मुंबई : दसरा किंवा विजयादशमी (Dussehra 2023) हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून साजरा केला जातो. हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. यंदा 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे. या वेळी दसरा वृद्धी योग आणि रवियोगात साजरा होणार आहे. यंदा दसऱ्याच्या सणावर दोन शुभ योगही तयार होत आहेत. यावर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील दशमी तिथी 23 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:14 वाजता समाप्त होईल. उदय तिथीनुसार या वर्षी 24 ऑक्टोबरला दसरा सण साजरा केला जाणार आहे. दरवर्षी दसरा हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
दसऱ्याच्या दिवशी प्रभू रामाने रावणाचा वध करून युद्ध जिंकले. हा सण असत्यावर सत्याचा आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणूनही साजरा केला जातो. दरवर्षी अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या दहाव्या तिथीला दसरा सण साजरा केला जातो. या सणाला विजयादशमी असेही म्हणतात. असे मानले जाते की या दिवशी माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता, म्हणून हा उत्सव शारदीय नवरात्रीच्या दहाव्या दिवशी साजरा केला जातो. अनेक ठिकाणी या दिवशी दुर्गा मातेच्या मूर्तीचे विसर्जनही केले जाते.
दशमीलाच माता दुर्गेने महिषासुराचा वध केला होता, म्हणून ती विजयादशमी म्हणून साजरी केली जाते. रावण दहन देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी होते आणि प्रत्येक ठिकाणच्या परंपरा पूर्णपणे वेगळ्या असतात. या दिवशी शस्त्रांचीही पूजा केली जाते. या दिवशी शमीच्या झाडाचीही पूजा केली जाते. या दिवशी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, सोने, दागिने, नवीन कपडे इत्यादी खरेदी करणे शुभ असते.
दसऱ्याच्या दिवशी भगवान नीलकंठाचे दर्शन घेणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी नीळकंठ पक्षी पाहिल्यास तुमच्या सर्व वाईट कर्मे दूर होतात असा समज आहे. नीलकंठ पक्षी हा देवाचा प्रतिनिधी मानला जातो. दसऱ्याला नीलकंठ पक्ष्याचे दर्शन घेतल्याने धन आणि संपत्ती वाढते. असे मानले जाते की दसऱ्याच्या दिवशी कधीही नीळकंठ दिसल्यास घरात समृद्धी येते आणि जे काही काम करायचे आहे त्यात यशही मिळते.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)