Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : मविआच्या बॅक रुम बॉईजचं गणितच कच्चं! शिवसेनेचे परब, देसाई, नार्वेकर फेल! राष्ट्रवादी-काँग्रेसवाले नेमके कसे सावध राहिले?

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 : राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे सर्वांनाच माहीत होतं. अपक्षांना फोडलं जाणार हे सुद्धा सर्वांना माहीत होतं. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांनी या निवडणुकीत बॅक रूम बॉईजची भूमिका निभावली.

Maharashtra Rajya Sabha Election Results 2022 :  मविआच्या बॅक रुम बॉईजचं गणितच कच्चं! शिवसेनेचे परब, देसाई, नार्वेकर फेल! राष्ट्रवादी-काँग्रेसवाले नेमके कसे सावध राहिले?
मविआच्या बॅक रुम बॉईजचं गणितच कच्चं ! शिवसेनेचे परब, देसाई, नार्वेकर फेल! राष्ट्रवादी-काँग्रेसवाले नेमके कसे सावध राहिले?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 12, 2022 | 2:50 PM

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha Election) शिवसेनेच्या संजय पवारांचा (sanjay pawar) पराभव झाला आहे. त्यानंतर आता आरोपप्रत्यारोप सुरू झाले आहेत. मात्र, या निवडणुकीत मविआच्या बॅक रूम बॉईजचं गणितचं कच्च असल्याचं समोर आलं आहे. महाविकास आघाडीने (maha vikas aghadi) अपक्ष आमदार आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची जुळवाजुळव केली. पण या आमदारांनी शिवसेनेसोबत राहून भाजपला मतदान केलं. त्यामुळे शिवसेनेला आपल्या उमेदवाराला निवडून आणता आलेलं नाही. शिवसेनेचे अनिल परब, अनिल देसाई आणि मिलिंद नार्वेकर हे सर्व मातब्बर नेते जुळवाजुळव करण्यात आणि अपक्षांना आपल्याकडे सपशेल अपयशी ठरल्याचं दिसून आलं आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी मात्र नेमकी सावध झालेली दिसून येत आहे. या दोन्ही पक्षांनी आपल्या आमदारांची मते आपल्याच उमेदवाराला दिली. पण त्यांच्याशी संबंधित आमदारांना आपल्यासोबत ठेवण्यात शिवसेनेला यश आलं नसल्याचंही दिसून येत आहे.

राज्यसभेच्या निवडणुकीत घोडेबाजार होणार हे सर्वांनाच माहीत होतं. अपक्षांना फोडलं जाणार हे सुद्धा सर्वांना माहीत होतं. त्यामुळे महाविकास आघाडीचे नेते आणि मंत्र्यांनी या निवडणुकीत बॅक रूम बॉईजची भूमिका निभावली. या नेत्यांनी या निवडणुकीत महत्त्वाची भूमिका पार पाडण्याचं काम केलं. पण त्यात ते अपयशी ठरले. या निवडणुकीत आघाडीच्या नेत्यांचं गणित चुकलं. ते इतकं की शिवसेनेचे संजय राऊत हे सहाव्या क्रमांकावर फेकल्या गेले. भाजपला अपक्षांनी मतदान केल्यामुळेच हे घडल्याचं सांगितलं जात आहे.

हे सुद्धा वाचा

राऊतांनी नावंच जाहीर केली

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मतदान न करणाऱ्या सहा आमदारांची नावेच जाहीर केली. माझ्याकडे सहा आमदारांची यादी आहे. अपक्ष आमदार संजय मामा शिंदे, श्यामसुंदर शिंदे, देवेंद्र भुयार यांच्यासह बहुजन विकास आघाडीच्या तीन आमदारांनी मतदान केलं नसल्याचं राऊत यांनी सांगितलं. राजकीय तज्ज्ञांच्या मते, छोटे पक्ष आणि अपक्षांची मिळून महाविकास आघाडीची एकूण नऊ मते फुटली आहेत.

बॅक रूम बॉईजमध्ये कोण कोण?

शिवसेनेचे नेते अनिल परब, अनिल देसाई, सुनील प्रभू यांच्यावर मतांचा कोटा जमवण्याची जबाबदारी दिली होती. अपक्ष आणि छोट्या पक्षांना सांभाळण्याची जबाबदारी या तिन्ही नेत्यांकडे देण्यात आली होती. मिलिंद नार्वेकर हे सुद्धा या तीन नेत्यांसोबत बॅक रूम बॉईजचं काम करत होते. तर काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, सतेज पाटील, सुनील केदार, अस्लम शेख तर राष्ट्रवादीकडून अजित पवार आणि संजय खोडके यांच्यावर अपक्ष आणि छोट्या पक्षांना सांभाळण्याची जबाबदारी होती.

अपक्षांची नाराजी मुख्यमंत्र्यांवर

छोटे पक्ष आणि अपक्षांना सोबत राखणं हे आमच्यासाठी मोठं आव्हान होतं. त्यामुळे आम्ही अपक्ष आणि छोट्या पक्षाच्या आमदारांना प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांची समस्या ऐकून घेतली. त्यावेळी अनेकजण आघाडी सरकारवर नाराज असल्याचं दिसून आलं. सरकारची धोरणं, मतदारसंघात देण्यात येणाऱ्या निधीची कमतरता आणि मुख्यमंत्र्यांकडून न राहिलेला संवाद यावर हे आमदार नाराज होते. त्यामुळे आम्ही या अपक्ष आणि छोट्या पक्षांच्या आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासोबत बैठक घडवून आणली. शेवटच्या दिवसापर्यंत ही जुळवाजुळव सुरू होती. पण त्यात आम्ही यशस्वी झालो नाहीत हेच दिसून येतं, असं शिवसेनेच्या एका नेत्याने सांगितलं.

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.