Pele dies : जगावर अधिराज्य गाजवणारे फुटबॉलचे जादूगार पेले यांचं निधन; कर्करोगाशी झुंज संपली

जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान फुटबॉलपटू, तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचं निधन झालं आहे.

Pele dies : जगावर अधिराज्य गाजवणारे फुटबॉलचे जादूगार पेले यांचं निधन; कर्करोगाशी झुंज संपली
Follow us
| Updated on: Dec 30, 2022 | 10:01 AM

ब्राजीलिया : जगभरातील फुटबॉलप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे शतकातील महान फुटबॉलपटू, तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे एकमेव खेळाडू पेले यांचं निधन झालं आहे. वयाच्या 82व्या वर्षी पेले यांनी शेवटचा श्वास घेतला. पेले यांना कोलन कँसर झाला होता. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा खेळाडू कँन्सरविरोधातील झुंज हरला. गुरुवारी 29 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

हे सुद्धा वाचा

20व्या शतकातील महान फुटबॉलपटू पेले यांना कोलन कॅन्सर झाला होता. त्यांची किडनी आणि हृदय फेल झालं होतं. त्यामुळे त्यांची दिवसे न् दिवस प्रकृती खालावत चालली होती. पेले यांना डॉक्टरांच्या खास पथकाच्या निगरानी खाली ठेवण्यात आलं होतं. मात्र, अखेर त्यांची कॅन्सरशी झुंज अपयशी ठरली. त्यांच्या निधनामुळे केवळ फुटबॉल जगतावरच नव्हे तर जगभरातील क्रीडाप्रेमींवर शोककळा पसरली आहे.

प्रेम आणि प्रेरणा

पेले यांच्या कुटुंबीयांनी गुरुवारी रात्री पेले यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून त्यांच्या निधनाची बातमी दिली. महान खेळाडू पेले यांचा फोटो शेअर करत त्यांच्या निधनाचं वृत्त दिलं. प्रेम आणि प्रेरणा हीच पेले यांची खासियत होती, असं त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Pelé (@pele)

रेकॉर्ड किंग

इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीने पेले यांना 1999मध्ये अॅथलिट ऑफ द सेंच्युरीचा किताब बहाल केला होता. पेले यांच्या नावावर 1363 सामन्यात 1279 गोल करण्याचा जागतिक विक्रम नोंद आहे. तीन वेळा वर्ल्ड कप जिंकणारे पेले हे जगातील पहिले आणि एकमेव खेळाडू आहेत.

त्यांनी 1958, 1962 आणि 1970 मध्ये तीन वर्ल्ड कप जिंकले होते. ब्राझीलसाठी संयुक्तपणे सर्वाधिक गोल करणारे ते एकमेव खेळाडू होते. त्यांनी 92 सामन्यात 77 गोल केले होते.

सोळावं वरीस…

पेले यांनी वयाच्या 15 व्या वर्षापासून सांतोसकडून फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली होती. त्यांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ब्राझीलच्या राष्ट्रीय टीममध्ये पदार्पण केलं होतं. 7 जुलै 1957मध्ये अर्जेंटिनासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय सामन्यात पदार्पण केलं होतं.

पेले यांच्या पदार्पणाचा हा सामना ब्राझिलने 2-1ने जिंकला होता. त्या सामन्यात पेले यांनी एक गोल करून इतिहास घडवला होता. त्यावेळी पेले यांचं वय अवघं 16 वर्ष 9 महिने होतं. पदार्पणातच गोल करणारे ते ब्राझिलचे सर्वात तरुण खेळाडू बनले होते. पुढच्याच वर्षी त्यांनी फुटबॉल विश्वचषकात भाग घेतला होता. विश्वचषक सामन्यात भाग घेणारे ते त्यावेळचे सर्वात तरुण खेळाडू होते.

हॅट्रिकचा बादशाह

विक्रम आणि पेले हे जणू समीकरणच झालं होतं. फ्रान्सच्याविरोधात सेमीफायनलमध्ये पेले यांनी हॅट्रीक लगावली होती. वर्ल्डकपच्या इतिहासात अशा विक्रम करणारे ते सर्वात तरुण खेळाडू ठरले होते. एवढेच नव्हे तर 1958मध्ये वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भाग घेणारेही ते सर्वात तरुण खेळाडू ठरले होते.

वर्ल्डकप अंतिम सामन्याच्यावेळी त्यांचं वय होतं 17 वर्ष 249 दिवस. अंतिम सामन्यात पेले यांनी दोन गेल केले होते. त्यावेळी ब्राझिलने स्वीडनला पराभूत करत वर्ल्ड कप जिंकला होता. त्यानंतर पेले यांचं नाव जगभरात पोहोचलं होतं.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.