Virat Kohli Resign: BCCI ने विराटसाठी जारी केलं खास स्टेटमेंट, त्यात म्हटलं की….
कसोटी संघाचा कर्णधार म्हणून 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने पहिला मालिका विजय मिळवला. 22 वर्षानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाची चव चाखता आली.
मुंबई: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पराभवानंतर विराट कोहलीने (Virat kohli) काल अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडत असल्याचे जाहीर केला. त्याचा हा निर्णय क्रिकेट चाहत्यांसाठी एक मोठा धक्का आहे. बीसीसीआयने (BCCI) विराटचा हा निर्णय मान्य केला असून तो त्याचा व्यक्तीगत निर्णय असल्याचं म्हटलं आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कालच विराटसाठी टि्वट केलं व कर्णधार म्हणून जे काम केलं, त्या बद्दल त्याचं कौतुक केलं. विराट संघात आपल योगदान देत राहिलं भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार म्हणून उत्तम कामगिरी केली, त्याबद्दल बीसीसीआयने विराट कोहलीचं अभिनंदन केलं आहे. “कर्णधारपद सोडण्याच्या त्याच्या निर्णयाचं बीसीसीआय आणि निवड समिती आदर करते. खेळाडू म्हणून विराट संघात आपल योगदान देत राहिलं व भारतीय क्रिकेटला एका उंचीवर घेऊन जाईल, यावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे” असं बीसीसीआयने आपल्या पत्रकात म्हटलं आहे.
एमएस धोनीकडून सूत्र स्वीकारल्यानंतर कर्णधार म्हणून त्याचा प्रवास सुरु झाला. भारताचा तो सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार आहे. 68 कसोटी सामन्यात त्याने भारताचे नेतृत्व केले. त्यात 40 कसोटीत संघाला विजय मिळाला. विजयाची टक्केवारी 58.82 आहे. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून 2015 मध्ये श्रीलंकेविरुद्ध त्याने पहिला मालिका विजय मिळवला. 22 वर्षानंतर भारताला श्रीलंकेविरुद्ध मालिका विजयाची चव चाखता आली.
विराटच्याच नेतृत्वाखाली भारताने ऑस्ट्रेलियात इतिहास रचला. 2018 मध्ये ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला कसोटी मालिका विजय मिळवला. वेस्ट इंडिजमध्ये मालिका जिंकली व कसोटी क्रमवारीत भारतीय संघ पहिल्या स्थानावर पोहोचला. मायदेशात झालेल्या 31 कसोटी सामन्यांपैकी कोहलीच्या नेतृत्वाखाली 24 कसोटी सामने जिंकले. फक्त दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभव झाला.
सौरव गांगुली म्हणाला… ‘विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने खेळाच्या प्रत्येक फॉरमॅटमध्ये यश मिळवले आहे. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असून बीसीसीआय त्याचा आदर करते. संघाला नव्या उंचीवर नेण्यासाठी तो टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असेल. एक शानदार खेळाडू, वेल डन.”
As Virat Kohli steps down as Team India’s Test Captain, the Board of Control for Cricket in India congratulates him on an outstanding career as #TeamIndia’s Test Captain.
More Details ?
— BCCI (@BCCI) January 16, 2022
जय शाह बीसीसीआय सचिव “विराट कोहली भारतीय क्रिकेट संघाचे नेतृत्व करणाऱ्या सर्वोत्कृष्ट कर्णधारांपैकी एक आहे. लीडर म्हणून त्याचे रेकॉर्ड आणि संघासाठीचे योगदान सर्व काही सांगून जाते. 40 कसोटी विजयांमध्ये त्याने संघाचे नेतृत्व केले, त्यातून विराटचा आत्मविश्वास दिसतो. विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेत सर्वोत्कृष्ट विजय मिळवले. देशाचे प्रतिनिधीत्व करण्याची इच्छा असलेल्या उदयोन्मुख क्रिकेटपटूंना विराटपासून प्रेरणा मिळेल. भविष्यासाठी विराटला माझ्याकडून शुभेच्छा. भारतीय संघासाठी मैदानावर तो संस्मरणीय योगदान देत राहिल अशी अपेक्षा आहे” असे जय शाह यांनी म्हटलं आहे.
(After virat Kohli Resign from test captaincy Bcci issue Special Statement for him)