Masik Shivratri 2021: लग्नाला घेऊन काळजीत आहात ? मग मासिक शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय नक्की करा

आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या 2 तारखेला मासिक शिवरात्री साजरी केली जाणार आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते.

Masik Shivratri 2021: लग्नाला घेऊन काळजीत आहात ? मग मासिक शिवरात्रीच्या दिवशी हे उपाय नक्की करा
Lord-Shiv-and-Mata-
Follow us
| Updated on: Dec 01, 2021 | 8:54 PM

मुंबई : आजपासून डिसेंबर महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या 2 तारखेला मासिक शिवरात्री साजरी केली जाणार आहे. दर महिन्याला कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्री साजरी केली जाते. या दिवशी पार्वती आणि शिव या दोघांचीही मनोभावे पूजा केली जाते. शिवरात्रीच्या रात्री झोपू नये, देवाची आस्थेने पूजा करावी. असे केल्याने माणसाची मोठी कामेही पूर्ण होतात अशी मान्यता आहे. ज्या लोकांचे लग्न होऊ शकत नाही किंवा वैवाहिक जीवन अडचणीत आले आहे त्यांच्यासाठी शिवरात्रीचे व्रत खूप खास आहे.चला तर मग जाणून घेऊयात या संबंधी उपाय

विवाहयोग्य जोडीदारासाठी जर तुम्ही लग्नासाठी योग्य जोडीदाराच्या शोधात असाल, परंतु तुमचा शोध पूर्ण होत नसेल, तर शिवरात्रीच्या दिवशी नियमानुसार भगवान शिव आणि पार्वतीची पूजा करा. यानंतर हातात रुद्राक्ष घेऊन ‘ओम गौरी शंकर नमः’ या मंत्राचा जप करावा. रात्रीच्या वेळीही शिव आणि पार्वतीच्या या मंत्राचा जप करा. असे केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अशी मान्यता आहे.

वैवाहिक जीवनात अडचणी येतील वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी शिव-पार्वतीच्या विवाहाचे चित्र घरात आणून पूजास्थानी ठेवावे. या चित्राची नित्य पूजा करावी. दररोज असे केल्याने तुमच्या जीवनातील सर्व वैवाहिक समस्या लवकरच दूर होतील.

वैवाहिक जीवनातील अडथळे दूर करण्यासाठी तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर ते दूर करण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिरात पाच नारळ अपर्ण करावे. यानंतर ‘ओम श्रीं वर प्रदाय श्री नमः’ या मंत्राच्या पाच फेऱ्या करा. यानंतर सर्व नारळ शिवाला अर्पण करावेत. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातील अडथळे काही वेळातच दूर होतील.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)

'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.