मुलींची छेड काढून मुख्याध्यापकांवर तलवारीने हल्ला करणारा रोड रोमियो पोलिसांच्या ताब्यात
शाळेतील मुलींची रोडरोमियोंकडून छेडछाड होत असल्याने रोडरोमिओला समजवण्यासाठी जात असताना मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांच्यावर तलावारीने हल्ला करण्यात आला होता. यामध्ये मुख्याध्यापक आणि शाळेचे अधीक्षक दोघेही जखमी झाले होते.
औरंगाबाद: शाळेतील मुलींची रोडरोमियोंकडून छेडछाड होत असल्याने रोडरोमिओला समजवण्यासाठी जात असताना मुख्याध्यापक (Head Master) आणि अधीक्षक (Superintendent) यांच्यावर तलावारीने हल्ला (Attack) करण्यात आला होता. यामध्ये मुख्याध्यापक आणि शाळेचे अधीक्षक दोघेही जखमी झाले होते. त्यानंतर हल्ला करणाऱ्या रोडरोमिओविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शाळेच्या मुख्याध्यापकांवर व अधीक्षकांवर हल्ला झाल्याने शिक्षक संघटनेचे आंदोलनाचा इशारा दिला होता. मात्र हल्ला झाल्यानंतर आठ तासाच्या आधी मज्जीद जमील शेखला पुण्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले. कन्नड शहरातील कनकावतीनगरामध्ये शाळेच्या मुलींंची छेडछाड करण्यात येत होती, त्यामुळे मुख्याध्यापक आणि शाळेच्या अधीक्षकांकडून संशयित आरोपी मज्जीद शेखला त्याच्या घरी जाऊन समजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र त्याआधी शहरातील चौकातच शिक्षकांवर तलावारीने हल्ला करून संशयित आरोपी फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके रवाना केली होती.
कन्नड शहराजवळी कनकावतीनगरातील कर्मवीर काकासाहेब देशमुख शाळेसमोर मज्जीद शेख हा शाळेतील मुलींची छेड काढायचा. या प्रकरणावरुन त्याचे आणि मुख्याध्यापकांचे शाब्दीक वाद झाले होते. त्यानंतर त्याला समजवण्यासाठी त्याच्या घरी जाण्यासाठी मुख्याध्यापक आणि अधीक्षक तयार झाले होते. त्यानंतर मुख्याध्यापक आणि अधीक्षक शाळेच्या प्रवेशाद्वारासमोर थांबलेले असतानाच मज्जीद हा शाळेसमोर चकरा मारत होता. यावेळी वाद होऊन त्याने भर चौकातच संतोष जाधव आणि मुख्याध्यापक आबासाहेब यांच्यावर हल्ला करण्यात आला. हा वाद सुरू असतानाच त्याला काही शिक्षकांनी पकडण्याचा प्रयत्न केला मात्र तो फरार झाल. त्यानंतर तात्काळ त्याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करुन त्याच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना करण्यात आली. त्यानतर आठ तासातच संशयित आरोपीला पुण्यातून अटक करुन ताब्यात घेण्यात आले.
शाळेतील मुलींची छेडछाड होत असल्याने आणि संशयित आरोपीने शिक्षकांवरच हल्ला केल्याने शिक्षकांसह नागरिकांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. या हल्ल्याप्रकरणी चोवीस तासाच्या आत आरोपीला ताब्यात घेतले गेले नाही तर आंदोलनाचा इशारा शिक्षक संघटनेने दिला होता. हल्ला करून पळून गेलेला मज्जीदला पोलिसांनी पुण्यातून ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक दिनेश जाधव यांना तैनात केलेल्या तीन पथकांपैकी एका पथकाने त्याला पुण्यातून ताब्यात घेतले आहे.
संबंधित बातम्या
दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे? हाडांच्या नमुन्यातून सत्य उलगडणार