Ashadh Month Vrat 2022: आला व्रत वैकल्याचा महिना; आषाढ महिन्यातले सर्व सण आणि व्रत

हिंदू पंचांगानुसार, वर्षाचा चौथा महिना आषाढ (Ashadh Month Vrat 2022) सुरु आहे, 15 जून 2022, बुधवारपासून आषाढ महिना सुरू झाला आहे (Ashadh month started). कालपासून सुरू झालेला आषाढ महिना 13 जुलै 2022, बुधवारी संपेल. धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तसेच गुरुपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात गुरुपौर्णिमेसह (Gurupurnima 2022) अनेक मोठे […]

Ashadh Month Vrat 2022: आला व्रत वैकल्याचा महिना; आषाढ महिन्यातले सर्व सण आणि व्रत
Follow us
| Updated on: Jun 16, 2022 | 9:34 AM

हिंदू पंचांगानुसार, वर्षाचा चौथा महिना आषाढ (Ashadh Month Vrat 2022) सुरु आहे, 15 जून 2022, बुधवारपासून आषाढ महिना सुरू झाला आहे (Ashadh month started). कालपासून सुरू झालेला आषाढ महिना 13 जुलै 2022, बुधवारी संपेल. धार्मिक शास्त्रानुसार आषाढ महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित आहे. तसेच गुरुपूजेसाठी सर्वोत्तम मानला जातो. या महिन्यात गुरुपौर्णिमेसह (Gurupurnima 2022) अनेक मोठे धार्मिक सण येत आहेत (aashadh month fast). जाणून घेऊया.  आषाढ महिन्यात सूर्यदेवासह वरुण देवाची पूजा करण्याचे महत्त्व आहे. ज्योतिषशास्त्रानुसार या महिन्यात येणाऱ्या देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णू योगनिद्रामध्ये जातात. तेव्हापासून चातुर्मास सुरू होतो. या दरम्यान सर्व प्रकारचे शुभ कार्य थांबतात, कारण या चार महिन्यांत देवांची झोप लागते. जाणून घेऊया आषाढ महिन्यातील व्रत आणि सण.

  1. 15 जून, बुधवार, मिथुन संक्रांती- मिथुन संक्रांती आषाढ महिन्यातील प्रतिपदेला येत आहे. या दिवशी सूर्य देव एक महिन्यासाठी मिथुन राशीत प्रवेश करेल.
  2. 17 जून, शुक्रवार, कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी- ही तिथी गणेशाला समर्पित आहे. या दिवशी गणेशाची पूजा केली जाते.
  3.  20 जून, सोमवार – कालाष्टमी व्रत, मासिक जन्माष्टमी.
  4. 24 जून, शुक्रवार, योगिनी एकादशी – या दिवशी श्री हरी विष्णूची पूजा करण्याचा नियम आहे.
  5. हे सुद्धा वाचा
  6. 26 जून, रविवार, प्रदोष व्रत – या दिवशी व्रत केल्यास भगवान शंकराची कृपा होते.
  7. 27 जून, सोमवार, मासिक शिवरात्री – या दिवशी शिवाची पूजा करण्याचा नियम आहे.
  8. 29 जून, बुधवार, आषाढ अमावस्या – या दिवशी पितरांचे तर्पण केले जाते.
  9. 30 जून, गुरुवार- या दिवसापासून गुप्त नवरात्रीला सुरुवात होत आहे.
  10. 01 जुलै, शुक्रवार – या दिवसापासून जगन्नाथ रथयात्रा काढण्यात येणार आहे.
  11. ०3 जुलै, रविवार, विनायक चतुर्थी व्रत- या दिवशी गणेश भक्त उपवास करतात.
  12. 04 जुलै, सोमवार, स्कंद षष्ठी- या दिवशी भगवान कार्तिकेयची पूजा केली जाते.
  13. 09 जुलै, मंगळवार – गौरी व्रत
  14. 10 जुलै, रविवार – देवशयनी एकादशी, वासुदेव द्वादशी, चातुर्मास प्रारंभ
  15. 11 जुलै, सोमवार – सोम प्रदोष व्रत
  16. 12 जुलै, मंगळवार – जया पार्वती व्रत
  17. 13 जुलै, बुधवार – गुरु पौर्णिमा, आषाढ पौर्णिमा, व्यास पूजा

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.