Dhanteras 2021 : धनत्रयोदशीला कुठली वस्तू खरेदी करण्यासाठी कुठला मुहूर्त शुभ असेल, जाणून घ्या

कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी खरेदी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात धन-संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे.

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीला कुठली वस्तू खरेदी करण्यासाठी कुठला मुहूर्त शुभ असेल, जाणून घ्या
Lord-Dhanvantari
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 12:38 PM

मुंबई : कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशीचा सण साजरा केला जातो. दरवर्षी दिवाळीच्या दोन दिवस आधी हा सण साजरा केला जातो. या दिवशी खरेदी नवीन वस्तू खरेदी करण्याची प्रथा आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि कुटुंबात धन-संपत्तीची कधीही कमतरता भासत नाही, अशी मान्यता आहे.

आयुर्वेदाची देवता धन्वंतरी यांचा जन्म धनत्रयोदशीच्या दिवशी झाला होता, अशी मान्यता आहे. यावेळी धनत्रयोदशीचा सण मंगळवार 2 नोव्हेंबर रोजी साजरा केला जात आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी सोने, चांदी किंवा कोणतीही धातूची वस्तू खरेदी करणे शुभ मानले जाते. पण जर तुम्ही या दिवशी सोने किंवा चांदी खरेदी करु शकत नसाल तर या 5 गोष्टी नक्की खरेदी करा. या गोष्टी तुमच्या घरात समृद्धी घेऊन येतील.

धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदीसाठीचा शुभ मुहूर्त कोणता?

धनत्रयोदशीच्या दिवशी जर वाहन खरेदी करण्याची योजना असेल तर सकाळी 11:48 ते दुपारी 01:40 पर्यंतची वेळ अतिशय शुभ आहे.

लोखंड किंवा स्टीलच्या वस्तू, वाहने इत्यादी खरेदी करायच्या असतील तर 1:40 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे.

घरगुती वस्तू, सोने, चांदी, पितळ इत्यादी खरेदी करायचे असेल तर संध्याकाळी 6:12 ते रात्री 10:21 पर्यंत तुम्ही ते खरेदी करु शकता. हा काळ अतिशय शुभ आहे.

मात्र दुपारी 3 ते 4:31 पर्यंत कोणतीही वस्तू खरेदी करु नका, या काळात राहुकाल असेल.

झाडू

या दिवशी झाडू खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. झाडूला देवी लक्ष्मीचे रुप मानले जाते. कारण, ते घरातील घाण साफ करते. हे खरेदी केल्याने कुटुंबात सुख-समृद्धी नांदते. मात्र, धनत्रयोदशीला खरेदी केलेला झाडू लहान दीवाळीच्या दिवशी वापरावा. याने संपूर्ण घर पूर्णपणे स्वच्छ करावे.

दुकानदाराने तिजोरी खरेदी करावी

जर तुम्ही व्यवसाय सुरु करणार असाल तर या दिवशी तिजोरी खरेदी करावी. दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यानंतर या तिजोरीची पूजा करुन त्याची प्रतिष्ठापना करावी. जर तुमच्याकडे आधीच तिजोरी असेल तर तुम्ही लक्ष्मीपूजनानंतर तिची पूजा करावी.

धणे खरेदी करा

धणे हे समृद्धीचे सूचक मानले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी धणे खरेदी करावे. दिवाळीच्या दिवशी ते धणे देवी लक्ष्मीला अर्पण करा आणि पूजेनंतर दुसऱ्या दिवशी हे बियाणे मातीत पेरावे आणि काही धणे तुमच्या तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे. त्यामुळे घरातील संपत्तीत झपाट्याने वाढ होते.

गोमती चक्र खरेदी करा

भगवान विष्णूने स्वतः देवी लक्ष्मीला गोमती चक्र भेट दिले होते. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी त्यांची खरेदी केल्याने केवळ लक्ष्मीच प्रसन्न होणार नाही तर भगवान विष्णू तसेच स्वतः संपत्तीची देवीही प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देईल. गोमती चक्र वाईट नजर दूर करते आणि आर्थिक नुकसान दूर करते अशी मान्यता आहे. या दिवशी 11 गोमती चक्रे खरेदी करुन पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत किंवा कपाटात ठेवावे.

पितळीची भांडी खरेदी करावी

भगवान धन्वंतरीला पितळ धातू अत्यंत प्रिय आहे. मान्यता आहे की समुद्रमंथनावेळी बाहेर पडताना ते पितळीचा कलश घेऊन बाहेर पडले होते. ज्यामध्ये औषधी होत्या. हा दिवस भगवान धन्वंतरीचा जन्म दिवस असल्याने पितळीची भांडी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी स्टीलची भांडी खरेदी करणे टाळावे कारण त्यात लोहाचे प्रमाण असते आणि लोखंडाचा संबंध शनिदेवाशी असतो असे मानले जाते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Dhanteras 2021 : धनत्रयोदशीच्या शुभ दिनी या मंत्रोच्चाराने मिळेल निरोगी आयुष्य, जाणून घ्या भगवान धन्वंतरीच्या पूजेची पद्धत

Diwali 2021 : घराच्या मुख्य दारावर या तीन गोष्टी लावा, घरात लक्ष्मी नांदेल

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.