Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ZP and Panchayat Samiti By Election : तुमच्याकडे फोटो व्होटर स्लिप नसेल तर तुम्ही कुठून मिळवू शकता? वाचा सविस्तर

या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाताना तुमच्याकडे मतदान ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगानं सांगितल्या पैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? हे पाहणंही गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आता तुमची फोटो व्होटर स्लिपही डाऊनलोड करु शकता.

ZP and Panchayat Samiti By Election : तुमच्याकडे फोटो व्होटर स्लिप नसेल तर तुम्ही कुठून मिळवू शकता? वाचा सविस्तर
फोटो व्होटर स्लिप
Follow us
| Updated on: Oct 05, 2021 | 7:24 AM

मुंबई : राज्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्यांना पोटनिवडणुका, तसंच पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होत आहे. तर उद्या मतमोजणी असणार आहे. ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर या पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (Dont have photo voter slip yet Heres how you can download it from nvsp in)

या निवडणुकीत मतदान करण्यासाठी जाताना तुमच्याकडे मतदान ओळखपत्र किंवा राज्य निवडणूक आयोगानं सांगितल्या पैकी एक ओळखपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही? हे पाहणंही गरजेचं असणार आहे. त्याचबरोबर तुम्ही आता तुमची फोटो व्होटर स्लिपही डाऊनलोड करु शकता.

मतदान करण्यासाठी फोटो व्होटर स्लिप गरजेची

मतदान करण्यासाठी तुमच्याकडे फोटो व्होटर स्लिप असणं गरजेचं आहे. कारण तुम्ही त्याशिवाय मतदानाचा अधिकार बजावू शकत नाही. दरम्यान, ही फोटो व्होटर स्लिप तुम्ही पोलिंग बूथवरही मिळवू शकता किंवा उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते तुमच्या घरीही आणून देत असतात. मात्र ही फोटो व्होटर स्लिप जर नसेल तर तुम्ही मतदानापासून वंचित राहू शकता. अशावेळी तुम्ही फोटो व्होटर स्लिप डाऊनलोड करु शकता.

व्होटल स्लिपमध्ये मतदान केंद्र आणि बूथची सर्व माहिती असते. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही पक्षाच्या कार्यकर्त्याकडून व्होटर स्लिप घेण्याची गरज बसणार नाही. त्यामुळे वेळेची बचतही होऊ शकते. सोबतच तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही.

फोटो व्होटर स्लिप कशी डाऊनलोड कराल?

>> राष्ट्रीय मतदार सेवा पोर्टलच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या – nvsp.in

>> मतदार यादीत तुमचे नाव शोधा या पर्यायावर क्लिक करा

>> तुमचे क्रेडेन्शियल भरा आणि सर्च बटण क्लिक करा

>> आता तुमचं नाव तुम्हाला पेजच्या तळला दिसेल

>> view details वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची व्होटर स्लिप मिळेल

>> तुमच्या व्होटर स्लिपवरील तळाशी असलेल्या ‘Print Voter Information’ वर क्लिक करा आणि प्रिंट काढा

इतर बातम्या :

दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना मदत द्या, फडणवीस आक्रमक; आंदोलनाचाही इशारा

Pune Heavy Rain : पुण्यात तुफान पाऊस, स्टेशन परिसरात पाणी साचलं; नागरिकांनी काळजी घेण्याचं महापौरांचं आवाहन

Dont have photo voter slip yet Heres how you can download it from nvsp in

जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम
मराठीत बोला, मनसेची थेट बँकांमध्येच धडक; 15 दिवसांचा अल्टिमेटम.
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?
कुठं मेघगर्जना कुठं गारपीट, अवकाळीनं झोडपलं; कोणत्या जिल्ह्यात हैदोस?.
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?
दमानिया आणि देशमुखांनी अंतरावालीत जरांगेंची भेट घेतली, काय झाली चर्चा?.
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार....
सोनं एकाच वर्षात साठीतून नव्वदीपर्यंत, लवकरच गाठणार.....
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा तडाखा; पिकं मातीमोल, शेतकरी हवालदिल.
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की
शिंदेंच्या सभास्थळी टीव्ही 9च्या पत्रकाराला पोलिसांची धक्काबुक्की.