Mars Ketu Yuti: केतू आणि मंगळ संयोग या 3 राशींसाठी ठरणार फायद्याचा
Mangal Gochar 2023 : मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत प्रवेश करणार आहे. या 43 दिवसाच्या काळात तीन राशींना फायदा होणार आहे. स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश केल्यानंतर 16 नोव्हेंबर रोजी तो तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल. पण याचा फायदा कोणाला होणार आहे जाणून घ्या.
मुंबई : ऑक्टोबरमध्ये मंगळ तूळ राशीत प्रवेश करणार आहे. केतूही तूळ राशीत येणार आहे. मंगळ ग्रहाने 18 ऑगस्ट 2023 रोजी कन्या राशीत प्रवेश केला होता, आता तो 3 ऑक्टोबरला तूळ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या घटनेचा अनेक राशीच्या लोकांवर परिणाम होणार आहे. 3 ऑक्टोबर नंतरचा काळ काही राशींसाठी खास असणार आहे. पण काही राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात फायदा होणार आहे. मंगळ आणि केतूचा संयोग हा अग्निमय ग्रहांचे संयोग आहे. ग्रहांचा सेनापती मंगळाचे संक्रमण सर्व 12 राशींवर परिणाम करणार आहे. दुसरीकडे, केतूच्या संक्रमणाचा परिणाम व्यक्तीच्या नोकरीवर होणार आहे.
ज्योतिष शास्त्रीनुसार मंगळ कन्या राशीतून तूळ राशीत 03 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 05:58 वाजता प्रवेश करेल. मंगळ 43 दिवस तूळ राशीत राहणार आहे. या वेळी अनुक्रमे स्वाती आणि विशाखा नक्षत्रात प्रवेश करतील. 16 नोव्हेंबर रोजी ते तूळ राशीतून बाहेर पडून वृश्चिक राशीत प्रवेश करेल.
कोणत्या तीन राशींना होणार फायदा
- सिंह राशी : केतू आणि मंगळ चांगले बदल घडवून आणणार आहेत. सिंह राशीच्या लोकांना चांगले उत्पन्न मिळेल आणि तुम्ही मोठे निर्णय घेऊन स्वतःसाठी फायदेशीर परिस्थिती निर्माण कराल.
- कुंभ राशी : हा संयोग कुंभ राशीसाठी काही खास असणार आहे. कारण तर तुम्ही चांगला अभ्यास केलात, तर तुम्हाला चांगली नोकरी मिळेल, तुमचे सर्वोत्तम करिअर घडणार आहे.
- कन्या राशी : कन्या राशीच्या लोकांना विविध माध्यमातून आर्थिक फायदा होणार आहे. गुंतवणूक कराल तिथे चांगला नफा ही मिळणार आहे. या वेळेचा सदुपयोग करुन योग्य ठिकाणी पैसे गुंतवले तर फायदाच होईल. आर्थिक लाभाचे संकेत मिळत आहेत.
अस्वीकरण: या लेखात दिलेली माहिती पूर्णपणे ज्योतिषशास्त्रातील सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आली आहे. याची आम्ही पुष्टी करत नाही. कृपया संबंधित क्षेत्रातील तज्ञाचा सल्ला घ्यावा.