India vs Pakistan : वरुण चक्रवर्तीसारखे बोलर तर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येपण मिळतील, माजी पाक कर्णधाराचा हल्लाबोल
भारत पाकिस्तान यांच्यातील सामना पार पडल्यानंतर आता सोशल मीडियावर विविध मीम्ससह अनेक दिग्गजांची विविध वक्तव्य येत आहेत. यामध्ये आता पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटनेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
T20 World Cup 2021 : टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना चांगलाच रंगला. पाकिस्तानने भारताला अगदी सहज पराभूत केलं. पाकिस्तानी गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज तग धरू शकले नाहीत. पाकचा गोलंदाज शाहीन आफ्रिदीने तर कमाल केली. पहिल्या दोन षटकांत त्याने भारताच्या चक्क दोन गड्यांना बाद करण्याची किमया करुन दाखवली. त्यानंतर फलंदाजीमध्ये सलामीवीर बाबर आणि रिजवान यांनी 152 धावा एकही विकेट न गमावता पूर्ण केल्या. या पराभवानंतर भारताची खासकरुन गोलंदाजीची बाजू किती कमकुवत आहे हे समोर आलं आहे. त्यावरच टीका करत पाकिस्तानचा माजी कर्णधार सलमान बटने (Salman Butt) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सलमानने त्याच्या प्रतिक्रियेतून भारताचा युवा खेळाडू वरुण चक्रवर्ती (Varun chakravarthy) याच्या गोलंदाजीवरच एकप्रकारे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याने वरुणसारखे गोलंदाज पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्येही मिळतात असं म्हणत त्याला अगदी सामन्य गोलंदाज म्हणून एकप्रकारे हिनवलं आहे. सामन्यात वरुणने 4 ओव्हरमध्ये 33 धावा दिल्या असून इतरांप्रमाणे त्यालाही एकही विकेट घेण्यास यश आलं नाही.
काय म्हणाला सलमान?
वरुण चक्रवर्तीबाबत बोलताना सलमान म्हणाला,‘वरुण चक्रवर्ती आयपीएलमध्ये विदेशी खेळाडूंना बाद करत असेल. पण पाकिस्तानच्या फलंदाजाना त्याची गोलंदाजी अजिबात अवघड नाही. पुढे तो म्हणाला, ‘श्रीलंका संघाचे माजी फिरकीपटू अजंता मेंडिस एक उत्कृष्ट गोलंदाज होते. पण पाकिस्तान संघासमोर तेही अपयशी ठरले. त्यामुळे वरुणसारखे खेळाडूतर पाकिस्तानच्या गल्ल्यांमध्ये मिळतात. त्याला खेळणं आमच्या खेळाडूंसाठी अजिबात अवघड नाही.’
असा पार पडला सामना
सर्वात आधी पाकिस्तानने नाणेफेक जिंकली त्यामुळे जिंकणारा संघ निवडेल अशी गोलंदाजीच त्यांनी निवडली. ज्यानंतर भारतीय फलंदाज मैदानात आले. यामध्ये फलंदाजीची सर्वाधिक मदार असलेल्या सलामीवीर रोहित आणि राहुल यांनी अवघे 0 आणि 3 रन केले. संपूर्ण सामन्यात विराट आणि ऋषभने केवळ झुंज दिली. यात कोहलीने 57 आणि पंतने 39 धावा केल्या. त्यानंतर कोणालाच खास कामगिरी करत आल्याने संपूर्ण संघाचा डाव 151 धावांवर 20 ओव्हरमध्ये आटोपला.
152 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आलेल्या पाकिस्तानने सुरुवातीपासूनच फलंदाजीमध्ये एक वेगळाच क्लास दाखवला. दोन्ही सलामीवीर बाबर आजम आणि रिजवान यांनी उत्कृष्ट अर्धशतक झळकावली. बाबरने 52 चेंडूत 68 धावा केल्या. तर रिजवानने 55 चेंडूत 79 धावा केल्या. भारताच्या एकाही गोलंदाजाला खास तर नाही किमान सुमार गोलंदाजीही करता आली नाही. एकही विकेट न घेता आल्याने भारताचा 10 विकेट्सनी लाजिरवाणा पराभव झाला आहे.
इतर बातम्या
India vs Pakistan : पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार असणाऱ्या शाहीनचं, शाहीद आफ्रिदीशी नातं काय?
इंग्लंड संघाची ताकद वाढणार, सर्वात बलाढ्य खेळाडू संघात परतणार
(After India loose from pakistan in T20 World Cup 2021 salman butt says bowlers like varun chakravarthy are common in pakistan street cricket)