कुंडलीत गुरू कमजोर आहे, तर गुरूवारी हळदीचे हे उपाय करा
घरातील वातावरणं, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला हळदीने स्वस्तिक बनवणे शुभ असते किंवा मानले जाते.
मुंबई – हळदीच्या माळाने बृहस्पति मंत्राचा जप केला, करत असलेल्या व्यक्तीच्या जीवनात अनेक फायदे होतात. घरातील वास्तू दोष दूर करण्यासाठी याचा उपयोग केला जातो, हळद मिसळून नियमितपणे 15 दिवस पाण्यात शिंपडणे चांगले. तुम्ही आठवड्यातून एकदा हे करू शकता. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल.
घरातील वातावरणं, सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी मुख्य दरवाजाच्या वरच्या बाजूला हळदीने स्वस्तिक बनवणे शुभ असते किंवा मानले जाते. कुंडलीत बृहस्पति कमजोर असल्यास गुरुवारी कच्ची हळद पिवळ्या कपड्यात बांधून हातावर बांधावी त्याचा फायदा चांगला होतो.
मुलाखत पास होण्यासाठी कच्च्या हळदीची पेस्ट घरीचं बनवा आणि निघण्यापूर्वी कपाळावर हळद लावून टिळा लावा. समृद्धीसाठी 5 कच्ची हळद, 5 सुपारी आणि थोडा कच्चा तांदूळ घेऊन पिवळ्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवा.
कालीदेवीला प्रसन्न करण्यासाठी काळ्या हळदीची माळ अर्पण करणे शुभ असते. लक्ष्मीची पूजा करताना पिवळ्या हळदीची माळ अर्पण करणे शुभ असते. यामुळे जीवनात संपत्ती येते.
कुंडलीत बृहस्पति असल्यामुळे आरोग्याच्या समस्या येत असतील तर गव्हाच्या पिठात हळद, हरभरा, गूळ मिसळून तीन गोळे बनवा. डोक्यापासून पायापर्यंत एक एक करून २१ वेळा पीठ घेऊन गाईला खायला द्या. असं तीन गुरूवारी केल्याने तुम्हाला अधिक फायदा होईल.