IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार?

तिसऱ्या कसोटीसाठी तो पात्र आहे. त्याला बाहेर ठेवलं, तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल" असं माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनाी म्हटलं आहे.

IND vs SA: संघाबाहेर कोण जाणार? कॅप्टन कोहलीसाठी मुंबईकर खेळाडूचा बळी देणार?
virat kohli
Follow us
| Updated on: Jan 10, 2022 | 11:39 AM

केपटाऊन: पाठिच्या दुखण्यामुळे विराट कोहली (Virat kohli) दुसऱ्या जोहान्सबर्ग कसोटीत खेळला नव्हता. विराट आता मैदानावर सराव करतोय. त्यामुळे तिसऱ्या केपटाऊन कसोटीत तो खेळू शकतो. पण विराट कोहली संघात परतला, तर त्याच्याजागी संघाबाहेर कोण जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) की हनुमा विहारी? (Hanuma Vihari) दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रहाणे अपयशी ठरला. पण दुसऱ्याडावात त्याने अर्धशतकी खेळी केली. दुसऱ्याबाजूला हनुमा विहारीने सुद्धा दोन्ही डावात चांगला खेळ दाखवला. अन्य फलंदाज फक्त हजेरीलावून पॅव्हेलियनमध्ये परतत असताना तो खेळपट्टीवर उभा राहिला. त्यामुळे विराटसाठी कोण बाहेर जाणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे. (Ajinkya Rahane or Hanuma Vihari Who Should Make Way For Virat Kohli in Playing XI For 3rd Test at Cape Town?)

तो भविष्य आहे

अनुभवामुळे अजिंक्य रहाणे अजून संघात टिकून आहे. पण हनुमा विहारी भविष्य आहे. त्यामुळे त्याला संधी द्यावी असे काही जणांचे मत आहे. “अजिंक्य रहाणेला आतापर्यंत भरपूर संधी मिळालीय, त्यामुळे हनुमा विहारी तिसऱ्या कसोटीसाठी पात्र आहे. त्याला बाहेर ठेवलं, तर तो त्याच्यावर अन्याय ठरेल” असं माजी क्रिकेटपटू आणि खासदार गौतम गंभीर यांनाी म्हटलं आहे.

हेड कोच राहुल द्रविड काय निर्णय घेणार?

दुसऱ्या डावात रहाणेने वेगाने धावा जमवल्या होत्या तर विहारीने संयम दाखवत दुसऱ्याडावात तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन धावा केल्या होत्या. त्यामुळे कोणाला वगळायचं? हा कोच राहुल द्रविडसाठी कठीण निर्णय असेल. विहारी कामचलावू गोलंदाजी सुद्धा करतो. ती सुद्धा त्याची एक जमेची बाजू आहे. राहुल द्रविड यांनी, वरिष्ठ खेळाडूंनीही वाट पाहिली होती, असे सांगून अप्रत्यक्षपणे अजिंक्य रहाणेची पाठराखण केली होती. आता उद्या ते काय निर्णय घेतात, ते पहावे लागेल.

संबंधित बातम्या: 

IPL 2022: यंदाचा IPL चा संपूर्ण सीजन महाराष्ट्रात? शरद पवारांकडून ग्रीन सिग्नल U19 World Cup: 11 षटकार, 20 चौकार आणि 278 धावा… वॉर्मअप मॅचमध्ये भारताच्या युवा संघाने दाखवला पराक्रम मित्र धोनीसाठी धावून गेला जाडेजा, KKR ची बोलती केली बंद, IPL आरंभाआधीच सुरु झाली ठसन

(Ajinkya Rahane or Hanuma Vihari Who Should Make Way For Virat Kohli in Playing XI For 3rd Test at Cape Town?)

'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.