दिशा पटानीसोबत आदित्य ठाकरेंचा डिनर? सोशल मीडियावर फोटो व्हायरल
दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे.
मुंबई : युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांचा एकत्रित फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अलिशान रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी दिसत आहे. दिशा आणि आदित्य ठाकरे डिनरला गेले होते, अशी चर्चा आहे.
दिशा पटानी नेहमीच चर्चेत असते. कधी तिच्या हटके लूकमुळे, कधी कपड्यांमुळे, तर कधी अभिनेता टायगर श्रॉफमुळे. ट्विटर, इन्स्टाग्रामवर दिशा तिचे फोटो शेअर करत असते. त्यावरुन तिच्याबद्दल सोशल मीडियावर नेहमीच चर्चा सुरु असते. शिवाय, अभिनेता टायगर श्रॉफसोबतच्या कथित अफेअरबाबत सुद्धा चर्चा होत राहते. मात्र, आता दिशा पटानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत डिनरला गेल्याची दिसली. हे फोटो सोशल मीडियावर शेअर झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं.
खरंतर दिशा पटानीचं नाव कायमच अभिनेते जॅकी श्रॉफ यांचा मुलगा अभिनेता टायगर श्रॉफ याच्यासोबत जोडलं गेलं. मात्र, या दोघांनी कधीच त्यांच्यातील नात्याला दुजोरा दिला नाही. त्यामुळे सोशल मीडियावरील चर्चा केवळ ‘गॉसिप्स’च राहिली. आता आदित्य ठाकरेंसोबत डिनरला गेल्याने दिशा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
View this post on Instagram#dishapatani with #adityathackeray snapped for dinner in juhu #viralbhayani @viralbhayani
आदित्य ठाकरे सध्या राजकारणात अधिक सक्रीय झाले आहेत. युवासेनेचे प्रमुख या नात्याने त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी दौरे सुरु केले आहेत. शिवसेनेच्या दैनंदिन कामात, निर्णय प्रक्रियेत आदित्य ठाकरे सहभागी होत असतात. काही दिवसांपूर्वीच त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात जाऊन दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुद्धा केली. विशेषत: मुंबईच्या विकासासंबंधी ते अधिक जागृत असतात.
मात्र आता आदित्य ठाकरे आणि दिशा पटानी यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने, नव्या चर्चेला उधाण आलं आहे. एरवी राजकीय गोष्टींमुळे चर्चेत राहणाऱ्या आदित्य ठाकरे यांचीही आता दिशासोबत नाव जोडलं जात असल्याने वेगळ्या चर्चा सोशल मीडियावर पाहायला, वाचायला मिळत आहेत.
दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे किंवा अभिनेत्री दिशा पटानी यांनी स्वत:हून पुढे येऊन अजून या फोटोबाबत स्पष्टीकरण दिले नाही. त्यामुळे यातील कुणी या व्हायरल होणाऱ्या फोटोबाबत बोलतं, की या चर्चांकडे दुर्लक्ष केलं जातं, हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे.
संबंधित बातम्या :
…म्हणून यापुढे कधीही सलमानसोबत काम करु शकणार नाही : दिशा पटाणी