Shiva Temple | जाणून घ्या त्या खास मंदिराबाबत जिथे शंकरजीच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते

आतापर्यंत तुम्ही अनेक शिव मंदिरांच्या महत्त्वाबाबत ऐकले आणि वाचले असेल. अनेक मंदिरे शिवलिंग आणि शिवमूर्ती पाहिली असतील. पण, आज आम्ही तुम्हाला भगवान भोलेनाथच्या त्या मंदिराबद्दल सांगतो, जिथे शिवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. हे मंदिर कोणते आणि त्याची स्थापना कुठे झालीये.

Shiva Temple | जाणून घ्या त्या खास मंदिराबाबत जिथे शंकरजीच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते
Achaleshwar Mahadev Temple
Follow us
| Updated on: Oct 23, 2021 | 3:40 PM

मुंबई : आतापर्यंत तुम्ही अनेक शिव मंदिरांच्या महत्त्वाबाबत ऐकले आणि वाचले असेल. अनेक मंदिरे शिवलिंग आणि शिवमूर्ती पाहिली असतील. पण, आज आम्ही तुम्हाला भगवान भोलेनाथच्या त्या मंदिराबद्दल सांगतो, जिथे शिवाच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. हे मंदिर कोणते आणि त्याची स्थापना कुठे झालीये. तसेच शिवाच्या अंगठ्याची पूजा करण्यामागील दंतकथा काय आहे. त्याबद्दल जाणून घेऊया –

अचलेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या अंगठ्याची पूजा केली जाते –

माउंट अबूच्या अचलेश्वर महादेव मंदिरात शंकराच्या उजव्या पायाच्या बोटाची पूजा केली जाते. हे मंदिर माउंट आबूच्या उत्तरेस सुमारे 11 किमी अचलगडच्या टेकड्यांवर आहे. हे पहिले ठिकाण आहे जिथे भगवान शिव किंवा शिवलिंगाच्या मूर्तीची पूजा केली जात नाही, परंतु त्यांच्या अंगठ्याची पूजा केली जाते. भगवान शंकराच्या अंगठ्यामुळेच येथील प्रचंड पर्वत टिकून आहेत. जर ते शंकराचा अंगठा नसता तर हे पर्वत नष्ट झाले असते, असे मानले जाते.

अंगठ्याची पूजा करण्यामागील पौराणिक कथा काय –

माउंट अबूच्या अचलेश्वर मंदिरात भगवान शंकराच्या अंगठ्याची पूजा करण्यामागे एक आख्यायिका आहे. यानुसार, एकदा अर्बुद पर्वतावर वसलेले नंदीवर्धन पुढे सरकू लागले. त्यावेळी नंदीजीही याच पर्वतावर होते. पर्वताच्या हालण्यामुळे हिमालयावर तपस्या करणाऱ्या भगवान शिव यांच्या तपश्चर्येत अडथळा आला आणि त्यांची तपश्चर्या विघ्न झाली. नंदीला वाचवण्यासाठी शंकराने आपला अंगठा हिमालयातून आर्बुड पर्वतापर्यंत वाढवला आणि डोंगराला हलण्यापासून रोखून स्थिर धरले.

याच कारणामुळे शंकराच्या पायाचा अंगठा अर्बुद पर्वत उचलून आहे. या कारणास्तव, या पर्वतावर बांधलेल्या या मंदिरात भगवान शंकराच्या पायाच्या अंगठ्याची पूजा केली जाते. अचलेश्वर मंदिर हे अतिशय प्राचीन मंदिर आहे. मंदिराच्या आवारात लावलेले चंपा वृक्षही त्याची पुरातनता दर्शवते.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Diwali 2021 : दिवाळीला हे 10 सोपे उपाय करा, घरात सुख-समृद्धी येईल

लंकेपासून कित्येक किलोमीटर दूर अयोध्येला 20 दिवसात कसे पोहोचले प्रभू राम, जाणून घ्या पौराणिक कथा

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.