उद्धव ठाकरे म्हणाले, नंतर कॅप्टनला मैदान साफ करायला जावं लागतं, कनेक्शन काय?
आगामी काळात पर्यटन विभागानं डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून घेऊ. राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे. पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगाच आहे आणि आदित्य ठाकरेचा मला अभिमान आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
मुंबई : जागतिक पर्यटन दिनानिमित्त महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन विभागानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारचं आणि सरकारमधील घटकपक्षांचं कौतुक केलंय. ‘व्यासपीठावर अजितदादांना बोलताना मी म्हटलं की, बऱ्याचदा काय होतं की शेवटी बोलणारा जो वक्ता असतो त्याची पंचाईत होते. कारण आधीच्या सगळ्या खेळाडूंनी चौकार, षटकार मारुन, विकेट घेऊन मॅच जिंकलेली असते. शेवटी कॅप्टनला मग मैदान साफ करायला जावं लागतं, तशी माझी परिस्थिती झाली आहे. पण मॅच जिंकल्याचा आनंद नक्कीच आहे. असे सहकारी मिळाल्यानंतर काम होणार कसं नाही, ते झालंच पाहिजे’, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचं कौतुक केलंय. (Aditya Thackeray’s appreciation from CM Uddhav Thackeray on World Tourism Day)
आगामी काळात पर्यटन विभागानं डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा करावी. आम्ही आमची कॅबिनेट बैठक रेल्वे किंवा त्या विमानातून घेऊ. राज्याच्या पर्यटन विभागाला काहीही कमी पडू देणार नाही. राज्य सरकार आणि राज्याचं अर्थखातं त्यांच्या पाठीशी आहे. पर्यटन विभागाचा मंत्री माझा मुलगाच आहे आणि आदित्य ठाकरेचा मला अभिमान आहे, असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. कोरोना आणि लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका हा पर्यटन क्षेत्राला बसला. पण अशा काळात निर्बंध असतानाही पर्यटन क्षेत्रात नवं धोरण आणलं, नव्या सुविधा निर्माण केल्या गेल्या, नवे रोजगार तयार झाले, याचा मला अभिमान असल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
World Tourism Day – LIVE https://t.co/WyztgblVC0
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) September 27, 2021
मुख्यमंत्र्यांची मिश्किल टिप्पणी
त्याचबरोबर पर्यटन विभागानं डेक्कन ओडीसीप्रमाणे सुविधा लवकर सुरु करावी. आम्ही मंत्रिमंडळ बैठक त्या रेल्वे किंवा विमानात घेऊ. पण थोरात साहेब आपली जबाबदारी असेल की या प्रवासाच्या काळात आपल्याला बैठक संपवावी लागेल. कारण आता जग वेगवान आहे. आपण तिथे पोहचून परत निघालो तरी आपली मंत्रिमंडळ बैठक संपली नाही तर पंचायत होईल, अशी मिश्किल टिप्पणीही ठाकरे यांनी यावेळी केली. आपण हे आव्हान स्वीकारलं पाहिजे. डेक्कन ओडीसीमध्ये मंत्रिमंडळ बैठक नक्की करणार आहोत, असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला.
‘महाराष्ट्रातील पर्यटनाला एक नवा आयाम देत आहोत’
यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनी, महाराष्ट्राला जगाच्या दृष्टीने एक आघाडीचे पर्यटन स्थळ बनवण्याची आमची बांधिलकी पुन्हा अधोरेखित करत आहोत. अनेक नव्या बदलांसह मी आणि माझा विभाग महाराष्ट्रातील पर्यटनाला एक नवा आयाम देत आहोत, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्विटरद्वारे सांगितलं.
कोविड काळात पर्यटन विभागाने स्वस्थ बसून न राहता क्षेत्राच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद कार्य केलं आहे. येत्या काही वर्षात कोविडमुक्त जगात याच प्रयत्नांमुळे महाराष्ट्र जगाच्या पर्यटन नकाशावर अग्रस्थानी झळकेल हा विश्वास आहे. pic.twitter.com/5tr8rZ2rFQ
— Aaditya Thackeray (@AUThackeray) September 27, 2021
इतर बातम्या :
राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गर्दीचे कार्यक्रम सुरु, आमच्यावर गुन्हा का? पंकजा मुंडेंचा सवाल
‘3 सदस्यीय प्रभाग जड जाणार, भाजपसोबत युती केल्यास फायदा’, मनसे नेत्याचं मोठं विधान
Aditya Thackeray’s appreciation from CM Uddhav Thackeray on World Tourism Day