IPL 2022: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अचानक धडकले वानखेडे स्टेडियमवर, जाणून घ्या कारण….

इंडियन प्रिमियर लीगचा यंदाचा 15 वा हंगाम महाराष्ट्रात आयोजित होणार आहे. मुंबई आणि पुण्यात IPL चे सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत.

IPL 2022: पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे अचानक धडकले वानखेडे स्टेडियमवर, जाणून घ्या कारण....
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 6:07 PM

मुंबई: इंडियन प्रिमियर लीगचा यंदाचा 15 वा हंगाम महाराष्ट्रात आयोजित होणार आहे. मुंबई आणि पुण्यात IPL चे सर्व सामने खेळवण्यात येणार आहेत. लीग राऊंडमधील सर्व 70 सामने मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर खेळवले जाणार आहेत. मुंबईत वानखेडे, (Wankhede Stadium) डीवाय पाटील (Dy Patil) आणि ब्रेबॉर्न या तीन स्टेडियम्सवर सामने होणार आहेत. पुण्यात 15 मॅचेस होतील. सर्व संघ वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियमवर प्रत्येकी चार-चार सामने खेळतील. त्याशिवाय पुणे आणि ब्रेबॉर्न प्रत्येक संघाचे तीन-तीन सामने होतील. मुंबईत होणाऱ्या आयपीएल सामन्यांच्या पार्श्वभूमीर आज राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन प्रत्यक्ष तयारीचा आढावा घेतला.

कोण-कोण उपस्थित होतं वानखेडे स्टेडियम सामन्यांच्या आयोजनासाठी कितपत तयार आहे, डगडुजी कुठे करावी लागणार आहे का? या बद्दल त्यांनी एमसीए म्हणजे मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा केली. त्यांच्याकडून काही गोष्टी समजून घेतल्या. आदित्य ठाकरेंनी वानखेडे स्टेडियमवर जाऊन पाहणी केली, त्यावेळी तिथे बीसीसीआयचे अंतरीम सीईओ हेमांग अमीन, टी 20 मुंबई लीगचे चेअरमन मिलिंद नार्वेकर, अजिंक्य नाईक आणि नदीम मेमन सुद्धा उपस्थित होते.

आगामी आयपीएल हंगामाच्या दृष्टीने महाराष्ट्र सरकार बीसीसीआयला सर्वतोपरी मदत करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी आश्वस्त केले. खेळाडूंच्या प्रवासादरम्यान मुंबईतील ट्रॅफिकमध्ये खोळंबा होऊ नये याकरिता वाहतूक पोलिसांकडूनही सर्वतोपरी मदत करण्यात येणार असून खेळाडूंच्या बसेस करीता विशेष ‘ग्रीन चॅनेल’ तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे खेळाडूंचा प्रवास अधिक सुकर होईल.

प्लेऑफचे सामने कुठे?

प्लेऑफ संबंधी कुठलाही निर्णय झालेला नाही. फायनल सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होईल. सर्व 10 संघ प्रत्येकी 14 सामने खेळणार आहेत. 14 मधले सात सामने घरच्या मैदानावर तर सात दुसऱ्या मैदानावर होतील. लीगमध्ये यंदा 60 ऐवजी 74 सामने होतील. प्रत्येक संघ पाच संघांविरुद्ध प्रत्येकी दोन-दोन सामने खेळेल. चार संघ फक्त एक-एक सामना खेळतील. लीग राऊंडनंतर चार प्लेऑफचे सामने होतील. पण त्यांचं स्थळ आणि तारीख जाहीर झालेली नाही.

10 टीम्सची दोन ग्रुप्समध्ये विभागणी

2011 प्रमाणे आताही संघांची ग्रुपमध्ये विभागणी केली जाईल. 10 टीम्सना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात येईल. दोन ग्रुप्समध्ये प्रत्येकी पाच संघ असतील. आपल्या ग्रुपमधल्या संघाबरोबर एकदा आणि दुसऱ्या ग्रुप बरोबर दोनदा खेळण्याची संधी मिळेल. काही दिवसांपूर्वी झालेल्या ऑक्शनमध्ये दहा फ्रेंचायजींनी एकूण 204 खेळाडू विकत घेतले होते. याआधी 33 खेळाडूंना रिटेन करण्यात आलं होतं. म्हणजे एकूण 237 खेळाडू स्पर्धेमध्ये खेळणार आहेत.

Aadityaji Thackeray visited the MCA/BCCI office at the Wankhede stadium

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.