Cricket : बाबर आझमचं ऑस्ट्रेलियविरुद्ध शतक, विराट कोहली होतोय ट्रोल, काय आहे विराट ट्रोल होण्यामागचं कारण?
क्रिकेट विश्वात सध्या वेगळीच तुलना सुरू आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात 'महान खेळाडू कोण' अशी तुलना सोशल मीडियावर केली जातेय. बाबरनं दोन वर्षानंतर शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटीमध्ये 196 धावांची शानदार खेळी बाबरनं केली. आता एकीकडे पाकिस्तानी खेळाडूने शतकांचा त्यांचा दुष्काळा संपवला आहे. मात्र, विराट कोहली अजूनही संघर्ष करत आहे, असं ट्रोलर्स सोशल मीडियावर म्हणतायेत.
मुंबई : क्रिकेट (Cricket) विश्वात सध्या वेगळीच तुलना सुरू आहे. पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (babar azam) आणि भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली यांच्यात ‘महान खेळाडू कोण’ अशी तुलना सोशल मीडियावर केली जातेय. बाबरनं दोन वर्षानंतर शतक झळकावलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कराची कसोटीमध्ये 196 धावांची शानदार खेळी बाबरनं केली. आता एकीकडे पाकिस्तानी खेळाडूने (pakistan cricket team) शतकांचा त्यांचा दुष्काळा संपवला आहे. मात्र, विराट कोहली अजूनही संघर्ष करत आहे, असं ट्रोलर्स सोशल मीडियावर म्हणतायेत. 27 महिने तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटला शतक झळकावता आलेलं नाही. त्यामुळे विराटला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. नेटिझन्स ट्विटरवर चांगलेच सक्रिय झाले असून विराटला जोरदार ट्रोलिंग करणं सुरु झालंय. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलियात खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटीमध्ये पाकिस्तान पराभवाच्या छायेत आहेत. ऑस्ट्रेलियानेही पाकिस्तानच्या सुरूवातीच्या विकेट काढत पाक संघावर चांगलाच दबाव आणला होता. आता यातच विराट कोलहीला ट्रोल केलं जातंय.
विराट ट्रोलर्सच्या निशाण्यावर
विराट कोहली ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. अनेकांनी चित्रपटाचे पोस्टर शेअर करत म्हटलं की, बाबरनं फेब्रुवारी 2020 नंतर पहिले शतक झळकावले आहे. आता चाहते विराट कोहलीला ‘कब खून खोलेगा रे तेरा’ असं विचारत आहे.
#BabarAzam? scores his first Test Century since Feb, 2020.
Fans to Virat Kohli: #PakVsAustraila #PAKVSAUS pic.twitter.com/igWy6GZdo1
— Usman Saleem Akhter (@UsmaanSaleem) March 15, 2022
एका युजरने लिहिलंय की बाबर आझम पाकिस्तानचा विराट कोहली नाही. आता हे वाक्य लोकांनी आपापल्या परीनं समजून घेतल्याचं दिसतंय.
#BabarAzam to Virat Kohli after today:#PakVsAustraila pic.twitter.com/SAMbX8Y5xk
— Sidhu Cricket Wala (@Azsidhu) March 15, 2022
बाबरनं कोहलीला मागे टाकलं एका पाकिस्तानी युजर्सनं लिहिलंय की, बाबर आझम आपल्या करिअरमध्ये प्रथमच आयसीसी क्रमवारीत विराट कोहलीच्या वर पोहचलाय. बाबर आझम जागतिक क्रिकेटचे नेतृत्व करत आहे, असं म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. आणखी एका पाकिस्तानी युजरने लिहिलंय की, बाबर आझम कसोटी क्रमवारीत 8 व्या स्थानी आहे. तर कोहलीची नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.
#BabarAzam? Overtakes Virat Kohli & now ranked ahead of Kohli in all three formats pic.twitter.com/qwbekO7RPy
— Arslan Tyagi (@arsetweets) March 16, 2022
बाबर आझमचं कौतुक का? दोन शतकांदरम्यान बाबरने वनडे आणि टी-20 मध्ये शतके झळकावली आहे. दोन कसोटी, दोन कसोटी शतकांमध्ये बाबरने वनडेमध्ये तीन आणि टी-20 मध्ये एक शतक झळकावले आहे. आतापर्यंत 39 कसोटीत 6 शतके झळकावली आहे. बाबरच्या नावावर 83 एकदिवसीय सामन्यांमध्ये 14 शतके आणि 73 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये एक शतक बाबरनं झळकावलं आहे.
For the first time in his career, Babar Azam is above Virat Kohli in the ICC Test batting ranking. Indeed it won’t be wrong saying that Babar is currently ruling the world of cricket. ❤️#BabarAzam? #BabarAzam #PAKvAUS pic.twitter.com/8ZPDfBb8lo
— Mairy Rajput (@mairyrajput) March 16, 2022
???? Babar Azam gets promotion while Virat Kohli demoted in Test Batting Rankings! Babar Azam now stands #8 (743 pts) while Virat Kohli demoted to #9 (742 pts). Indeed it won’t be wrong calling the current cricketing decade belongs to Babar Azam! #PAKvAUS
— Arfa Feroz Zake (@ArfaSays_) March 16, 2022
विराटवर चाहते काय म्हणाले? विराट कोहलीनं नोव्हेंबर 2019 मध्ये शेवटचे शतक झळकावले. योगायोगानं कोहलीनं बांगलादेशविरुद्ध शतक झळकावले होते. कोलकाता डे-नाईट टेस्ट होती. त्यानंतर विराट कोहलीने 136 धावांची खेळी खेळली. तेव्हापासून कोहलीला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये शतक झळकावता आलेले नाही. यावरही नेटिझन्सनं विराटला ट्रोल केल आहे.
Again people comparing Babar Azam with Virat Kohli,Meanwhile Kohli at age of 22 on Australian home soil. pic.twitter.com/TYSclkQfSs
— Harshit (@Bringbackold_18) March 16, 2022
Finally a test hundred for Bobby, but what about Virat Kohli?#BabarAzam? #Babar pic.twitter.com/AFZxVH5Edo
— Cricket Coder (@cricket_coder) March 15, 2022
दरम्यान, विराटला सोशल मीडियावर नेटिझन्सनं ट्रोल केलं असलं तरी विराटनं मात्र यावर काहीही उत्तर दिलेलं नाही.
इतर बातम्या