युवा नेता ते राज्यमंत्री… वाचा, डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास

राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे माजी मंत्री आणि ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. (youth leader to cabinet minister, know dr. vishwajeet kadam's political journey)

युवा नेता ते राज्यमंत्री... वाचा, डॉ. विश्वजीत कदम यांचा राजकीय प्रवास
vishwajeet kadam
Follow us
| Updated on: Apr 25, 2021 | 3:53 PM

मुंबई: राज्याचे कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम हे माजी मंत्री आणि ज्येष्ठ दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे चिरंजीव आहेत. राज्यातील तरुण मंत्री असलेल्या विश्वजीत यांनी एक राजकारणी म्हणून स्वत:ला सिद्ध केलं आहे. राजकारण, समाजकारण, शिक्षण, क्रीडा आणि सहकार क्षेत्रात त्यांचा मुक्त वावर आहे. अत्यंत तरुण वयात मोठी जबाबदारी सांभाळणाऱ्या या नेत्याच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा. (youth leader to cabinet minister, know dr. vishwajeet kadam’s political journey)

डॉ. विश्वजीत पतंगराव कदम यांचा जन्म 13 जानेवारी 1981 रोजी झाला. त्यांनी बीई, एबीए, पीएडीपर्यंत शिक्षण घेतलं आहे. माजी मंत्री आणि दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम यांचे ते चिरंजीव आहेत. तर उद्योगपती अविनाश भोसले यांचे जावई आहेत.

सहकार आणि शिक्षणक्षेत्रात कार्यरत

विश्वजीत हे सहकार, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रात सक्रिय आहेत. या तिन्ही क्षेत्रात त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळावर मनोनित सदस्य, तसेच याच संस्थेच्या कार्यकारी मंडळावरही ते आहेत. भारती विद्यापीठ अभिमत विद्यापीठाचे ते उप कुलगुरू आहेत. सोनहिरा साखर कारखाना आणि सागरेश्वर सहकारी सूत गिरणीच्या संचालकपदावरही ते दीर्घकाळ होते. ते भारती सहकारी बँकेचे चेअरमन आहेत. त्याशिवाय वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणूनही ते कार्यरत आहते. पुणे जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे.

युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी दोनदा

2011 आणि 2014मध्ये महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसची निवडणूक पार पडली होती. या निवडणुकीत ते अध्यक्ष म्हणून निवडून आले होते. त्यांनी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या माध्यमातून राज्यभरात युवकांचे मोठी फळी निर्माण केली आहे. विश्वजीत कदम हे 2019पासून काँग्रेस प्रदेश कमिटीच्या कार्याध्यक्षपदावर कार्यरत आहेत.

संवाद यात्रा गाजली

विश्वजीत यांनी दुष्काळावेळी बुलढाणा ते सांगली अशी संवाद पदयात्रा काढून दुष्काळग्रस्तांच्या वेदना सरकारपर्यंत पोहोचवल्या. त्यांच्या या संवाद पदयात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला होता.

विविध खात्यांचा भार

ते महाराष्ट्राच्या सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषा या विभागांचे विद्यमान राज्य मंत्री आहेत.

रॉयल विवाह सोहळा

विश्वजीत यांचा विवाह प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांच्या कन्या स्वप्नाली यांच्याशी झाला होता. 2012मध्ये झालेला पुण्यातील सर्वात रॉयल विवाह सोहळा म्हणून हा विवाह सोहळा ओळखला जातो. या विवाहाला अभिनेता सलमान खान यांच्यासह तत्कालीन केंद्रीय मंत्रीही आले होते.

पत्नीला ईडीची नोटीस

विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांना जानेवारी 2021मध्ये ईडीची नोटीस आली होती. स्वप्नाली यांचे वडील अविनाश भोसले यांच्या मालमत्ता प्रकरणी स्वप्नाली यांना ही नोटीस बजावण्यात आली आहे. अविनाश भोसले यांची 27 नोव्हेंबर 2020 रोजी ईडीने सुमारे दहा सात चौकशी केली. FEMA कायद्यांतर्गत ही चौकशी करण्यात आली होती. यापूर्वीही आयकर विभागाने भोसले यांच्या घरावर छापा मारला होता. भोसले यांच्या पुणे आणि मुंबईतील 23 ठिकाणांवर आयकर विभागाने धाडी मारल्या होत्या.

रक्तात काँग्रेस

2019च्या विधानसभा निवडणुकीत विश्वजीत कदम हे भाजपमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, त्यांनी स्वत:हून या चर्चेला पूर्णविराम दिला होता. डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गावरच जाणार असल्याचं सांगत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रवेशाची ऑफर नाकारली होती. आपल्या रक्तातच काँग्रेस असल्याचंही ते म्हणाले होते. त्यानंतर काँग्रेस हायकमांडने त्याची दखल घेत त्यांच्यावर काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती.

ऐतिहासिक विजय

सांगली जिल्ह्यातील पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून 1 लाख 62 हजार 521 इतक्या मताधिक्याने ते विजयी झाले. राज्यातील दुसऱ्या क्रमांकाच्या मताधिक्याने विजयी होत त्यांनी इतिहास घडवला. (youth leader to cabinet minister, know dr. vishwajeet kadam’s political journey)

लोकसभेला पराभूत

2014मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसकडून विश्वजीत यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. मात्र, देशात मोदी लाट असल्याने अनेक दिग्गजांचा पराभव झाला होता. लोकसभेच्या पहिल्याच निवडणुकीत उभ्या असलेल्या विश्वजीत यांनाही या निवडणुकीत पराभवाला सामोरे जावं लागलं होतं. (youth leader to cabinet minister, know dr. vishwajeet kadam’s political journey)

संबंधित बातम्या:

आठवेळा आमदार, तरीही साधी राहणीमान; जाणून घ्या कोण आहेत के. सी. पाडवी?

मोदी लाटेतही निवडून आले, आता थेट मंत्री; वाचा, सुनील केदार यांचा राजकीय प्रवास

पवार घराण्यातील चौथी पिढी, पहिल्याच निवडणुकीत भाजपच्या गडाला सुरुंग; जाणून घ्या रोहित पवारांबद्दल

(youth leader to cabinet minister, know dr. vishwajeet kadam’s political journey)

भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.