Animal Lover | ‘भूतदया’ शिकायची असेल तर या 3 राशींच्या लोकांकडूनच शिका
राशीचक्रातील काही अशा राशी आहेत ज्या राशींचे लोक प्राणिमात्रांवर खूप प्रेम करतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी
मुंबई : लहानपणा पासूनच आपल्याला भूतदया शिकवली जाते. म्हणजेच प्राणीमात्रांवर प्रेम करणे. आपल्या पैकी बरेच जण प्राण्यांवर खूप प्रेम करताना दिसातात. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होताना आपण पाहतो. कधी रस्त्यावर भुकेने व्याकूळ झालेल्या प्राणीमात्रांवर दया दाखवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. राशीचक्रातील काही अशा राशी आहेत त्या राशींचे लोक प्राणिमात्रांवर खूप प्रेम करतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या राशी
ज्योतिषशास्त्रातील 3 प्राणीप्रेमी राशी
मकर (Makar Rashi)
मकर राशींच्या व्यक्ती प्राणी प्रेमी असतात. या राशींच्या व्यक्तींच्या आयुष्यातील पहिले प्रेम प्राणी असतात. कोणत्याही प्राण्यास मदत करण्यास ते तयार असतात. या राशीच्या व्यक्तींच्या मते जर तुम्ही मुक जनावरांची मदत केली तर त्यांचे प्रेम तुम्हाला मिळते. प्राणी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम करतात.
सिंह (sinha Rashi)
सिंह राशीचे लोक प्राणांना घाबरतात पण या राशीचे लोक सर्वांनाच खूप मदत करतात. या लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भूतदया असते. या राशीचे लोक प्राणी दत्तक घेत नाहीत पण रस्त्यातील कोणत्याही प्राण्याला ते मदत करतात.
मिथुन (Mithun Rashi)
सिंह राशीच्या अगदी विरुद्ध मिथुन राशीच्या व्यक्ती असतात. या व्यक्ती कोणत्याही प्राण्याला घाबरत नाही. हे लोक श्वानप्रेमी असतात. या लोकांचे प्राण्यांशी चांगले जुळते. हे लोक घरामध्ये नवीन पाळीव प्राणी आणण्यासाठी नेहमी तयार असतात. या राशीचे लोक प्राण्यांवर खूप प्रेम करतात आणि त्यांच्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार होतात.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या
Panchak Rules | पंचक म्हणजे काय? काय आहेत त्याचे नियम
Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा
Hanuman Puja benefits : मनोभावे पूजा करा, संकटमोचक स्वत: मदतीला येतील