PHOTO | कोल्हापूरच्या अंबाबाईच्या खास दागिन्यांची स्वच्छता, नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलीये. त्याचाच भाग म्हणून आज देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आलीये. दोन दिवसांपूर्वी मुख्य गर्भगृहात स्वच्छता झाल्यानंतर आज देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांबरोबरच खजिन्यात खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली आहे.
Kolhapur Ambabai Jewellery
Follow us
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आलीये.
त्याचाच भाग म्हणून आज देवीच्या सोन्याच्या दागिन्यांची स्वच्छता करण्यात आलीये.
दोन दिवसांपूर्वी मुख्य गर्भगृहात स्वच्छता झाल्यानंतर आज देवीला दररोज घातल्या जाणाऱ्या दागिन्यांबरोबरच खजिन्यात खास दागिन्यांची देखील स्वच्छता करण्यात आली आहे.
यामध्ये शिवकालीन कवड्यांची माळ, 16 पदरी चंद्रहार, सोन्याची पालखी आशा एक ना अनेक दागिन्यांचा समावेश आहे.
आज झालेल्या स्वच्छतेमुळे देवीच्या दागिन्यांना नवी झळाळी मिळालीये. देवीचे हे सगळे दागिने सांभाळण्याची जबाबदारी खांडेकर कुटुंबियांकडे आहे.
खांडेकर कुटुंबीयांची अकरावी पिढी या दागिन्यांची काळजी घेतेय. या प्रत्येक दागिन्यांचं महत्त्व देखील वेगळं आहे.
येत्या 7 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. त्यासाठी कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवाची तयारी सुरु आहे.