श्रावण महिन्यात सुवासिनींनी या 6 गोष्टी कराव्यात; अखंड सौभाग्यप्राप्ती होते !
श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात.
मुंबई : श्रावण महिना हा महादेव आणि माता पार्वती यांच्या उपासनेचा महिना आहे. या महिन्यातच महादेव हे माता पार्वतीच्या तपश्चर्येने तिच्यावर प्रसन्न झाले आणि तिच्याशी लग्न करण्यास तयार झाले. म्हणूनच भोलेनाथ आणि माता पार्वती या दोघांनाही हा महिना खूप प्रिय आहे. या महिन्यात माता पार्वती आणि महादेवाची उपासना केल्यास मनोकामना पूर्ण होतात, तसेच वैवाहिक जीवनातील समस्या दूर होतात, अशी श्रद्धा आहे. श्रावण महिन्यात श्रावण सोमवार, मंगळागौरी व्रत आणि हरियाली तीज यांसारखे व्रत करून स्त्रिया त्यांच्या सुखी वैवाहिक आयुष्यासाठी आणि पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतात. असे म्हणतात की श्रावण महिन्यात जर स्त्रियांनी दररोज 6 गोष्टी केल्या तर देवी पार्वती त्या स्त्रियांवर खूप प्रसन्न होतात आणि स्त्रियांना अखंड सौभाग्य प्राप्त होते. (In the month of Shravan, married women should do these 6 things)
1. दररोज सकाळी स्नानानंतर शिवलिंगावर पाणी अर्पण करा. त्यानंतरच काहीतरी खा. संपूर्ण श्रावण महिनाभर हा नियम पाळल्याने महादेव आणि माता पार्वती यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. महिलांबरोबरच पुरुषही हे व्रत पाळू शकतात.
2. बांगड्या हा महिलांच्या शृंगाराचा एक महत्त्वाचा भाग मानलो जातो. श्रावण महिना हिरवाईने भरलेला असतो. त्यामुळे महिलांनी या महिन्यात हिरव्या बांगड्या घालाव्यात. यामुळे माता गौरी खूप प्रसन्न होतात.
3. श्रावण महिन्यातील दिवसांमध्ये स्त्रियांनी सौभाग्याचे सामान माता पार्वतीला अर्पण करावे तसेच दान करावे. त्यामुळे माता पार्वती प्रसन्न होते आणि पतीला दीर्घायुष्यासह अखंड सौभाग्य प्रदान करते.
4. श्रावण महिन्यात मेहंदी लावणेदेखील खूप शुभ मानले जाते. मेहंदी हे हनीमूनचे लक्षण आहे. म्हणून या महिन्यात एकदा आपण मेहंदी लावली पाहिजे. हरियाली तीजला मेहंदीचे विशेष महत्त्व आहे.
5. महादेवाला भोलेनाथ असेही म्हणतात. कारण ते खूप लवकर प्रसन्न होतात. श्रावण महिन्यात त्यांना संतुष्ट करणे सोपे आहे. महादेवाचे सुख पाहून माता गौरीसुद्धा खूप आनंदी होतात. त्यामुळे श्रावण महिन्यात महिलांनी महादेवाचे स्तोत्र गायले पाहिजे. यामुळे महिलांना शिव आणि गौरी असा दोघांचाही आशीर्वाद मिळतो.
6. श्रावण महिन्यात कोणत्याही प्रकारचे वादविवाद किंवा भांडणे टाळावीत. हा महिना आनंदाचा महिना आहे. महिनाभर महादेव आणि माता पार्वतीचे ध्यान केले पाहिजे. जर राग आला तर ‘ओम नम: शिवाय’ या मंत्राचा जप करा. यामुळे तुमचा राग शांत होईल. (In the month of Shravan, married women should do these 6 things)
UGC NET 2021 Exam : यूजीसी नेट परीक्षा कोरोनामुळे रद्द, जाणून घ्या कधी जारी होणार नवीन तारीख आणि प्रवेशपत्र https://t.co/w5Dhr177Qk#UGC |#Net |#Exam |#Update |#Date |#AdmitCard
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2021
इतर बातम्या
Raigad Flood : महाड आणि पोलादपूर तालुक्यात पंचनामे, मृतांच्या नातेवाईकांना मदत सुरु – जिल्हाधिकारी