AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ipl : आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याचा स्पप्नभंग होणार? अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन?

अहमदाबाद संघ हा सीवीसी कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटेडवरती सह्या करण्यात आल्या नाहीत, या कंपनीचे युरोपत सट्टेबाजीशी कनेक्शन असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत

Ipl : आयपीएलमध्ये 10 टीम खेळवण्याचा स्पप्नभंग होणार? अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन?
आगामी आयपीएलमध्ये (IPL 2022) 8 च्या जागी 10 संघ आमने-सामने भिडताना दिसतील. यात लखनऊ आणि अहमदाबाद हे दोन संघ नव्याने सामिल झाले आहेत. दरम्यान आता या संघानी लिलावप्रक्रियेपूर्वी इतर संघाची जुळवाजुळव सुरु केली असून लखनऊ संघाने मुख्य प्रशिक्षक पदासाठीही दोन दिग्गज माजी खेळाडूंशी बोलणी केली आहे.
| Edited By: | Updated on: Nov 29, 2021 | 7:06 PM
Share

आयपीएलमध्ये 10 टीम खळवण्याचं स्पप्न अर्धवटच राहणार का? असा सवाल आता उपस्थित राहू लागलाय. कारण अहमदाबाद फ्रेंचाईसीशी निगडीत कंपनीचे सट्टेबाजीशी कनेक्शन असल्याचं बोललं जातं आहे. त्यामुळे आयपीएलच्या संघाना रिटेंशन टाईमही वाढवून दिला जाऊ शकतो. याबाबत अधिकृतरित्या अजून कोणतीही माहिती समोर आली नाही. बीसीसीआय काय निर्णय घेणार यावरती 10 टीम खेळणार की नाही हे ठरू शकतं.

सीवीसी कॅपिटलचे सट्टेबाजीसी कनेक्शन

अहमदाबाद संघ हा सीवीसी कॅपिटलने 5625 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. मात्र अजूनही बीसीसीआयकडून लेटर ऑफ इंटेडवरती सह्या करण्यात आल्या नाहीत, या कंपनीचे युरोपत सट्टेबाजीशी कनेक्शन असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत, मात्र आम्ही कुठलेही बेकायदेशीर काम करत नसल्याचं या कंपनीकडून सांगण्यात आलंय. सीवीसी कॅपिटलच्या प्रकरणाला सॉलीसिटर जनरल तुषार मेहता यांच्याकडे पाठवण्यात आलं, त्यांनी बीसीसीआयला सकारात्मक माहिती दिल्याच्याही चर्चा आहेत. मात्र ललित मोदी यांनी या कंपनीला कडाडून विरोध केल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे.

बीसीसीआयने वकिलाकडून कायदेशीर सल्ला मागितला

बीसीसीआयने याबाबत वकिलाकडून कायदेशी सल्लाही मागितला आहे. तर दुसरीकडे लखनऊ टीमविरोधातही काही तक्रारी बीसीसीआयला प्राप्त झाल्या आहेत. लखनऊ टीमचे मालक इतर खेळाडुंना त्यांच्याकडे येण्यासाठी अमिष देऊन मोठी रक्कम ऑफर करत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. त्यामुळे हा वाद आणखी वाढला आहे. 30 नोव्हेंबरपर्यंत आयपीलमधील टीमच्या रिटेंशन यादी देण्याचा वेळ आहे. हा वेळ आणखी वाढवला जाऊ शकतो. किंवा अहमदाबाद आणि लखनऊाला खेळाडुंची निवड करण्यासाठीही जास्त  वेळ वाढवून दिली जाऊ शकते. त्यामुळे या प्रक्रियेला किती वेळ लागतोय हे निश्चित नसल्यानं आयपीएलमध्ये 10 टीम खेळवणं केवळ स्पप्नच राहणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.

Maharashtra School Reopening | राज्यात शाळा 1 डिसेंबरपासूनच सुरु होणार, शासन निर्णय जारी

नियम फक्त जनतेला, सरकारमधील मुख्यमंत्री-आमदारांच्या कार्यक्रमाला नाही – Atul Bhatkhalkar

परमबीर सिंह आणि सचिन वाझे भेटीमागे कोण? चौकशी व्हावी, काँग्रेस नेते अतुल लोंढे आक्रमक

300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून...
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा
मोदी ऑन बोर्ड E-Mail चा उल्लेख अन्...पृथ्वीराज चव्हाणांचा सनसनाटी दावा.
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली
मराठी अन् मुस्लिम मतदारांच्या ध्रुवीकरणासाठी ठाकरे बंधूंची रणनिती ठरली.
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल
मोदी आणि एपस्टीनचं काय नातं? एपस्टीन प्रकरणावरून चव्हाणांचा थेट सवाल.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.