AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti in Marathi | आयुष्यात यशाचे शिखर गाठायचं असेल तर, चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा

जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवाच असेल तर आचार्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी कधीही विसरू नका. चला तर माहिती करुन घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

Chanakya Niti in Marathi | आयुष्यात यशाचे शिखर गाठायचं असेल तर, चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात करा
chankya-niti
| Edited By: | Updated on: Dec 21, 2021 | 8:10 AM
Share

मुंबई : काही दिवसातच 2021 हे वर्ष संपून जाईल. नवीन वर्ष नवीन अशा आणि आव्हाने घेऊन येईल. नवीन वर्षाची आपण सर्वच काहीना काही संकल्प तयार करत असतो. आणि पूर्ण वर्षभर हे संकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतो. ज्या प्रमाणे आपण आपले फोन , लॅपटॉप किंवा इतर गोष्टी चार्ज करतो त्याच प्रमाणे आपण स्वत:ला देखील नव्या चांगल्या सकारात्मक गोष्टींनी चार्ज करायाला हवे. हे करण्यासाठी चाणक्य नीतीमध्ये आचार्य चाणक्यांनी काही गोष्टी सांगितल्या आहेत.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतिशास्त्रात मानवी जीवनातील प्रत्येक पैलूचा उल्लेख केला होता. चाणक्यच्या मते, जीवनातील अपयशांना कधीही घाबरू नये. एखाद्या व्यक्तीने अपयशातून शिकून आपल्या आयुष्यात पुढे जावे, हे स्पष्ट आहे की यश एक ना एक दिवस तुमच्याकडे येते. जे अपयशाला घाबरत नाहीत, ते लोक आपल्या आयुष्यात निश्चित यश मिळवतात. या लोकांना त्यांची ध्येयच प्रेरणा देतात. पण जर तुम्हाला आयुष्यात यश मिळवाच असेल तर आचार्यांनी सांगितलेल्या 3 गोष्टी कधीही विसरू नका. चला तर माहिती करुन घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी.

वेळ (Time)

चाणक्य नीतीनुसार वेळ खूप मौल्यवान आहे. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. म्हणूनच वेळ कधीही वाया जाऊ देऊ नका. प्रत्येक क्षण माणसाला काहीतरी शिकवत असतो. त्यामुळे जर तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचा आदर करा. या गोष्टीमुळे तुम्हाला नेहमी यश मिळेल.

निंदा (Condemnation)

चाणक्य नीतीनुसार आपण कधीही इतरांवर टीका करू नये. निंदा ऐकू नका, कुणावर ही निंदा करू नका. जेव्हा आपण कोणावर टीका करातो तेव्हा आपण अपयशाच्या मार्गवर जात असतो. निंदा कोणाच्याही मन नकारात्मकतेची भावना वाढवते.त्यामुळे मानसिक तणावही वाढतो आणि मनही अस्वस्थ होते.

पैसे वाचवणे (Money)

चाणक्य नीती सांगते की विचार न करता कधीही पैसे खर्च करू नका. पैसा ही एकमेव गोष्ट आहे जी तुमच्या वाईट काळात कामी येते. संकटाच्या वेळी सर्व माणसे एकत्र आल्यावर पैसा खऱ्या मित्राची भूमिका बजावतो. त्यामुळे नवीन वर्षात पैसे कसे वाचवायचे ते शिका.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधीत बातम्या :

Lord Shiva Puja | आयुष्यात यश मिळवायचे असेल तर सोमवारी हे उपाय नक्की करुन पाहा

Astro Tips | “कुठं ठेवू अनं कुठं नको, अशी अवस्था होईल” एवढा पैसा येईल, त्यासाठी आठवड्याच्या सात दिवसात करायचे हे वेगवेगळे उपाय नक्की वाचा

Sankashti Chaturthi 2021 | कधी असणार वर्षातील शेवटची संकष्टी चतुर्थी, जाणून घ्या तिथी आणि पूजा मुहूर्त

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.