Study Room Vastu | मुलांचं अभ्यासात मन लागत नाही? मग वास्तुत हे बदल नक्की करा
आजकाल प्रत्येक जण उत्तम करिअर घडवून चांगले आयुष्य जगण्याच्या शोधात असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या पाल्याच्या सर्वंगीण विकासासाठी काम करत असते.
मुंबई : आजकाल प्रत्येक जण उत्तम करिअर घडवून चांगले आयुष्य जगण्याच्या शोधात असतो. त्यामुळे प्रत्येक जण आपल्या पाल्याच्या सर्वंगीण विकासासाठी काम करत असते. त्याला सर्वोत्कृष्ट शाळेत टाकून त्याला सर्वात चांगली शिक्षा मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. पण अनेक प्रयत्न करूनही कधी कधी मूल चांगले परिणाम देऊ शकत नाही. त्याला अभ्यास अजिबात करु वाटत नाही. यावर उपाय म्हणून वास्तुमधील दोष काढू शकता. चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे दोष आणि त्यांचे उपाय.
मोराची पिस करेल जादूई काम
मोराचे पंख ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातूनही अतिशय पवित्र आणि शुभ मानले जातात. ज्योतिषशास्त्रानुसार, मोराच्या पिसामध्ये कोणत्याही ठिकाणची नकारात्मक ऊर्जा दूर करण्याची चमत्कारी शक्ती असते. यामुळेच हे घरामध्ये ठेवणे खूप शुभ मानले जाते. मोरपंखाचे शुभ परिणाम मिळविण्यासाठी पूजेच्या घरात ठेवण्याव्यतिरिक्त, विशेषत: मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत ठेवा. असे केल्याने माता सरस्वतीचा आशीर्वाद तुमच्या मुलांवर पडतो आणि त्यांच्या बुद्धीचा विकास होतो. मुलाचे अभ्यासात मन लागते.
अभ्यासात यश मिळवण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा
वास्तूनुसार घराच्या उत्तर दिशेला कोणतीही जड वस्तू ठेवणे टाळावे .यासोबतच तुम्ही देवी सरस्वतीचा फोटो घराच्या ईशान्य कोपर्यात ठेवू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही अभ्यासाच्या टेबलाजवळ यशस्वी किंवा प्रेरणादायी व्यक्तीचे छायाचित्रही लावू शकता. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात सकारात्मकता येईल आणि तुम्ही एका नवीन उर्जेने तुमच्या ध्येयाकडे वाटचाल कराल. रुममध्ये सर्वत्र तुम्ही प्रेरणादायी वाक्यांचे पोस्टर सुद्धा लावू शकता.
वास्तूचे हे नियमही लक्षात ठेवा
वास्तूनुसार अभ्यासाच्या खोलीत अन्न खाणे टाळावे. विशेषत: अभ्यासाच्या टेबलावर काहीही खाणे किंवा पिणे टाळा. अभ्यासाच्या खोलीत आणि टेबलावर घाण भांडी ठेवू नका, अन्यथा त्याच्या नकारात्मक उर्जेमुळे तुम्हाला अभ्यास करावासा वाटणार नाही. वास्तूनुसार अभ्यासाच्या टेबलावर छोटा पिरॅमिड ठेवणे खूप शुभ असते. अभ्यासाची खोली नेहमी स्वच्छ ठेवा.
(टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.)
संबंधित बातम्या
05 December 2021 Panchang : कसा असेल रविवारचा दिवस, शुभ अशुभ मुहूर्त, पाहा काय सांगतेय पंचांग
Chandra Darshan 2021: सूर्यग्रहणानंतरचे चंद्रदर्शन तुमचे नशीब बदलून टाकेल