Makar Sankranti 2024: मकर संक्रांतीला येणार महायोग, या 4 राशींचे भाग्य सूर्यासारखे चमकणार
Makar sankranti : 2024 या नवीन वर्षातील मकर संक्रांती अनेकांसाठी खूप खास असणार आहे. या दिवशी काही दुर्मिळ संयोग होत आहे, ज्यामुळे काही राशींचे भाग्य उजळेल. जाणून घ्या मकर संक्रातीच्या दिवशी कोणत्या राशीच्या लोकांना होणार फायदा. कोणत्या राशींचे नशीब उजळणार.
मुंबई : 15 जानेवारी रोजी सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. यामुळे अनेकांचे नशीब उजळणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेवाची आराधना केल्यास चांगले फळ मिळते. यादिवशी शनिदेवाची कृपाही होऊ शकते. शनीची साडेसाती असलेल्या राशींनी अंघोळ करुन काळे तीळ दान करावे. यामुळे चांगला लाभ होऊ शकतो. सूर्य देवाच्या राशीतील बदलाचा परिणाम सर्वच राशींवर होणार आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशीवर काय प्रभाव पडेल.
77 वर्षांनंतर 15 जानेवारी 2024 रोजी मकर संक्रांतीला चांगला योग येत आहे. या दिवशी बुध आणि मंगळ सुद्धा एकाच राशीत धनु राशीत असतील. राजकारण आणि लेखन क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी या ग्रहांचा संयोग खूप फायदेशीर ठरेल.
सूर्य राशीतील बदलामुळे कोणत्या राशींना फायदा होईल?
सूर्य मकर राशीत येत असल्याने मकर आणि धनु राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळणार आहे. या राशीच्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.
कुंभ आणि मीन राशीसाठी खास
मकर संक्रांतीचा दिवस कुंभ आणि मीन राशीच्या लोकांसाठी खास असणार आहे. साडेसाती सुरु असलेल्या दोन्ही राशींना शनी देवाची उपासना खूप चांगले फळ देतील. या दिवशी काळ्या वस्तू दान कराव्या. काळ्या तिळाचे दान करणे देखील खूप शुभ मानले जाते. त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी शनीची विशेष कृपा सहज मिळू शकते. मकर संक्रांत सोमवारी येत असल्याने शंकराला जल अर्पण करून प्रसन्न करता येईल.
सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये यश मिळू शकते. नोकरदार वर्गाला बढती मिळेल. नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात. व्यवसायात देखील चांगली वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवन आनंदी राहिल.
मेष राशीच्या लोकांना नोकरीच्या ठिकाणी मान-सन्मान मिळेल. प्रगती होऊन पगारात वाढ होऊ शकते. व्यवसायात देखील चांगले यश मिळेल.
मकर संक्रांतीचा दिवशी सर्वच राशीच्या लोकांनी सूर्याची उपासना करावी. या दिवशी सगळ्यांचेच भाग्य सूर्याप्रमाणे चमकेल.