भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी साजरी होणारी तीज कजरी तीज (Kajri teej 2022) म्हणून ओळखली जाते. हा सण प्रामुख्याने उत्तर भारतीयांमध्ये साजरा केला जातो. उत्तर भारतीयांच्या दिनदर्शिकेनुसार, कजरी तीज हा सण भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षाच्या तिसऱ्या दिवशी, 14 ऑगस्ट रोजी रविवारी साजरा केला जाईल. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि वैवाहिक जीवनाच्या सुखासाठी उपवास करतात. असे मानले जाते की, विवाह इच्छुक मुलींचे लग्न जमत नसल्यास हे व्रत केल्याने लग्नाचा योग्य जुळून येतो. यासोबतच इच्छित वराची प्राप्ती होते.
13 ऑगस्टच्या रात्री 12:53 पासून तृतीया तिथी सुरू होईल. दुसऱ्या दिवशी 14 ऑगस्टची रात्र 10.35 मिनिटांपर्यंत राहील. यावेळी 14 ऑगस्ट रोजी कजरी तीजचा सण साजरा केला जाणार आहे.
या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. चंद्रोदयानंतर संध्याकाळी उपवास मोडला जातो. कजरी तीजच्या दिवशी बाजरी, गहू, हरभरा आणि तांदूळ यांच्या पिठामध्ये तूप आणि सुका मेवा मिसळून पदार्थ तयार केले जातात. या दिवशी गायीच्या पूजेलाही महत्त्व आहे.
काजरी तीजच्या दिवशी महिला सकाळी स्नान करून उपवासाचे व्रत करतात. त्यानंतर कडुनिंबाच्या झाडाला पाणी, रोळी आणि अक्षत अर्पण करा. यानंतर काजळ व वस्त्र अर्पण करून पुष्प अर्पण करावे. पूजेत वापरल्या जाणाऱ्या कलशावर रोळीने टिका लावून कलव (धागा) बांधावा. तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावावा. सुहासिनीला गोड वस्तू दान करा. रात्री चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर उपवास सोडावा. अविवाहित मुलींना चांगला वर मिळावा म्हणून कजरी तीजचा उपवास ठेवू शकतात.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)