पुण्यात डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला (Pune Doctor dies of Corona).

पुण्यात डॉक्टरचा 'कोरोना'मुळे मृत्यू
Follow us
| Updated on: May 23, 2020 | 9:03 AM

पुणे : पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डॉक्टरने प्राण गमवल्याची ही पुणे शहरातील पहिलीच घटना आहे (Pune Doctor dies of Corona).

संबंधित 56 वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना योद्ध्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे.

कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत (Pune Doctor dies of Corona). कोरोनाविरोधाच्या लढाईत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. मात्र, आता डॉक्टर, नर्सेस यांनाच कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईतही कोरोनामुळे एका नामांकित डॉक्टराचा मृत्यू झाला होता. मुंबईतील कोरोनाने डॉक्टरचा मृत्यू होण्याची ती पहिली घटना होती. त्यापाठोपाठ आता पुण्यातही एका खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार करणारे डॉक्टरच आता कोरोनाचे बळी ठरल्यामुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, पुण्यात कोरोनाबाधितांचा आकडा दररोज वाढत आहे. पुणे जिल्ह्यात काल (22 मे) दिवसभरात सर्वाधिक 358 नवे रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5 हजार 167 वर पोहोचला. पुण्यात आतापर्यंत कोरोनामुळे 257 रुग्णांचा बळी गेला आहे. पुण्यात आतापर्यंत 2 हजार 371 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

संबंधित बातमी :

मुंबईतील प्रसिद्ध डॉक्टरचा ‘कोरोना’मुळे मृत्यू

कोरोनाबाधित महिलेला पाच दिवसात डिस्चार्ज, पुण्यातील नामांकित खासगी रुग्णालयाचा धक्कादायक प्रकार

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.