं सांगत मनोज जरांगे पाटील यांनी गिरीश महाजन यांना यापूर्वीच थेट आव्हान दिलं आहे.

दिलीप खोपडे यांना शरद पवार गटातून उमेदवारी मिळणार असल्याचं सध्या स्थितीत सांगितलं जात आहे. खोपडे मराठा चेहरा आहेत. आपल्याला मराठा नव्हे तर सर्व समाज आपल्या पाठीशी असल्याचे खोपडे यांनी बोलून दाखवलं. दुसरीकडे जरांगे पाटील यांचा खोपडे यांना पाठिंबा मिळणार आणि शरद पवार यांची पॉवर यामुळे सलग सहा ते सात टर्म आमदार असलेल्या गिरीश महाजन यांना खोपडे पराभूत करून विजय होतील, अशी चर्चा आतापासून रंगली आहे. दिलीप खोपडे यांच्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांना विधानसभेची निवडणूक आता पाहिजे तेवढी सोपी राहिलेली नाही, अशी सुद्धा चर्चा जिल्ह्यात रंगली आहे.

संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.