पुण्यात आझम कॅम्पसची प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत क्वारंटाईनसाठी बहाल, नागरिकांच्या जेवणाचीही सोय
पुण्याच्या भवानी पेठ, नाना पेठजवळ आझम कॅम्पस हे एक प्रार्थनास्थळ आहे (Azam Campus help on Corona). या कॅम्पसच्या व्यवस्थापकांनी प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे.
पुणे : कोरोनाविरोधाच्या लढाईत अनेक सामाजिक संस्था, उद्योगपती (Azam Campus help on Corona) आणि अनेक धार्मिक स्थळेदेखील मदतीसाठी पुढे आले आहेत. पुण्याच्या भवानी पेठ, नाना पेठजवळ आझम कॅम्पस हे एक प्रार्थनास्थळ आहे. या कॅम्पसच्या व्यवस्थापकांनी प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात दिली आहे. कॅम्पसमधील प्रार्थनास्थळाची इमारत संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी वापरण्यात यावी, अशी कॅम्पस प्रशासनाची इच्छा आहे (Azam Campus help on Corona).
पुण्यातील मध्यवर्ती पेठांमधील कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेऊन भवानी पेठ, नाना पेठला लागून असणाऱ्या आझम कॅम्पसच्या इमारतींमधील जागा संशयित रुग्णांच्या क्वारंटाईनसाठी प्रशासनाला देण्याची तयारी व्यवस्थापनाने दर्शवली होती. कॅम्पसचे अध्यक्ष डॉ. पी. ए. इनामदार यांनी तसे पत्र 15 एप्रिल रोजी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना दिले होते. त्यानुसार आझम कॅम्पसमधील प्रार्थनास्थळाची दुमजली इमारत सर्व सुविधांसह आता जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली आहे.
कॅम्पसमध्ये क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था कॅम्पसच्यावतीने करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पोलीस आणि शासकीय कर्मचाऱ्यांची व्यवस्थादेखील कॅम्पसकडून करण्यात येणार आहे.
दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. पुण्यात काल दिवसभरात (23 एप्रिल) ‘कोरोना’चे 104 नवे रुग्ण आढळले आहेत. गेल्या सव्वा महिन्यात पहिल्यांदाच एका दिवसात शंभरहून अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 876 वर गेली आहे. (Pune Maximum Corona Patients in a day) राज्यात काल तब्बल 778 नवे रुग्ण सापडले. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 6 हजार 427 वर गेली आहे.
दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार
याशिवाय पुण्यात पुढच्या तीन दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 1,500 वर तर 15 मेपर्यंत 3,000 वर जाण्याशी शक्यता पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी वर्तवली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून उपाययोजनादेखील केल्या जात आहेत, असं आयुक्तांनी सांगितलं आहे.
“दर आठवड्याला दोन नवीन रुग्णालयांशी करार केला जात आहे. गेल्या आठवड्यात भारती रुग्णालयासोबत 150 आणि सिम्बॉयसिस रुग्णालयासोबत 500 बेड्सचा करार करण्यात आला होता. या आठवड्यात दीनानाथ आणि सह्याद्री रुग्णांलयांसोबत तर पुढच्या आठवड्यात पुणे स्टेशनला 150 बेडचा करार केला जाणार आहे. सीओईपी हॉस्टेलमध्ये 800 बेड्सचं रुग्णालय तयार करण्याचा विचार आहे. आता सध्या 14 खाजगी रुग्णालयांमध्ये रुग्ण आहेत”, असं आयुक्त शेखर गायकवाड म्हणाले.
“रुग्णांची संख्या वाढणार असल्याने 74 हॉस्टेल अधिग्रहित करण्यात आले आहेत. आपली 43 हजारांची क्षमता असून 300 शाळांमध्ये ही व्यवस्था करण्याचे नियोजन आहे. त्यामुळे आणखी 20 हजार नागरिकांची सोय होईल”, असेही आयुक्तांनी सांगितलं. “सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये 2200 रुम, बालेवाडीचा निकमारला 1100 रुम उपलब्ध आहेत. झोपडपट्टीतल्या नागरिकांना 14 दिवस इन्स्टिट्यूटशनल राहायला सांगतले आहे”, असंदेखील आयुक्तांनी सांगितलं आहे.
संबंधित बातम्या :
‘जी दक्षिण’मध्ये रुग्णसंख्या पाचशेपार, मुंबईत 10 वॉर्डमध्ये प्रत्येकी दोनशेपेक्षा जास्त कोरोनाग्रस्त