Special Story | सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा आहे? मग ‘या’ खास ठिकाणांना नक्की भेट द्या!

शहरामधील नेहमीचीच धावपळ दगदग यामुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दूर कुठेतरी निवांत जागी सुट्टया घालवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. यासाठी आपण शहराच्या बाहेर निर्सगाच्या सहवासात काही वेळ शांतपणे घालवण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणे शोधत असतो.

Special Story | सुट्टीचा आनंद निसर्गाच्या सानिध्यात घालवायचा आहे? मग ‘या’ खास ठिकाणांना नक्की भेट द्या!
पर्यटन स्थळे
Follow us
| Updated on: Nov 08, 2021 | 7:24 AM

मुंबई : शहरामधील नेहमीचीच धावपळ दगदग यामुळे सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी दूर कुठेतरी निवांत जागी सुट्टया घालवण्याची इच्छा प्रत्येकालाच असते. यासाठी आपण शहराच्या बाहेर निर्सगाच्या सहवासात काही वेळ शांतपणे घालवण्यासाठी निसर्गरम्य ठिकाणे शोधत असतो. आज आम्ही तुम्हाला अशाच काही खास निसर्गरम्य ठिकाणांबद्दल सांगणार आहोत. जेथे तुम्ही विकेंड मस्त खालू शकता.

माळशेज घाट

माळशेज घाट हे शांत हिल स्टेशन गिर्यारोहक, ट्रेकर्स आणि निसर्गप्रेमींमध्ये लोकप्रिय आहे. कारण याठिकाणी तलाव, पर्वत आणि असंख्य धबधबे आहेत. समुद्रसपाटीपासून 700 मीटर उंचीवर हे ठिकाण आहे. विशेष म्हणजे आपण वर्षांतून कधीही येथे भेट देऊ शकता.

लोणावळा

मुंबईजवळ एक दिवसाच्या सहलीसाठी हे अतिशय चांगले ठिकाण आहे. जिथे तुम्ही वॅक्स म्युझियमला देखील भेट देऊ शकता. विशेष म्हणजे येथे साहसी खेळांमध्ये सहभागी होऊ शकता. लोणावळ्यामध्ये पोहोचण्यासाठी तुम्हाला मुंबईवरून चार तास लागतात. तर पुण्यावरून दिड तास लागतो. येथे जाण्यासाठी रेल्वे आणि बाय रोड देखील जाऊ शकता.

वसई

मुंबईजवळील एक दिवसाच्या सहलींसाठी हे एक खास ठिकाण आहे. जिथे तुम्ही आराम करण्यासाठी जाऊ शकता आणि तुमच्या कुटुंब आणि मित्रांसोबत थोडा वेळ घालवू शकता. याठिकाणी तुम्हाला निर्सगाच्या सहवास मिळेल. याठिकाणी नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.

महाबळेश्वर

महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. लिंगमाला धबधबा हे महाबळेश्वर प्रमुख आकर्षण आहे. आपण दोन दिवसांचा प्लन तयार करून महाबळेश्वरला फिरायला यावे. महाबळेश्वरमध्ये मोठ्या पर्वत रांगा आपल्याला बघायला मिळतील. तसेच स्टोबेरीच्या बागा देखील आपल्याला महाबळेश्वरमध्ये बघायला मिळतील.

माथेरान

मुंबईपासून अगदी जवळ असलेले हिल स्टेशन म्हणजे माथेरान हे आहे. समुद्रसपाटीपासून 800 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र जगातील काही मोजक्या ठिकाणांपैकी एक आहे. इथे वाहनांना ज्याण्याची परवानगी नाही. येथे वृक्षाच्छादित भागांमधून आपण पायीच लांब फेरफटका मारू शकता. घोडेस्वारीदेखील करून शकता.

कामशेत

कामशेत हे पॅराग्लायडिंगसाठी खूप प्रसिद्ध आहे. जिथे या खेळाचा सराव करण्याची उत्तम संधी आहे. पॅराग्लायडिंग राईड पूर्ण होण्यासाठी सुमारे 15 ते 20 मिनिटे लागतील. येथे जवळच ऐतिहासिक विसापूर किल्ला देखील आहे. कामशेतला तुम्ही ट्रेकिंगचा आनंद देखील घेऊ शकता.

संबंधित बातम्या : 

जगातील सर्वात लहान अव्वल 5 देश; ज्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती असणे आहे आवश्यक

Chitrakoot Tourist Places : चित्रकूटमध्ये भेट देण्यासाठी ‘ही’ 5 सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळे!

औरंगाबाद: वेरूळ-अजिंठ्यासाठीची एसी पर्यटन बस पुन्हा सुरू, वेळ आणि तिकिटाचे दर काय?

(Special Story Want to spend your holiday in nature? Then visit these special places)

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.