Asghar Afghan Retired: संघाला गरज असताना मोठ्या शस्त्रक्रियेनंतर 14 दिवसांत मैदानावर परतला, 12 वर्षानंतर निवृत्त होताना अश्रू अनावर
मागील काही वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावारुपाला येत असलेल्या अफगाणिस्तान संघाचा कणा असणारा माजी कर्णधार असगर अफगान याने निवृत्ती घेतली असून नुकताच तो त्याचा शेवटचा सामना खेळून तंबूत परतला आहे.
मुंबई: अनेकदा क्रिकेट हा फक्त खेळ नसून एक भावना असल्याचं आपल्या समोर येत असतं. मग ते फॅन्सचं त्यांच्या आवडत्या खेळाडूं प्रतिचं प्रेम असो किंवा खेळाडूंचे मैदानातील किस्से. कधी मजाक-मस्तीसह अरे-तूरेवर आल्याचे किस्सेही सामन्यात घडत असतात. पण या साऱ्यांतूनच क्रिकेटप्रतीची आपुलकी आणि प्रेम दिसून येतं. आजही विश्वचषकाच्या अफगाणिस्तान विरुद्ध नामिबीया (AFGvsNAM) सामन्यात असाच भावनिक प्रसंग घडला.
अफगाणिस्तानचा पहिला स्टार क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार असगर अफगान (Asghar Afgan) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आणि अंतिम सामन्या वेळी मैदानातच त्याला अश्रू अनावर झाले. कारकिर्दीच्या शेवटच्या सामन्यात तो निवेदकाशी बोलताना तसेच तंबूत गेल्यावरही रडत असल्याचं पाहायला मिळालं. असगरने त्याच्या अखेरच्या सामन्यात 23 चेंडूत 31 धावांची खेळी केली.
Atal Asghar Afghan cried after leaving cricket forever you are the real hero of afghan team Thank you for your service to Afghanistan Proud of you! pic.twitter.com/wWklaHI9Qh
— Nisar Afghan (@NisarAfghan47) October 31, 2021
असगरची कारकिर्द
असगरने 2009 साली स्कॉटलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय डेब्यू केला. त्याने अफगानिस्तानकडून 6 टेस्ट सामने, 115 वनडे आणि 75 टी-20 सामने खेळले. टेस्टमध्ये 44.00 च्या ,सरासरीने 440 रन आणि वनडेमध्ये 24.73 च्या सरासरीने 2 हजार 467 रन केले आहेत. भी बनाए हैं. त्याने दोन्ही प्रकारात एक-एक शतकही लगावलं आहे. तर टी20 फॉर्मेटमध्ये 1 हजार 358 धावा त्याने केल्या आहेत. असगरने 59 वनडे आणि 52 टी-20 सामन्यात कर्णधार म्हणून काम पाहिलं. यात 52 पैकी 42 टी20 सामन्यात अफगाणिस्तानचा संघ विजयी झाला.
संघासाठी सारं काही
असगर हा संघासाठी काहीही करु शकत होता, याचं उदाहरण एका किस्स्यातून येतं. असगरने संघाला गरज असताना एका अत्यंत मोठ्या शस्त्रक्रियेनंतरही अवघ्या दोन आठवड्यात पुन्हा मैदानावर हजेरी लावली होती. यंदाही विश्वचषकाच्या संघात तो नव्हता. पण क्वॉलिफायर सामन्यात अफगानिस्तान सलग तीन मॅच पराभूत होताच असगरला संघात सामिल करण्यात आलं. त्याची शस्त्रक्रिया झाली असतानाही त्याने संघासाठी खेळून संघाला विश्वचषकात क्वॉलीफाय करु दिलं.
हे ही वाचा :
(Afghanistan star Cricketer and former captain asghar afghan says goodbye to his Cricket Career he cried on last match)