Explainer: महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता आता काय करणार? कायम भगव्या वस्रात राहणार की पुन्हा संसारात रमणार ? सर्व काही जाणून घ्या
ममता हीने संन्यासी ते महामंडलेश्वर असा प्रवास अवघा २४ तासांत कसा काय पूर्ण केला? असा प्रश्न अनेकजणांना पडला आहे. ममताने जुना आखाड्यातून गुरु दीक्षा घेतली होती तर ती किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर का बनली? ममता मध्यम मार्गाने सनातन धर्माचा प्रचार करतील की राजकारणात शिरतील? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर समजून घेऊयात
![Explainer: महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता आता काय करणार? कायम भगव्या वस्रात राहणार की पुन्हा संसारात रमणार ? सर्व काही जाणून घ्या Explainer: महामंडलेश्वर बनल्यानंतर ममता आता काय करणार? कायम भगव्या वस्रात राहणार की पुन्हा संसारात रमणार ? सर्व काही जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/mamta-kulkarni-sanyaas.jpg?w=1280)
नव्वदच्या दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हीची कारकीर्द तशी वादगस्तच होती. तिने 1993 मध्ये एका मॅगझीनसाठी टॉपलेस फोटो शूट करुन त्या काळात हंगामा केला होता. त्यानंतर तिचे अंडरवर्ल्डशी संबंध असून ती दिग्दर्शकांना अंडरवर्ल्डकडून फोन करुन चित्रपट पदरात पाडून घ्यायची हे स्पष्ट झाल्याने ती रुपेरी पडद्यावरुन गायब झाली. विक्की गोस्वामी या अंडरवर्ल्ड डॉनशी तिचे संबंध होते. ड्रग्ज प्रकरणात तिच्या कंपनीवर आरोप झाले होते. पोलिसांना जप्त केलेले 80 लाखाचे ड्रग्ज ज्या कंपनीचे तिची ती डायरेक्टर होती. 2000 पासून ती भारतापासून दूर परदेशात राहीली आणि अचानक साल 2024 मध्ये ती पुन्हा भारतात आली. आता तिने संन्यास घेतल्याने ती पुन्हा चर्चेत आली आहे. ममता कुलकर्णी हीचा 24 तासांतील संन्याशी ते महामंडलेश्वरचा प्रवास धक्कादायक आहे. तिने गुरु दक्षिणा जूना आखाड्यातून घेतली परंतू महामंडलेश्वर किन्नर आखाड्यातून का झाली ? ममता मध्यम मार्गाने धर्माचा प्रचार करणार की राजकारणात येणार? प्रत्येक प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊयात….
महाकुंभमध्ये पोहचली ममता
1990 दशकातील आघाडीची अभिनेत्री ममता कुलकर्णी हीने महाकुंभ मेळाव्यात शुक्रवारी किन्नर आखाड्याची प्रमुख डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाटी हीची भेट घेऊन संन्यास घेण्याची इच्छा प्रकट केली आहे.त्यानंतर लक्ष्मी नारायण त्रिपाटी हीने तिची भेट आखाडा परिषदेचे अध्यक्ष रविंद्र पुरी यांच्याशी केली.
आश्रमात तिने सात तास तपस्या केली
लक्ष्मी नारायण त्रिपाठी हिच्याकडून ग्रीन सिग्नल मिळाल्यानंतर ममताने संन्यास घेण्याची तयारी सुरु केली. साधु संताच्या निगराणी खाली तिने रेतीवर बनलेल्या आश्रमात सात तास तपस्या केली. स्वत:चे पिंडदान करण्यासाठी स्वत:च्या हाताने पिंड तयार केले. सायंकाळी संगमाच्या किनारी पिंडदान केले, त्यानंतर गंगेच्या पाण्यात डुबकी मारली.
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/surya-and-chandra-grahan.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/dombivli-viral-video-news.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/anna-hazare.jpg)
![Image](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/congress-party-pic.jpg)
2 तासांचा दीक्षा सोहळा
त्यानंतर किन्नर आखाड्याच ममताना महामंडलेश्वर बनविण्याची दीक्षा पू्र्ण केली गेली. दोन तासांपर्यंत आचार्य आणि पुरोहितांनी तिच्या संन्यासाची दीक्षा दिली. जुना आखाड्याचे महामंडलेश्वर गर्गाचार्य मुचकुंत आणि पीठाधीश्वर स्वामी महेंद्रानंतर गिरी यांच्या देखरेखी खाली या धार्मिक विधी पार पडल्या.
महामंडलेश्वर घोषीत केले
ममता हिच्या गळ्यात विशेष मंत्रांनी परिष्कृत रुद्राक्षाची माळ घालण्यात आली. लक्ष्मी नारायण त्रिपाटी सोबत असलेल्या पुरोहितांनी तिला शंखाद्वारे दुग्ध स्नान घातल. तिला भगवे वस्र परिधान करण्यात आले.आखाड्याचा धर्मध्वजाखाली तिचा पट्टाभिषेक देखील करण्यात आला. या वेळी मंत्रोच्चाराचा जयघोष करण्यात आला.तिला 15 माळा घालण्यत आल्या. त्यानंतर ममताने किन्नर आणि जुना आखाड्यातील संतांचा आशीर्वाद घेतला.त्यानंतर किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाटी यांनी ममताला महामंडलेश्वर म्हणून घोषीत केले.
सनातन धर्मासाठी काम करण्याची इच्छा
‘ममताजी अभिनेत्री आहेत, किन्नर आखाड्यातून आज त्यांचे सर्व संस्कार पूर्ण झाले. त्यांचा पट्टाभिषेक करण्यात आला आणि ममताचे नामकरण आता श्री यमाई ममता नंद गिरी ठेवण्यात आले. ममताजी गेल्या अडीच वर्षांपासून आमच्या सोबत राहात आहेत,’ असे किन्नर आखाड्याच्या संस्थापक डॉक्टर लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी म्हटले आहे. ही 23 वर्षांची तपस्या आहे. त्यांनी सनातन धर्माशी जोडले जाण्याची आणि या धर्माच्या प्रचारासाठी काम करण्याची इच्छा होती. किन्नर आखाड्याने सर्वांना सोबत घेतले आहे. जे सनातनसाठी काम करेल त्यांना जोडण्याचे आमचे काम आहे. आम्ही श्री यमाई ममता नंद गिरी माता यांना देखील आमच्या सोबत घेतले असल्याचे लक्ष्मी नारायण त्रिपाटी यांनी म्हटले आहे.
संन्यास घेतना डोळ्यांत आले अश्रू
संन्यासाची दीक्षा घेताना ममता कुलकर्णी अनेक वेळा भावूक झाली. तिला तिच्या आयुष्यातील भूतकाळ डोळ्यासमोर जाताना दिसला तेव्हा तिला गहीवरुन आले आणि डोळ्यांतून अश्रु तरळले. महामंडलेश्वर झाल्यानंतर ममता छत्र आणि चिवर यांच्या सोबत दिसली. याप्रसंगी तिने जनतेला आशीर्वादही दिला आहे.
तीन दिवस कसोटीचे होते
मी 23 वर्षे तपस्या केली आहे. माझे गुरु श्री चैतन्य गुरु गगन नाथ हे जूना आखाड्याशी संलग्न आहेत. मी लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या दोन वर्षांपासून संपर्कात आहे. त्यांना माझ्या 23 वर्षांच्या तपस्येला ओळखले त्यानंतर जगदगुरू महेंद्र नाथ तिवारी यानी माझी परीक्षा घेतली, तीन दिवस माझे ज्ञान, तपस्ये संदर्भात मला काय माहिती आहे हे विचारले. ब्रह्म विद्ये संदर्भात मला काही माहिती नव्हती. तीन दिवस माझ्या तपस्येची परीक्षा झाली. त्यात मी उत्तीर्ण झाली असे श्री यमाई ममता नंदगिरी ( ममता ) हीने सांगितले. मला महामंडलेश्वर बनण्यासाठी आमंत्रण देण्यात आल्याचे ममता हीने सांगितले.
ममताचे धर्म गुरु चैतन्य गगनगिरी महाराज
ममता कुलकर्णी हीचे धर्मगुरु गुरु चैतन्य गगन गिरि महाराज आहेत. 23 वर्षांपूर्वी ममताला त्यांनी त्यांच्या आश्रमात दीक्षा दिली होती. मुंबईपासून 80 किलोमीटर अंतरावर रायगड येथे गगन गिरि महाराज यांचा आश्रम आहे. ममता यांच्या गुरुचा संबंध जुना आखाड्याशी आहे. मग ममता हीने जूना आखाड्या ऐवजी किन्नर आखाड्यातून महामंडलेश्वर ही पदवी का घेतली यामागे ममता हीचा पूर्व इतिहास कारणीभूत असावा असे म्हटले जात आहे.
ममतावर अंडरवर्ल्डशी कनेक्शनचा आरोप
ममता कुलकर्णी हिच्यावर मुंबईत साल 2016 मध्ये ड्रग्ज तस्करीचा आरोप दाखल झाला होता. नार्कोटीक्स विभागाने अटक वॉरंट देखील जारी केले होते. एका कंपनीच्या कन्साईमेंटमधून 80 लाखांचे ड्रग्ज सापडले होते. या कंपनीची डायरेक्टर ममता कुलकर्णी होती. ममता हीचे संबध ड्रग माफीया विक्की गोस्वामी याच्याशी जोडला जात आहे. विक्की गोस्वामी याला ड्रग्ज तस्करीच्या केसमध्ये दुबईत 12 वर्षांची शिक्षा झाली होती. अंडरवर्ल्डशी कनेक्शन असल्याचे आरोप ममतावर होते.
साल 2000 ममता देशाबाहेर गेली
ममता साल 2000 पासून देशाबाहेर गेली होती. आणि साल 2024 मध्ये ती परत आली. जूना आखाडा ममता हीला त्यामुळे ही महामंडलेश्वर पदवी देऊ शकत नाही. त्यांची पहिली अट ही आहे की संन्याशीच महामंडलेश्वर बनू शकतो. नदी किनारी मुंडन करावे लागते. त्यानंतर स्नान करण्यात येते. आई-वडील, मुले, पती आणि स्वत:चे पिंडदान करावे लागते. जमाधन दान करावे लागते. घर आणि कुटुंबाचा त्याग करावा लागतो.
ममताने किन्नर आखाड़ा का निवडला?
ममताने सनातन धर्माची दीक्षा जरुर घेतली होती. परंतू संन्यास महाकुंभ मध्ये येऊन घेतला आहे. महामंडलेश्वर बनण्यासाठी किन्नार आखाड्याचे नियम थोडे शिथील आहेत. या आखाड्याच्या नियमांनुसार महामंडलेश्वन बनल्यानंतरही कुटुंब आणि कामधंदा करु शकतो. 13 आखाड्यांसारखे कठोर व्रत आणि साधना करावी लागत नाही.
मध्यममार्गी महामंडलेश्वर
अध्यात्मिक जीवनासाठी तीन मार्ग असतात. एक वामपंथी, एक दक्षिणपंथी आणि मध्यमपंथी असे ते तीन मार्ग आहेत. लक्ष्मी नारायण त्रिपाटी या मध्यमपंथी मार्गाच्या महामंडलेश्वर आहेत. 23 वर्षांपासून ते ध्यान आणि तप माझ्या गुरुकडून मला प्राप्त झाले. मी आध्यात्मिक जीवनाद्वारे सर्वांना स्वतंत्र करण्यासाठी आले आहे. मला लक्ष्मी नारायण त्रिपाटी यांच्याहून चांगली आणखी कोणती संस्था आढळली नाही. मी विचार करु शकत नव्हते की संसारीक जीवनात राहूनही मला माझे स्वतंत्र जीवन जगायला मिळणार आहे असे ममता ऊर्फ श्री यमाई ममता नंद गिरी माता हीने म्हटले आहे.
साधूसंतांच्या भेटीनंतर हृदय परिवर्तन
गंगेत स्नान केल्यानंतर मी काशी विश्वनाथाच्या दर्शनाला जाणार होते., परंतू प्रयागराज येथे माझी भेट तीन साधूसंतांशी झाली. त्यानंतर माझे हृदयपरिवर्तन झाले. मी महागौरीची पूजा करते. त्यामुळे शुक्रवारी मी माझ्या जीवनातला सर्वात महत्वाचा निर्णय घेतल्याचे ममता ऊर्फ श्री यमाई ममता नंद गिरी माता यांनी सांगितले.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मुक्काम
ममता आता कायम भगव्या वस्रात दिसणार का ? की महाकुंभनंतर ती आपले संसारी जीवन पुन्हा सुरु करणार ? ममता आता फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापर्यंत प्रयागराज येथे थांबणार आहे. शिबिरात राहून कल्पवास करणार आहे. साधू संतांसोबत साधना करणार आहे. महाकुंभ नंतर ममता भगवी वस्रे किंवा सामान्य वस्रे दोन्ही परिधान करु शकते असे म्हटले जात आहे.
महाकालने मला दर्शन दिले
आपण परदेशात राहूनही कठोर साधना करीत आहोत. मी २ महिने केवळ पाणी प्यायले आणि तपश्चर्या केली आहे. एकदा महाकाल माझ्यासमोर प्रकट झाले होते आणि त्यांनी त्यांची प्रलय लीला दाखवली होती असा दावा ममता कुलकर्णी हीने केला आहे. ममता हीने बांगलादेश आणि पाकिस्तानबद्दलही उघडपणे भूमिका मांडली आहे. दोन्ही देश त्यांच्या स्वतःच्या कृतींमुळे स्वतःचा नाश करतील. धर्माच्या नावाखाली पापकर्म करणाऱ्यांना संसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही जीवनात दुःख भोगावे लागेल असेही ममता हीने म्हटले आहे.