Ganeshotsav 2021 LIVE Updates | रत्नागिरीत गौरीसोबत पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन
गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 10 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
मुंबई : प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आहे. हा सण रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीपर्यंत असेल राहील. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाची चतुर्थी गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. असे मानले जाते की या दिवशी दुपारी गणपतीचा जन्म झाला होता. त्यांच्या जयंतीनिमित्त, गणेश चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत भारताच्या सर्व भागात 10 दिवस गणेशोत्सव साजरा केला जातो. चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे भक्त गणपतीची मूर्ती त्यांच्या घरी आणतात त्यांची विशेष पूजा करतात. श्रीगणेश दीड, 5, 7 किंवा 10 दिवस घरात विराजमान असतात. त्यानंतर त्यांचे विसर्जन केले जाते. आज पाच दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.
या 10 दिवसांमध्ये गणपतीला त्यांचे आवडते मोदक, लाडवांचं नैवेद्य अर्पण केले जाते. असे म्हटले जाते की गणपती दुःख दूर करणारा आणि सुख देणारा आहे. अशा स्थितीत जो कोणी या काळात प्रामाणिक अंतःकरणाने गणपतीची पूजा करतो, त्याला निश्चितच त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि त्यांच्या दुःखाचा अंत होतो.
5 दिवसांच्या गणपती विसर्जनाचा मुहूर्त
? सकाळी : 06.01 ते 10.45 मिनिटे
? दुपारी : 05.03 ते 06.37 मिनिटे
? संध्याकाळी : 12.19 ते 10.54 मिनिटे
? रात्री : 1.45 ते 03.11 मिनिटे (मध्यरात्री, 15 सप्टेंबर)
यावर्षी अन्नत चतुर्दशी 19 सप्टेंबर 2021 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी गणपतीला निरोप दिला जातो. या वर्षी चतुर्दशी तिथी 19 सप्टेंबर पासून सुरु होईल आणि 20 सप्टेंबर पर्यंत असेल. गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्तही जाणून घ्या-
? सकाळचा मुहूर्त – 7:39 ते 12:14 पर्यंत
? दिवसाचा मुहूर्त – दुपारी 1:46 ते दुपारी 3:18 पर्यंत
? संध्याकाळचा मुहूर्त – संध्याकाळी 6:21 ते रात्री 10:46
? रात्रीचा मुहूर्त – रात्री 1:43 ते 3:11 (20 सप्टेंबर)
? सकाळचा मुहूर्त – सकाळी 4:40 ते सकाळी 6:08 (20 सप्टेंबर)
LIVE NEWS & UPDATES
-
पुण्यात साकारला मुंबईतील चाळीतला गणपती, हिंदू-मुस्लिम एकतेचं घडवलं दर्शन
पुणे : पुण्यातील आकाश पवार या मुलानं घरात साकारला मुंबईतील चाळीतला गणपती
मास्क विकून मुलानं बनवला देखावा
देखाव्यात चाळीतील हिंदू-मुस्लिम एकतेचं घडवलं दर्शन
मुलांन उभारलेला देखावा बालाजीनगर परिसरात चर्चेचा विषय
-
रत्नागिरीत गौरीसोबत पाच दिवसांच्या गणपतींचे थाटात विसर्जन
रत्नागिरी- गौरी सोबत पाच दिवसांच्या गणपतींचे विसर्जन
ग्रामीण भागात ढोल-ताशांच्या गजरात गौरी-गणपतींचे होतंय विसर्जन
रत्नागिरी जिल्ह्यातील सव्वालाख घरगुती गणपतींचे आज विसर्जन
डोक्यावरून गणपती आणण्याच्या प्रथेप्रमाणे विसर्जनावेळी डोक्यावरून गणरायांचे थाटामाटात विसर्जन
गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात बाप्पाला दिला जातो निरोप
-
-
कृष्णा, कोयना नदीकाठावर गणेश विसर्जनासाठी जाऊ नये, कराड तहसिलदार यांनी काढला आदेश
कराड
कृष्णा, कोयना नदीकाठावरील नागरिकांनी नदीपात्रात गणेश विसर्जनासाठी जाऊ नये, कराड तहसिलदार यांनी काढला आदेश
कोयना धरणातुन 50000 क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे
कोयना आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ
पाच दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी कराड नगरपालिका व पोलिसांनी कराडच्या प्रीतिसंगमावर गणपती विसर्जनासाठी विशेष तयारी
प्रशासनाकडून गणपती विसर्जित केले जाणार
-
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल
अहमदनगर –
पारनेर तहसीलदार ज्योती देवरे यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल
जेष्ठ विधिज्ञ असीम सरोदे आणि कारभारी पोटघन यांनी केली तक्रार दाखल
देवरे यांच्या बद्दली नंतरही अडचणीत वाढ तर देवरे यांची जळगाव येथे झाली बद्दली,
देवरे यांची काही दिवसांपूर्वी सुसाईड ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती
तर देवरे यांच्या भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होतेय.
-
पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज
पाच दिवसांच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिका सज्ज
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने निर्बंध लागू आहेत.
या पार्श्वभूमीवर मुंबईत विसर्जनाची तयारी पालिकेने केली आहे
७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे व १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव –
राज्य सरकार आणि पालिकेने निर्बध लागू केले आहेत. त्यानुसार भाविकांनी विसर्जनस्थळी गणेश मुर्त्या पालिका कर्मचाऱ्यांच्या स्वाधीन करायच्या आहेत.
पालिका कर्मचारी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करणार आहेत.
मुंबईत एकूण ७३ नैसर्गिक विसर्जन स्थळे आहेत.
या नैसर्गिक विसर्जन स्थळांवर नागरिकांनी किंवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांनी थेट पाण्यात जाऊन मूर्ती विसर्जन करण्यास प्रतिबंध आहे.
तसेच सुमारे १७३ ठिकाणी कृत्रिम तलाव देखील निर्माण करण्यात आले आहेत.
कृत्रिम तलावात भाविकांनी गणेश मुर्त्यांचे विसर्जन करावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.
-
-
जरुड फाट्यावर भीषण अपघात, दोघांचा जागीच मृत्यू
बीड : जरूड फाट्यावर भीषण अपघात
अपघातात दोघांचा जागीच मृत्यू , एक गंभीर
बोलेरो आणि पिकअप मध्ये समोरासमोर अपघात
रवी मिटकर 26, आणि सोनाली मिटकर 22 यांचा मृतात समावेश
दोन वर्षाचे बाळ अपघातात बचावले
अपघातातील चालक गंभीर, रुग्णालयात उपचार सुरू
अपघातस्थळी ग्रामस्थांची मदत
-
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
नाशिक –
गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू
सोमेश्वर धबधबा वाहतोय पूर्ण क्षमतेने
सोमेश्वर धबधब्याचा विलोभनीय नजारा टीव्ही 9 च्या प्रेक्षकांसाठी
यंदाच्या पावसाळ्यात पहिल्यांदाच पूर्ण क्षमतेने धबधबा सुरू
-
रत्नागिरी जिल्ह्यातील सव्वा लाख घरघुती गणेशमुर्तींचे आज विसर्जन
रत्नागिरी जिल्ह्यातील सव्वा लाख घरघुती गणेशमुर्तींचे आज विसर्जन
गौरीसोबत आज बाप्पांचेही होणार विसर्जन
जिल्हात एकूण 411 ठिकाणी विसर्जन स्थळे
लांजा तालुक्यातील सर्वाधिक म्हणजे 11 हजाराहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन
Published On - Sep 14,2021 8:06 AM