Ganesh Festival 2021 : गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये या 4 राशींचं नशीब उजळणार, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

आज 10 सप्टेंबरपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा सण देशाच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची कृपा झाली तर तर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार गणेशोत्सवाचे 10 दिवस 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहेत. जाणून घ्या त्या राशींबद्दल -

Ganesh Festival 2021 : गणेशोत्सवाच्या 10 दिवसांमध्ये या 4 राशींचं नशीब उजळणार, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत
Ganesha And Zodiac Signs
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 3:32 PM

मुंबई : आज 10 सप्टेंबरपासून 10 दिवसांच्या गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. हा सण 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत सुरु राहील. दरवर्षी हा सण देशाच्या सर्व भागात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. गणपतीची कृपा झाली तर तर व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होतात आणि प्रत्येक कामात यश मिळते. ज्योतिष शास्त्रानुसार गणेशोत्सवाचे 10 दिवस 4 राशींसाठी खूप शुभ असणार आहेत. जाणून घ्या त्या राशींबद्दल –

वृषभ राश‍ी (Taurus)

वृषभ राशीचे लोक खूप मेहनती असतात. परंतु त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ उशिरा मिळते. पण, ज्योतिष शास्त्रानुसार गणेश चतुर्थीचा सण त्यांच्यासाठी खूप आनंद घेऊन येत आहे. या दरम्यान, ते गणपतीचे नाव घेऊन कोणतेही नवीन काम सुरु करु शकतात. बाप्पाच्या कृपेने त्यांच्या ग्रहांची स्थिती त्यांच्या बाजूने असेल आणि नशीब त्यांना पूर्ण साथ देईल. यामुळे, त्यांना त्यांच्या मेहनतीनुसार पूर्ण परिणाम मिळतील. यामुळे त्यांची किर्ती वाढेल आणि आर्थिक लाभही होतील.

मिथुन राश‍ी (Gemini)

मिथुन राशीच्या लोकांसाठी गणेशोत्सवाचे दिवस खूप खास असणार आहेत. या दरम्यान, गणपतीचे त्यांच्यावर विशेष आशीर्वाद असतील. या संधीचा फायदा घेऊन त्यांनी असे काम केले पाहिजे जे त्यांच्या आणि लोकांच्या हिताचे आहे. मिथुन राशीचे लोक या काळात जे काही करतील त्यांना यश मिळेल. त्यांना आर्थिक लाभही मिळतील.

सिंह राश‍ी (Leo)

सिंह राशीच्या लोकांच्या आयुष्यातील चढ-उतार संपवण्याची वेळ आली आहे. गणेशोत्सवाचे 10 दिवस खूप आनंद घेऊन येत आहेत. बऱ्याच काळापासून कामात येणारे अडथळे दूर होतील. मेहनत पूर्ण फळ देईल. आर्थिक समस्याही कमी होतील.

कन्या राश‍ी (Virgo)

कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ भाग्य उजळवणारा आहे. या, दरम्यान तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या स्पर्धकांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. नशीब पूर्णपणे तुमच्यासोबत आहे. यामुळे रखडलेली कामे होतील. आर्थिक स्थिती उत्तम राहील आणि जोडीदाराला प्रत्येक कामात पूर्ण सहकार्य मिळेल.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Zodiac Signs | या 3 राशींच्या व्यक्तींना उशिराने मिळते मेहनतीचे फळ, जाणून घ्या तुमच्या राशीबाबत

Zodiac Signs | या 4 राशीच्या व्यक्ती ठरतात सर्वोत्तम कर्मचारी आणि सहकारी

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.