Shravan Somwar Vrat: पहिल्या श्रावण सोमवारी जुळून येतोय विशेष योग, अशा प्रकारे करा श्रावण सोमवारचे व्रत
यावेळी 1 ऑगस्ट 2022 रोजी श्रावणाचा पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्याची विनायक चतुर्थीही याच दिवशी येत आहे. याशिवाय या दिवशी शिवयोग आणि रवियोग यांचा मेळ साधला जात आहे.
काल 29 जुलैपासून श्रवण महिना सुरू झाला. 1 ऑगस्टला पहिला श्रावण सोमवार (Shravan somwar vrat) येत आहे. भगवान शंकराला श्रावण महिना अतिशय प्रिय आहे. याशिवाय या महिन्यातील सोमवारी शिवपूजा आणि जलाभिषेक करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. यंदा सावन महिन्यात चार सोमवार असून त्यापैकी हा पहिलाच सोमवार (First shrawan somwar) असल्याने शिवभक्तांमध्ये विशेष उत्साह आहे. हिंदू पंचांगानुसार पहिल्या सोमवारी विशेष संयोग घडत आहेत. विनायक चतुर्थी श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी येत आहे. याशिवाय अनेक योगही जुळून येत आहेत.
पहिल्या श्रावण सोमवारी जुळून येतोय विशेष योग
यावेळी 1 ऑगस्ट 2022 रोजी श्रावणाचा पहिला सोमवार आहे. श्रावण महिन्याची विनायक चतुर्थीही याच दिवशी येत आहे. याशिवाय या दिवशी शिवयोग आणि रवियोग यांचा मेळ साधला जात आहे. अशा स्थितीत या दिवशी श्रीगणेशासह महादेवाची पूजा केल्याने गणेशाची कृपाही प्राप्त होते.
असे करा श्रावण सोमवारचे व्रत
श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी भगवान शंकराची विशेष पूजा केली जाते. श्रावण सोमवारच्या दिवशी सर्वप्रथम लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. यानंतर घरच्या देवघरात ठेवलेल्या शंकराच्या पिंडीसमोर हात जोडून सोमवारचे व्रत करावे. सर्वप्रथम देवाजवळ दिवा आणि अगरबत्ती लावावी. महादेवाच्या पिंडीला अभिषेक करण्यासाठी ताम्हणात घ्यावे. शुद्ध पाण्याने अभिषेक करावा त्यानंतर पंचामृताने अभिषेक करावा. नंतर पुन्हा शुद्ध पाणी अर्पण करावे. पिंडीला स्वच्छ पुसून देवघरात ठेवावे. अक्षदा वाहव्या तांदुळाची शिवमूठ वाहावी आणि ओम नमःशिवाय नमः हा मंत्र म्हणत 108 बेलपत्र वाहावे. त्यानंतर महादेवाची आरती करून नैवैद्य दाखवावा.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)