‘यामुळे’ जुन्या घरांना असायची दोन दरवाजे
दोन दरवाजे फक्त एक संरचनात्मक घटक नाही तर ते आपल्या परंपरेची, संस्कृतीची आणि घरातील विविध प्रथा आणि मूल्यांची प्रतीकं आहेत.

आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे हे प्रत्येकाला वाटतं. त्यासाठी लोक मेहनत करत असतात. आज घरांच्या दरवाज्यांपासून ते फर्निटर बनवण्यापर्यंत लोक लाखो रुपये खर्च करतात. परंतु तुम्ही जर गावांमध्ये राहीला असाल आणि जुन्या घरांचे दरवाजे पाहिले असतील तर तुमच्या लक्षात येईल पूर्वी घराला एका दरवाजे नव्हता. पूर्वीच्या काळात घराला दोन दरवाजे असायचे. या प्रकारच्या दरवाज्यांमागे काही आर्किटेक्चरल आणि सामाजिक कारणे होती. यामुळे घरांमध्ये दोन दरवाजे वापरले जात होते. चला, पाहूया यामागील काही महत्त्वाची कारणे.
आजकालच्या नवीन घरांमध्ये एकच दार लावण्याची पद्धत आहे. पण आपल्या आजी आजोबांच्या काळात घरांमध्ये दोन दरवाजे लावले जात होते. भारतात विशेषत: जुन्या घरांच्या बांधकामात आणि सजावटीत दोन दरवाजे एक अत्यंत महत्त्वाचा घटक होते. हे दरवाजे केवळ सुरक्षा वाढवण्याच्या दृष्टीने नव्ह तर सांस्कृतिक आणि पारंपरिक दृष्टिकोनातूनही महत्त्वाचे होते.
सुरक्षा आणि मजबूती दोन दरवाजे एक दरवाज्यांपेक्षा जास्त मजबूत असायचे. त्यांना तोडणे किंवा उघडणे कठीण असायचे. त्यामुळे घराच्या सुरक्षततेच्या दृष्टीने मोठा फायदा होतो. पूर्वी गावाकडे चोरी आणि लुटीचे प्रकार जास्त घडायचे. यामुळे घरांची सुरक्षा महत्वाची होती. त्यामुळे दोन दरवाज्यांचा वापर घरातील संरक्षण वाढवण्यासाठी केला जात होता.
सांस्कृतिक आणि पारंपरिक महत्त्व दोन दरवाजे घरात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचे प्रतीक मानले जात होते. या दरवाजांना उघडून पाहुण्यांचे स्वागत मोठ्या अभिमानाने सन्मान केला जात होते. याशिवाय, मोठे आणि भव्य दरवाजे घरमालकाच्या सामाजिक प्रतिष्ठेचे द्योतक मानले जात होते.
वास्तु शास्त्र वास्तु शास्त्रानुसार दोन दरवाजे घरात सकारात्मक ऊर्जा आणतात. यामुळे घरातील वातावरण शुद्ध राहते.
अन्य फायदे विविध ऋतूंमध्ये संरक्षण: दोन दरवाजे घराच्या तापमानावर नियंत्रण ठेवण्यास मदत करत होते. हे दरवाजे घराला उबदार ठेवण्यास हिवाळ्यात आणि पावसाळ्यात मदत करायचे.
गोपनीयता: या दरवाज्यामुळे घरातील गोपनीयता राखली जात होती.
हवेचा प्रवाह: दोन दरवाजामुळे घरात हवा खेळती राहत होती. यामुळे शुद्ध हवा घरात येत होती.
मोठ्या वस्तूंच्या हालचालीसाठी सोपे: घरात मोठ्या वस्तू आणण्यासाठी किंवा बाहेर नेण्यासाठी दोन दरवाजे सोयीसकर ठरायचे.
पूर्वी दोन दरवाजे तयार करण्यासाठी लाकडाचे मोठे आणि मजबूत तुकडे वापरले जात होते.
आजकाल, आधुनिक घरांमध्ये दोन दरवाजे कमी वापरले जात आहेत. दोन दरवाजाची जागा आता सिंगल डोर आणि स्लायडिंग डोर्सने घेतली आहे. तरीसुद्धा, काही लोक आपल्या घरांमध्ये पारंपरिक लूक राखण्यासाठी आजही दोन दरवाजे वापरतात.