जनता खड्ड्यात राजा गुळगुळीत रस्त्यांवर; सर्व सामान्यांना न्याय कधी मिळणार?, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray)  यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जनता खडबडीत रस्त्यांवर, जनता खड्ड्यात तर राजाचे रस्ते गुळगुळीत असा टोला त्यांनी लगावला आहे.

जनता खड्ड्यात राजा गुळगुळीत रस्त्यांवर; सर्व सामान्यांना न्याय कधी मिळणार?, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला
नितेश राणे, भाजप आमदार
Follow us
| Updated on: Dec 22, 2021 | 2:40 PM

सिंधुदुर्ग :  भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane)  यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकार ( Mahavikas Aghadi government) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray)  यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जनता खडबडीत रस्त्यांवर, जनता खड्ड्यात तर राजाचे रस्ते गुळगुळीत असा टोला त्यांनी लगावला आहे. ते सिंधुदुर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. आमच्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिला नसल्याची टीकाही राणे यांनी यावेळी केली.

महाविकास आघाडीच्या काळात जनतेचे हाल

पुढे बोलताना राणे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या काळात जनतेचे हाल सुरू आहेत. रस्त्यांची चाळणी झाली आहे. जागोजागी खड्ड्ये पडले आहेत. सामान्य जनता रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमधून मार्ग काढते, तर दुसरीकडे मात्र राजाचे रस्ते हे गुळगुळीत आहेत. आम्ही जेव्हा रस्त्यांच्या विकासासाठी पैसे मागतो, तेव्हा निधी शिल्लक नसल्याचे आम्हाला सांगितले जाते. मात्र दुसरीकडे विधानसभा मार्गावरील रस्ते गुळगुळीत बनवले जातात, हे राज्याचे दुर्दैव आहे. राज्यातील सर्व सुविधा एकाच कुटुंबासाठी का? असा सवाल उपस्थित करत नितेश यांनी ठाकरे कुटुंबावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.

राज्याला मुख्यमंत्री आहेत का?

दरम्यान आपल्या राज्याला मुख्यमंत्रीच राहिलेला नाही. राज्याचे अधिवेशन सुरू आहे, मात्र मुख्यमंत्री कुठेही दिसत नाहीत. त्यामुळे राज्य नेमके कोण चालवतो असा प्रश्न पडतो. राज्याचा चार्ज सध्या कोणाकडे दिला आहे, याचीही काही माहिती नाही. रश्मी ठाकरे या मुख्यमंत्री होणार आहे, अशी चर्चा आहे, निदान ते तरी जाहीर करा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा त्यांच्या पक्षातील एकाही नेत्यावर सध्या भरोसा राहिलेला नाही. मुख्यमंत्री अधिवेशनात कुठे दिसत नाहीत. मग अशा अवस्थेमध्ये जनतेला न्याय कसा मिळणार? असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला आहे.

संबंधित बातम्या 

आणि भास्कर जाधवांनी स्वत:चा शब्द मागे घेतला, अंगविक्षेपही मागे घेतला, सभागृहात नेमकं काय घडलं?

अमृता फडणवीसांना विरोधी पक्षनेत्या करणार का? चंद्रकांत पाटलांवर पेडणेकर भडकल्या, रश्मी ठाकरेंवरच्या प्रश्नाला उत्तर

VIDEO | भाजप आमदार मोनिका राजळेंचे चौकार-षटकार, कॉलेज टीमची कॅप्टन 28 वर्षांनंतर पुन्हा मैदानात

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.