गोल्ड मेडलिस्ट आणि राजकीय घराणं; वाचा, कोण आहेत नमिता मुंदडा?

भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्रातील राजकारणात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. (who is namita mundada?, know her politics in beed)

गोल्ड मेडलिस्ट आणि राजकीय घराणं; वाचा, कोण आहेत नमिता मुंदडा?
namita mundada
Follow us
| Updated on: Apr 04, 2021 | 7:18 PM

मुंबई:  भाजपच्या आमदार नमिता मुंदडा यांनी महाराष्ट्रातील राजकारणात स्वत:च स्थान निर्माण केलं आहे. उच्च शिक्षित आणि प्रचंड लोकसंपर्क असलेल्या नेत्या म्हणून त्या प्रसिद्ध आहे. मुंदडा घराणं गेल्या दोन ते तीन दशकापासून महाराष्ट्रातील राजकारणात आहे. बीड जिल्ह्यात तर मुंदडा घराण्याचा मोठा दबदबा आहे. नमिता मुंदडा यांची राजकीय कारकिर्द कशी आहे? यावर टाकलेला हा प्रकाश… (who is namita mundada?, know her politics in beed)

गोल्ड मेडलिस्ट

नमिता मुंदडा या राज्याच्या माजी मंत्री, दिवंगत डॉ. विमल मुंदडा यांच्या स्नुषा आहेत. नमिता या वास्तूशास्त्रातील पदवीधर आणि गोल्ड मेडलिस्ट आहेत. त्यांनी परदेशातील पदवीही घेतली आहे.

तरीही पराभव

विमल मुंदडा यांच्या राजकीय कारकिर्दीला भाजपमधून सुरुवात झाली होती. परंतु, नंतर त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्या पाच टर्म आमदार राहिल्या आहेत. तसेच आघाडी सरकारमध्ये दहा वर्ष कॅबिनेट मंत्री होत्या. विशेष म्हणजे राष्ट्रवादीतील त्या एकमेव महिला मंत्री होत्या. त्यामुळे साहजिकच नमिता मुंदडा यांनी सुद्ध राष्ट्रवादीतून राजकारणाला सुरुवात केली. परंतु, 2014 च्या विधानसभा निवडणुकीत नमिता यांना केज विधानसभा मतदारसंघातून पराभव पत्करावा लागला होता. त्यांना भाजपच्या संगीता ठोंबरे यांनी पराभूत केले होते. या निवडणुकीत संगीता ठोंबरे यांना 1 लाख 834 मते मिळाली होती. तर नमिता मुंदडा यांना अवघे 64 हजार 113 मते मिळाली होती. तब्बल 40 हजार मतांनी नमिता यांचा पराभव झाला होता.

पक्ष बदलला, विजय झाला

2019च्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत: नमिता मुंदडा यांचं तिकीट घोषित केलं होतं. मात्र, ही घोषणा केल्यानंतर त्यांची एक फेसबुक पोस्ट व्हायरल झाली, त्यातून राष्ट्रवादीचे चिन्ह गायब होतं. ऐनवेळी नमिता मुंदडा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे जाहीर केलेला उमेदवार बदलण्याची नामुष्की पवारांवर आली होती. त्यानंतर भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवू त्या विजयी झाल्या आहेत.

आठ महिन्यांच्या गर्भवती, विधानसभेत हजेरी

गेल्या वर्षी गर्भवती असतानाही नमिता मुंदडा आठव्या महिन्यात विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला हजेरी लावत असत. विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला मुंदडा पहिल्या दिवसापासून उपस्थित राहायच्या. यंदाही विधिमंडळात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांचं अभिनंदन केलं.

केजचं समीकरण

केज विधानसभा मतदारसंघांमध्ये वंजारी समाजाचे मतदान निर्णायक समजलं जातं. केजमध्ये मराठा समाजाची मते एक लाखापेक्षा अधिक असली तरी वंजारी समाजाची सुमारे 80 हजार मते आहेत. मात्र, ही एकगठ्ठा व्होटबँक असल्याने वंजारी समाजाची मते निर्णायक मानली जातात. केजमध्ये मुस्लिम समाजाची व्होटबँकही मजबूत आहे. केजमध्ये 45 हजार मतदान हे मुस्लीम समाजाचं आहे. तसेच 50 हजार मतदान हे इतर मागासवर्गीय समाजाचे आहे. (who is namita mundada?, know her politics in beed)

असा आहे राजकीय प्रवास

>> नमिता मुंदडा या बीडमधील केज मतदारसंघातून भाजप आमदार >> नमिता मुंदडा दिवंगत विमल मुंदडा यांच्या सूनबाई आहेत. >> 2014 ला भाजपच्या उमेदवार संगीता ठोंबरे यांनी 42 हजार 721 मतांनी विजय मिळवला होता. त्यांच्याविरोधात नमिता मुंदडा या राष्ट्रवादीच्या उमेदवार होत्या. >> दिवंगत लोकनेत्या डॉ. विमल मुंदडा या सलग पाच वेळा केज मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. >> विमल मुंदडा यांनी भाजपातून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली. >> भाजपकडून दोनदा आणि राष्ट्रवादीतून तीनदा त्या निवडून आल्या. तसेच नऊ वर्षे त्यांनी विविध खात्यांचे मंत्रिपद सांभाळले. >> राष्ट्रवादीत असताना मुंदडा कुटुंबाचे वेगळे अस्तित्व होते. राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बजरंग सोनावणे यांच्यासोबत मुंदडा कुटुंबाचे कधीच पटले नाही. (who is namita mundada?, know her politics in beed)

संबंधित बातम्या:

21 व्या वर्षी राजकारणात, विलासरावांचे वारस; कसं आहे अमित देशमुखांचं राजकारण?

प्रवाहाविरुद्ध राजकारण, प्रस्थापितांना घरी बसवलं; वाचा, दादा भुसेंची ‘राज’नीती

नवी मुंबईचे ‘गॉड’, शिवसेना, राष्ट्रवादी ते भाजप…; कसा आहे गणेश नाईकांचा राजकीय प्रवास?, वाचा!

(who is namita mundada?, know her politics in beed)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.