शिवसेनेच्या गडाला खिंडार ते जन आशीर्वादचे सूत्रधार; कसं आहे संजय केळकर यांचं राजकारण?
ठाण्याचे आमदार संजय केळकर हे अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले आहेत. सामाजिक कार्यामुळे केळकर सर्वांना माहीत होतेच. (who is mla sanjay kelkar?, know details)
मुंबई: ठाण्याचे आमदार संजय केळकर हे अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले आहेत. सामाजिक कार्यामुळे केळकर सर्वांना माहीत होतेच. मात्र, आमदार झाल्यानंतर राजकीय वलय प्राप्त झाल्याने ते अधिक परिचित झाले. विशेष म्हणजे ठाण्यात 25 वर्षानंतर कमळ फुलविल्यामुळे ते अधिकच चर्चेत आले. (who is mla sanjay kelkar?, know details)
25 वर्षानंतर कमळ फुलले
संजय केळकर हे भाजपच्या तरुण आमदारांपैकी एक आहेत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत ते विधानसभेवर निवडून गेले. विशेष म्हणजे 1985 शिवसेनेच्या ताब्यात असलेल्या गडाला त्यांनी सुरुंग लावत विधानसभेत प्रवेश केला. 25 वर्षानंतर पहिल्यांदाच केळकर यांच्या रुपाने भाजपचा उमेदवार कमळावर निवडणूक लढला आणि विजयी झाला. त्यामुळे केळकर चर्चेत आले.
सामाजिक कार्यात आघाडीवर
केळकर हे अनेक सामाजिक संस्थांशी निगडीत आहेत. राजकारणापेक्षा त्यांचं सामाजिक कार्य मोठं आहे. त्यामुळेच त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना मानद कमांडर ही पदवी देण्यात आली. लेफ्टनंतर जनरल समन्वार व तत्कालीन पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांनी लष्करी वेष देऊन केळकर यांचा गौरव केला होता. सह्याद्री प्रतिष्ठान आणि राष्ट्रीय संस्थेने पिंपरी-चिंचवड येथे झालेल्या कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता. चार वर्षापूर्वी हा सोहळा परा पडला होता.
फोन येताच मदत
कोरोना संकटात केळकर यांनी गोरगरीब आणि गरजूंना मोठी मदत केली. ही मदत त्यांनी केवळ मतदारसंघापुरती मर्यादित ठेवली नाही. तर ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, रायगड आणि इतर कुठूनही फोन आला की तिथे तातडीने मदत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. ठाण्यातील कौसा, मुंब्रा, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, इंदिरा नगर, कोपरी, पाचपाखाडी आणि लोकमान्य नगरातील रहिवाश्यांना मदत देण्यासाठी त्यांनी नियोजनच केलं होतं. येथील नागरिकांना मदत देण्यासाठी त्यांनी सातत्याने राज्य सरकार आणि ठाणे पालिकेशीही पत्रव्यवहार केला होता.
ऑन कॉल औषध सेवा
डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मास्क आणि सॅनिटाझरचे वाटप केले. एवढेच नव्हे तर रुग्णांना तातडीने औषधे मिळावीत म्हणून त्यांनी ऑन कॉल औषध सेवा सुरू केली. त्यामुळे अनेक रुग्णांना वेळेत औषधे मिळू शकली. नाभिक आणि पौराहित्य करणाऱ्या समाजाचा रोजगार बंद झाला होता. त्यामुळे या लोकांना त्यांनी रेशन सामान दिलं.
भाजी वितरण ते कम्युनिटी किचन
लॉकडाऊनच्या काळात भाजी विक्रेत्यांचा धंदा बसला. ग्राहकही कोरोनाच्या भीतीने घराबाहेर पडत नव्हते. त्यामुळे त्यांनी ग्राहक आणि वितरणाची समस्या सोडवण्याकरिता त्यांनी भाजी वितरणाची व्यवस्था केली. त्यामुळे विक्रेते आणि ग्राहक दोघांचाही प्रश्न सुटला. तसेच बेरोजगार, गरीब आणि बेघरांसाठी त्यांनी कम्युनिटी किचनच्याद्वारे भोजनाची व्यवस्थाही केली. एवढेच नव्हे तर आंबे वितरकांचे नुकसान होऊ नये म्हणून त्यांच्या आंबे विक्रीचा प्रश्नही त्यांनी मार्गी लावला.
जन आशीर्वाद यात्रेचे सूत्रधार
आजपासून भाजपची जन आशीर्वाद सुरू झाली आहे. भाजपच्या चार केंद्रीय मंत्र्यांची राज्यातील वेगवेगळ्या भागात ही यात्रा असेल. या जन आशीर्वाद यात्रेची सर्व सूत्रे संजय केळकर यांच्याकडे देण्यात आली आहेत. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची यात्रा 16 ते 20 ऑगस्ट या काळात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची यात्रा 16 ते 20 ऑगस्ट या काळात , केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांची यात्रा 16 ते 21 ऑगस्ट या काळात तर केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांची यात्रा 19 ते 25 ऑगस्ट या काळात निघणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. या यात्रेची व्यवस्था पाहण्यासाठी त्यांनी काही पदाधिकाऱ्यांची नियुक्तीही केली आहे. (who is mla sanjay kelkar?, know details)
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 16 August 2021 https://t.co/N83KSL50Ad #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 16, 2021
संबंधित बातम्या:
‘पाणीवाली बाई’मुळे आयुष्याला टर्निंग पॉईंट मिळाला; वाचा, कशी आहे विद्या चव्हाणांची राजकीय जडणघडण!
प्रशांत ठाकूर; डॅशिंग, कार्यसम्राट आणि घराण्याचा वारसा असलेला राजकारणी!
(who is mla sanjay kelkar?, know details)