‘ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात’

राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. | Sanjay Raut

'ठाकरे संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता उफाळून येते, शत्रूला अधिक घातक ठरतात'
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jun 20, 2021 | 8:30 AM

मुंबई: ठाकरे घराण्यातील लोक संकटात सापडले की त्यांची गुणवत्ता अधिक उफाळून येते. ते शत्रूला अधिक घातक ठरतात, असे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’तील रोखठोक या सदरातून संजय राऊत (Sanjay Raut) यांनी राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा, यामधील अंतर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यकर्ता किंवा राजा याची पुंगी वाजवणे ही काही देशभक्ती नाही. चुका करणाऱ्य़ा राजाला सत्य, परखड बोल सुनावणे ही खरी राष्ट्रनिष्ठा असते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. (Shivsena MP Sanjay takes a dig at BJP)

राष्ट्रनिष्ठा काय असते यासाठी संजय राऊत यांनी फ्रान्सचे लष्करी अधिकारी द गॉल यांचा दाखला दिला आहे. द गॉल हे एक मानी स्वभावाचे गृहस्थ होते. दुसऱ्य़ा महायुद्ध काळात त्यांच्या सत्यवादाचा कस लागला. हिटलरच्या संभाव्य हल्ल्याच्या प्रतिकारार्थ तेव्हाच्या फ्रेंच सरकारने अब्जावधी रुपये खर्च करून मॅजिनो तटबंदी उभारली. ही तटबंदी अभेद्य आहे, असा डंका फ्रेंच सरकारी तज्ञ पिटत असतानाच द गॉलने एक पुस्तक लिहून मॅजिनो तटबंदी कशी कुचकामी आहे हे पुराव्यासह दाखवून दिले. फ्रेंच सरकार व लष्करी अधिकारी द गॉलवर भडकले व तो देशनिष्ठ नसल्याचा अपप्रचार सुरू केला, पण द गॉलचेच म्हणणे शंभर टक्के बरोबर होते. याचा अनुभव फ्रान्सने लगेच घेतला. जर्मन फौजांनी स्वारी केली. मॅजिनो तटबंदी जर्मन फौजेला चार दिवसही रोखू शकली नाही. द गॉलने सत्य सांगितले यापेक्षा राष्ट्रनिष्ठा दुसरी कोणती असू शकते? जर्मन सेनापती जनरल रोमेलविषयी अशी ख्याती होती की, तो अडचणीत सापडला की शत्रूला अधिक घातक ठरे. काही व्यक्तीचे रसायनच असे असते की संकट काळात त्यांची गुणवत्ता आणि राष्ट्रनिष्ठा उसळून येते. टिळक, गांधी, चर्चिल, सावरकर, ठाकरे ही या वर्गातील माणसे. द गॉल यांचा वर्ग तोच, असे मत संजय राऊत यांनी ‘रोखठोक’ या सदरातून मांडले आहे.

‘अयोध्या घोटाळ्याविरुद्ध आवाज उठवणाऱ्यांना हिंदुद्रोही ठरवणे म्हणजे विकृती’

अयोध्येतील जमीन घोटाळ्याविरोधात आवाज उठवला म्हणून भाजपचे नेते शिवसेनेला हिंदुद्रोही आणि राजद्रोही ठरवत आहेत. ही एकप्रकारची विकृती आहे. ही रामनिष्ठा नसून राजनिष्ठा आहे. याच्याशी देशभक्तीचा काडीमात्र संबंध नाही, असे खडे बोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला सुनावले आहेत. देशभक्ती आणि राजनिष्ठा या दोन वेगवेगळ्या संकल्पना आहेत. देशावर प्रेम करणे व राज्यकर्त्यांवर प्रेम करणे या दोन भिन्न गोष्टी आहेत. आपल्या देशात त्याची गल्लत होत आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक जोड्याने हाणतील; उद्धव ठाकरेंचा काँग्रेसला अप्रत्यक्ष इशारा

‘…यालाच शिवसैनिक म्हणतात’, दादरमधील राड्यावर उद्धव ठाकरेंचा अप्रत्यक्ष निशाणा

हाणामारी, रक्तपात हा आपला गुणधर्म नाही, मुंबई दंगलीवेळी शिवसैनिक जगाने पाहिला : उद्धव ठाकरे

(Shivsena MP Sanjay takes a dig at BJP)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.