Shardiya Navratri 2021 Day 7 : कालरात्री मातेची पूजा कशी करावी, मंत्र आणि विधी कसे, जाणून घ्या पूर्ण माहिती

दुर्गेचे सातवे रुप म्हणजे कालरात्री. नऊरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला माता पार्वतीचे सर्वात क्रूर रुप माणले जाते. कालरात्रीची पूजा 12 ऑक्टोबर रोजी केली जाईल.

Shardiya Navratri 2021 Day 7 : कालरात्री मातेची पूजा कशी करावी, मंत्र आणि विधी कसे, जाणून घ्या पूर्ण माहिती
GODDESS KALRATRI
Follow us
| Updated on: Oct 11, 2021 | 7:54 PM

मुंबई : सध्या नवरात्रोत्सवाची धूम आहे. या उत्सवाला शारदीय नवरात्रोत्सव म्हणूनही ओळखले जाते. हा नऊ दिवस चालणारा उत्सव आहे. या पूर्ण नऊ दिवसांमध्ये प्रत्येक दिवसाला दुर्गामातेच्या एक-एक रुपाला समर्पित केलं जातं. दुर्गामातेच्या प्रत्येक रुपाची एक विशेषता आहे. दुर्गेचे सातवे रुप म्हणजे कालरात्री. नऊरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्रीची पूजा केली जाते. कालरात्री देवीला माता पार्वतीचे सर्वात क्रूर रुप माणले जाते. कालरात्रीची पूजा 12 ऑक्टोबर रोजी केली जाईल.

माता कालरात्री : तिथि आणि वेळ

सप्तमी 21:47 पर्यंत

सूर्योदय 06:20

सूर्यास्त 17:54

चंद्रोदय 12:35

चंद्र 22:56

मूळ नक्षत्र 11:27 पर्यंत

माता कालरात्रीचे महत्त्व

माता कालरात्रीचे रुप हे रागाने ओतप्रोत असल्याचे म्हटले जाते. याच रुपामुळे कालरात्री मातेला माता शुभांकरी असेदेखील म्हटले जाते. कालरात्री आपल्या भक्तांना निडर आणि निर्भय बनवते असे म्हटले जाते. मार्कण्डेंय पुराणानुसार, कालरात्री देवी दुर्गाच्या विनाशकारी रूपांपैकी एक आहे. कालरात्री देवी गाढवावर स्वार झालेली असते. कालरात्री मातेचा रंग हा गर्द अंधाऱ्या रात्रीसारखा आहे. या मातेचे केस लांब असतात. तसेच कालरात्री मातेला तीन डोळेसुद्धा असतात.

कालरात्री जेव्हा श्वास घेते, तेव्हा तिच्या नाकपुडीतून आगीचे लोट बाहेर पडतात, असे म्हटले जाते. कालरात्री मातेला एकूण चार हात आहेत. एका हातात तलवार आहे. दोन डाव्या हातांपैकी एक हात अभयमुद्रा (संरक्षण) तर दुसरा हात वरमुद्रा (आशीर्वाद) अशा स्थितीत असतो.

कालरात्री मातेबद्दल एक अख्यायिका आहे. शुंभ आणि निशुंभ या दोन राक्षसांनी देवलोकावर हल्ला केला होता. त्यावेळी देवांनी माता पार्वतीला मदत करण्याची प्रार्थना केली. तर दुसरीकडे भय निर्माण करण्यासाठी शुंभ आणि निशुंभ या राक्षसांनी चंड आणि मुंड या दोन राक्षसांना पाठवलं. या राक्षसांचा सामना करण्यासाठी देवीने काली माता म्हणजेच कालरात्रीचे रुप घेतले. या कालरात्री मातेने नंतर चंड आणि मुंड या दोघांना मारले. याच कारणामुळे कालरात्री मातेला चामुंडा देवी असेदेखील म्हटले जाते. कालरात्री देवी शनिग्रहावर राज्य करते.

कालरात्री मातेचा मंत्र

ओम देवी कालरत्रायै नमः

माता कालरात्रीची प्रार्थना

एकवेणी जपाकर्णपुरा नगना खरस्थिता। लम्बोष्ठी कर्णिकाकर्णी तैलभयक्त शारिरिनी॥ वामपदोल्लसल्लोह लतकान्तकभूषण। वर्धन मुर्धध्वज कृष्ण कालरात्रिभयंकारी॥

माता कालरात्रीची प्रार्थना 

या देवी सर्वभूतेषु मां कालरात्रि रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः

कालरात्री मातेची उपासना करण्याची पद्धत

भक्तांनी सकाळी लवकर आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत.

कलशाजवळ देवीच्या मूर्तीची स्थापना करा

देवीला पान आणि सुपारी अर्पण करा

मातेला फुले अर्पण करा. चमेलीची फुले रात्री फुलतात. त्यामुळे ही फुले मिळाली तर उत्तम

मूर्तीसमोर तुपाचा दिवा लावावा

श्री दुर्गा सप्तशती पाठाचे पठण करावे

कालरात्री मातेच्या मंत्रांचा जप करावा

इतर बातम्या :

Palmistry : तळहातावरील तीळ काय सांगतो? जाणून घ्या शुभ-अशुभ संकेत

Shardiya Navratri 2021 : देवी दुर्गाला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीत आपल्या राशीनुसार या रंगाची फुलं अर्पण करा

Very Effective Vastu Tips : घराच्या समृद्धी आणि प्रगतीसाठी हे वास्तू उपाय आहेत खूप प्रभावी

(Shardiya Navratri 2021 day seventh maa kalratri worship know all about about worship method mantra and date)

'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.