India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो ‘अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे’

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजमने संघाला मिळवून दिलेल्या विजयानंतर मैदानात खेळाडू वृत्तीचं दर्शन घडवलं. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही त्याने संघातील खेळाडूंना उपदेश देत भाषण केलं.

India vs Pakistan : भारतावर विजयानंतर बाबर आजमनं संघाला दिला मोलाचा संदेश, म्हणतो 'अतिउत्साही होऊ नका, अजून स्पर्धा बाकी आहे'
बाबर आजम
Follow us
| Updated on: Oct 25, 2021 | 10:57 PM

T20 World Cup 2021: उत्तम गोलंदाजी आणि संयमी फलंदाजी अशा उत्कृष्ट कॉम्बीनेशनने पाकिस्तान संघाने टी-20 विश्वचषकाच्या (T20 World Cup 2021) पहिल्याच सामन्यात भारताचा (India vs Pakistan) पराभव केला. तब्बल 10 विकेट्सनी या सामन्यात पाकिस्तानने भारतीय संघाला दारुण पराभूत केलं. सुरुवातीला पाक संघाने भेदक गोलंदाजी करत भारताला 151 धावांवर रोखलं. त्यानंतर क्लासिक फलंदाजी करत सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी संपूर्ण टार्गेट एकहाती पूर्ण करत 10 विकेट्सनी विजय मिळवला.

तब्बल 14 वर्षानंतर विश्वचषकात तर प्रथमत:च टी20 विश्वचषकात पाकने भारताला नमवलं. या विजयाचं सर्वाधिक श्रेय हे संघाचा कर्णधार बाबर आजमला (Babar Azam) जात असून त्याने कर्णधारी तर उत्तम केलीच. पण फलंदाजीमध्येही चांगली कामगिरी करत संघाला जिंकवून दिलं. मूळात या मोठ्या विजयानंतरही त्याने मैदानात कोणतीच आक्रमकता न दाखवता अगदी शांतपणे विजय साजरा केला. त्यानंतर ड्रेसिंग रुममध्येही सर्व सहखेळाडूंना मोलाचा संदेश देत, अतिउत्साही न होता संपूर्ण स्पर्धेवर लक्ष देण्यास सांगितंल.

काय म्हणाला बाबर?

विजयानंतर ड्रेसिंग रुममध्ये बोलताना बाबर म्हणाला,“हा सामना आपण संघ म्हणून जिंकलो आहोत. हीतर नुसती सुरुवात आहे. तुम्ही एन्जॉय करा, पण अतिउत्साही होऊ नका. उद्याचा दिवस पण आपण आनंद साजरा करत राहू, तर हे लक्षात ठेवा पुढेही स्पर्धा बाकी आहे. आपल्याला पुढे लक्ष्य केंद्रीत करायचं आहे. हा सामना झाला. पण आपलं ध्येय विश्वचषक जिंकण हे आहे. संघ म्हणून आज आपण जिंकलो आहोत. त्यामुळे अतिउत्साही होऊ नका, ही विनंती तुम्हाला करतो.”

असा पार पडला सामना

सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.

152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.

इतर बातम्या

‘हा तर इस्लामचा विजय’, पाकिस्तानच्या नेत्याने खेळाला दिला धर्माचा रंग

India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल

India vs Pakistan : भारताच्या पराभवानंतर विनोद कांबळी वैतागला, हार्दीकला म्हणतो जाऊन दांडीया खेळ

(After beating india pakistani cap babar azam says teammates dont get over exited tournament is not yet over)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.