Happy Dussehra 2021 Wishes | आपल्या प्रियजनांना द्या दसऱ्याच्या हटके शुभेच्छा
विजयादषमी म्हणजेच दसरा सणानिमीत्त आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही हटके शुभेच्छा घेऊन आलो आहोत .
मुंबई : हिंदू पंचांगानुसार आश्विन शुद्ध दशमीला येणारा सण म्हणजे विजयादशमी (Vijayadashami 2021). विजयादशमी (Vijayadashami ) म्हणजेच दसरा (Dussehra). या सणाला हिंदू संस्कृतीत प्रचंड मान आणि महत्त्व आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणूनही या दिवसाला एक वेगळे महत्त्व असते. पूर्वंपार चालत आलेली ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ मोठा नाही आनंदाला तोटा ही म्हणच बरेच काही सांगून जाते. या दिवशी सोने, वाहन, घर खरेदी प्राधान्य दिले जाते. लहान थोर एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव करतात. आपणासही विजयादषमी म्हणजेच दसरा सणानिमीत्त आपल्या आप्तेष्टांना शुभेच्छा द्यायच्या असतील तर आम्ही तुमच्यासाठी काही हटके शुभेच्छा घेऊन आलो आहोत .
- सीमा ओलांडून आव्हानांच्या गाठू शिखर यशाचे! प्रगतीचे सोने लुटून! सर्वांमध्ये हे वाटायचे!! दसरा शुभेच्छा!
- दिन आला सोनियाचा भासे घरा ही सोनेरी फुलो जीवन आपुले येवो सोन्याची झळाळी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- लाखो किरणी उजळल्या दिशा, घेऊनी नवी उमेद, नवी आशा, होतील पूर्ण मनातील सर्व इच्छा दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- बांधू तोरण दारी, काढू रांगोळी अंगणी.. उत्सव सोने लुटण्याचा… करुनी उधळण सोन्याची, जपू नाती मनाची, दसरा शुभेच्छा.
- जाळूनी रावणरुपी अन्याय, अहंकार भेदभाव सोने लुटूया प्रगत विचारांचे.. करुन सिमोल्लंघन, साधूया लक्ष विकासाचे… आपणा सर्वांना दसरा आणि विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
- वाईटावर चांगल्याची मात महत्व या दिनाचे असे खास जाळोनिया द्वेष- मत्सराची कात मनोमनी वसवी प्रेमाची आस विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा!
- सदिच्छांची ही सोनेरी किरणे पसरो तुमच्या आयुष्यात दसऱ्याचा हा सुवर्णक्षण अखंड नांदो तुमच्या जीवनात शुभमुहूर्ताचा हा दसरा होवो आपणांस लाभाचा आपल्या जीवनात बरसो पाऊस सुवर्णांचा.. दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
- झाली असेल चूक तरी या निमिनत्ताने आता ती विसरा वाटून प्रेम एकमेकांस साजरा करु यंदाचा हा दसरा! दसरा शुभेच्छा.
- सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे.. सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस.. सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
इतर बातम्या :
हा प्रभावशाली जप कराल तर आयुष्यातील सर्वांत मोठा अडथळा दूर होईल!
Chanakya Niti | देवी लक्ष्मीला प्रसन्न करायचं आहे?, मग आजच करा ‘या’ गोष्टींचे त्याग
Navratri 2021 | मानाच्या काठ्या तुळजापुरात दाखल, ‘आई राजा उदोउदो’ जयघोष करत मंदिर प्रदक्षिणा, वाचा ऐतिसाहिक महत्त्वhttps://t.co/kaZE0W4ejJ#navratri2021 | #tuljapur | #tradition
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 14, 2021