Gautam Gambhir: ‘ऑलराऊंडर शोधण्यासाठी धरसोड वृत्ती सोडा’, गौतम गंभीरने निवड समितीला सुनावलं

"माझ्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दिला पाहिजे. तिथे तुम्ही कोणाला तयार करु शकत नाही. ती खेळाडू घडवण्याची जागा नाही"

Gautam Gambhir: 'ऑलराऊंडर शोधण्यासाठी धरसोड वृत्ती सोडा', गौतम गंभीरने निवड समितीला सुनावलं
guatam-hardik
Follow us
| Updated on: Feb 01, 2022 | 2:12 PM

नवी दिल्ली: “वेगवान गोलंदाजी करणाऱ्या अष्टपैलू खेळाडूचा शोध घेण्याच्या पलीकडे आता भारताने विचार केला पाहिजे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अष्टपैलू (All rounder) म्हणून संधी दिल्यानंतर अशा खेळाडूला झटपट बदलण्याऐवजी देशांतर्गत क्रिकेटमध्ये असा खेळाडू घडवण्यावर भर दिला पाहिजे” असं मत माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी व्यक्त केलं आहे. मागच्या तीन वर्षांपासून हार्दिक पांड्या (Hardik pandya) दुखापतीचा सामना करतोय. भारतीय निवड समितीने वनडे आणि टेस्टमध्ये ऑलराऊंडरच्या जागेवर वेगवेगळे खेळाडू आजमवून पाहिले आहेत. “एखादी गोष्ट तुमच्याकडे नसेल, तर तसा प्रयत्न करु नका. ती गोष्ट तुमच्याकडे नाहीय, हे मान्य करुन पुढे जायला पाहिजे. जे तुम्ही बनवू शकत नाही, असं काही घडवण्याचा प्रयत्न करु नका. खरी समस्या तिकडे आहे” असं गंभीर म्हणाला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परफॉर्मन्स देण्याची जागा तिथे….

“माझ्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही परफॉर्मन्स दिला पाहिजे. तिथे तुम्ही कोणाला तयार करु शकत नाही. ती खेळाडू घडवण्याची जागा नाही. देशांतर्गत आणि भारतीय अ संघाकडून खेळताना तुम्ही एखाद्याला तयार करु शकता. जेव्हा तुम्ही देशाचं प्रतिनिधीत्व करता, तेव्हा थेट मैदानावर जाऊन परफॉर्मन्स दिला पाहिजे” असं गंभीर म्हणाला. नकुत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे मालिकेत वेंकटेश अय्यरला ऑलराऊंडर म्हणून संधी दिली होती. पहिल्या वनडेमध्ये त्याला गोलंदाजीची संधी दिली नाही आणि तिसऱ्या वनडेत संघातून त्याला वगळण्यात आलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

विजय शंकर, शिवम दुबे आणि वेंकटेश अय्यर यांच्याबाबतीत आपण हे पाहिलं

वेंकटेश अय्यरला वेस्ट इंडिज विरुद्धच्या वनडे मालिकेसाठी संघात स्थान दिलेले नाही. गंभीरच्या मते एखाद्या खेळाडूची निवड केली, की त्याला पुरेशी संधी मिळाली पाहिजे. “कपिलदेव यांच्यानंतर त्या तोडीचा ऑलराऊंडर आपल्याला मिळाला नाही, असं आपण नेहमी म्हणतो. आपण रणजी करंडक स्पर्धेतून असा ऑलराऊंडर घडवला पाहिजे. त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुरेशी संधी दिली पाहिजे. झटपट बदल करु नये. विजय शंकर, शिवम दुबे आणि वेंकटेश अय्यर यांच्याबाबतीत आपण हे पाहिलं” असं गंभीर म्हणाला.

All rounders Dont keep changing them quickly We have seen that with so many guys Gautam gambhir

पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या...
पवार कुटुंब एकत्र येणार? दादांच्या आईचं विठोबाकडे साकडं म्हणाल्या....
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा
2025ला राज्यात कोणते प्रकल्प सुरू होणार?सरकारकडून या प्रकल्पाची घोषणा.
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत
ठाकरे गटाला मोठा धक्का? बडा नेता पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत.
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?
महायुतीच्या 9 मंत्र्यांनी अद्याप पदभार स्वीकरलाच नाही, कारण नेमकं काय?.
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.