Kabul Airport Attack वर राशिद खानची पहिली प्रतिक्रिया, मनातील दु:ख व्यक्त करत म्हणाला…

अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात जवळपास 72 लोकांचा मृत्यू झाला. या सर्वावर अफगाणिस्तानचा स्टार क्रिकेटर राशिद खानने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Kabul Airport Attack वर राशिद खानची पहिली प्रतिक्रिया, मनातील दु:ख व्यक्त करत म्हणाला...
राशिद खान
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 1:45 PM

मुंबई : क्रिकेटच्या मैदानावर विकेटसाठी पंचासमोर अपील करताना अफगाणिस्तानचा दिग्गज खेळाडू राशिद खान (Rashid Khan) अनेकदा दिसला आहे. मात्र मागील काही दिवसांपासून तो ट्विटरद्वारे जगभरातील देशांच्या प्रमुखांना  अफगाणिस्तानमध्ये सुरु असलेला तालिबान विरुद्ध अफगाणिस्तान वाद थांबवण्याची विनवणी करतो आहे.  अफगाणिस्तानमध्ये गुरुवारी (26 ऑगस्ट) काबुल विमानतळावर झालेल्या दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर केलेल्या हल्ल्यात (Kabul Blast) अनेक लोकांचा मृत्यू झालाय. या घटनेबाबत दुख व्यक्त करत राशिदने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

राशिद खानला काबुल विमानतळावरील हल्ल्याबाबत माहिती होताच त्याला फार दुख झालं. त्याने लगेचच त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन एक ट्विट करत मदतीसाठी पुन्हा एकदा अपील केली. राशिदने केलेल्या ट्विटमध्ये त्याने लिहिले आहे की,“काबुलमध्ये पुन्हा रक्तपात. अफगाणि लोकांना मारणं कृपया बंद करा”

काबुलमध्ये मोठे नुकसान

काबुल विमानतळावर दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी नागरिकांवर हा हल्ला केला. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या मुख्य गेटवर ही घटना घडली. हल्ल्यात जवळपास 72 लोकांचा मृत्यू झालाय. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने दिलेल्या माहितीनुसार, विमानतळाच्या बाहेर ISIS कडून हल्ला करण्यात आला. यात 13 अमेरिकन सैनिकांचा मृत्यू झाला. इतर 18 सैनिक जखमी झालेत. दुसरीकडे ISIS-K या दहशतवादी समहुाने टेलीग्राम अकाउंटवर काबुल विमानतळावरील हल्ल्याची जबाबदारी घेतलीय.

हे ही वाचा

अफगाणिस्तान तालिबानच्या ताब्यात, स्टार क्रिकेटपटू राशीद खानचं कुटुंब अडकलं, इंग्लंडमध्ये धाकधूक

(Afghanistan cricketer Rashid khans reaction on kabul kabul airport attack blasts)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.