आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना

चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे (Chennai Super Kings members tested corona positive).

आयपीएल सुरु होण्याआधीच CSK संघाला मोठा झटका, सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोना
Follow us
| Updated on: Aug 28, 2020 | 8:01 PM

दुबई : आयपीएलचं तेरावं सीझन सुरु होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाला मोठा झटका बसला आहे. चेन्नई सुपर किंग्स संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये एका खेळाडूचादेखील समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र, सपोर्ट स्टाफमधील नेमकं किती जणांना आणि कोणत्या खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही (Chennai Super Kings members tested corona positive).

कोरोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आयपीएलचं तेरावं सीझन दुबईत आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. दुबईत 19 सप्टेंबरपासून आयपीएलचं तेरावं सीझन सुरु होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर सीएसके संघ 21 ऑगस्ट रोजी दुबईत दाखल झाला. बीसीसीआयच्या नियमानुसार संपूर्ण संघ आठवडाभर क्वारंटाईन होता (Chennai Super Kings members tested corona positive).

सीएसके संघाचा क्वारंटाईन कालावधी शुक्रवारी संपणार होता. त्यानंतर सीएसकेचे खेळाडू सरावाला सुरुवात करु शकणार होते. मात्र, संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे संपूर्ण संघाचा क्वारंटाईन कालावधी आणखी आठवडाभरासाठी वाढवण्यात आला आहे. त्याचबरोबर ज्यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आलं आहे.

बीसीसीआयच्या नियमानुसार दुबईत आल्यानंतर प्रत्येक संघाच्या खेडाळू आणि सपोर्ट स्टाफमधील कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी तीन वेळा करणं अनिवार्य आहे. दुबईत येण्याआधी भारतात प्रत्येक खेळाडू आणि कर्मचाऱ्याची पाचवेळा कोरोना चाचणी करण्यात आली होती. पाचवेळा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानंतर सर्व खेळाडूंना दुबईत येता आलं. तर विदेशातील खेळाडूंना दुबईत येण्याआधी 14 दिवस होम क्वारंटाईन आणि दोनवेळा चाचणी करावी लागली.

दुबईत आल्यानंतर खेळाडू ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे प्रचंड कडक नियम होते. या हॉटेलमध्ये खेळाडूंना सात दिवस एकमेकांना भेटण्याचीदेखील परवानगी नव्हती. या सात दिवसात खेळाडूंची तीनवेळा कोरोना चाचणी करण्यात आली. दरम्यान, सीएसके संघाच्या सपोर्ट स्टाफमधील काही जणांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वांची पुन्हा चाचणी करण्यात आली. सीएसके संघाच्या खेळाडूंच्या चौथ्या कोरोना चाचणीचा अहवाल उद्या (29 ऑगस्ट) मिळणार आहे. सर्वांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर एका आठवड्यानंतर खेळाडूंना सराव सुरु करता येईल.

बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान
बीडमध्ये हैवानालाही लाजवणारा खून, नव्या एसपी कावत यांच्यापुढे आव्हान.
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.